Breaking News
Home / मनोरंजन / असं कुणी बाईक पार्क करतं का, नशीब मागचा माणूस थोडक्यात वाचला, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

असं कुणी बाईक पार्क करतं का, नशीब मागचा माणूस थोडक्यात वाचला, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

मुलींच्या गाडी चालवण्यावर कायमच टीका होत असते. म्हणजे एखाद्या वेळी मुली डाव्या बाजूचे इंडिकेटर चालू करून उजव्या बाजूला वळतात तसेच गाडी थांबवताना ब्रेक दाबण्याऐवजी पाय खाली करतात आणि पायाने गाडी थांबण्याचा प्रयत्न करत असतात. असे अनेक व्हिडीओ तुम्ही बघितले असतील मात्र मुलेही यात कमी नाहीत. उगाच फुकट शायनिंग मारायच्या नादात ही पोरं पण काहीतरी कुटाना करून बसतात. अनेकदा काहींना स्टंट मारायचा असतो, त्यांना माहिती असतं ते काय करत आहेत मात्र तरीही स्वतःची फजिती करून घेतल्याशिवाय त्यांचा कंड जिरत नाही. आता गाडी घेतल्यावर शहरातील लोकांना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे पार्किंगचा. शहरात अनेकदा पार्किंगवरून मोठमोठी भांडणं सुद्धा झालेली आपल्याला बघायला मिळतात. आता ज्यांना गाडी चालवता येते त्यांनाच या विषयाच गांभीर्य आहे… बाकीच्यांना फक्त गाडीच्या मागच्या सीटवर बसायचे कळते. तर विषय असाय की, पार्किंग एकदम महत्वाचा आणि तितकाच किचकट विषय आहे.

आता तुम्हाला पार्किंग हा विषय किचकट कसा आहे, हे समजून घ्यायच असेल तर पुढच्या महिन्यात येणाऱ्या दिवाळीत कापडाच्या दुकानासमोर गाडी लावा आणि दुसऱ्याच कपड्याच्या दुकानात जावा… मग बघा गोंधळ… गाडीची पार्किंग म्हणजे असा विषय आहे की, आपली गाडी उपलब्ध जागेत दुसऱ्याच्या गाडीला थोडाही धक्का न लावता, नुकसान न करता पार्क करणे आणि पुन्हा तितक्याच सावधपणे ती काढणे. जर फोरव्हीलर असेल तर मग सावळा गोंधळ उडालाच समजा. अनेकांना गाडी शिकल्यानंतर पार्किंगचा अंदाज येण्यासाठी काही वर्षे निघून जातात असंही गंमतीत म्हटलं जात असलं तरी गाडी अगदी व्यवस्थित चालवणारे अनेकजण पार्किंग म्हटलं की थोडे गडबडतात. शेवटी पार्किंग करताना अनेक जण गाडीची चावी विसरतात. काही जण गाडी बंद न करता पुढे निघतात. कधी कधी घाईगडबडीत गाडी पार्किंग करतात आणि मग अशा काही काही घटना घडतात की, जे पाहून आपण आश्चर्यचकित होतो नाहीतर हैराण तरी होतो.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ बघून काहींना हसू फुटले तर काहींना वाईट वाटले. म्हणजे पार्किंग करताना किती गमतीजमती होऊ शकतात आणि कधी कधी त्या किती महागात पडू शकतात, हे या व्हायरल झालेल्या व्हिडीओतुन लक्षात येतं. आता या व्हिडीओत नेमकं काय झालं आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ तर बघावाच लागणार ना भाऊ…

हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून नक्कीच आश्चर्य वाटते. मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीबद्दल वाईट वाटते. मात्र त्याचबरोबरच या चालकाने केलेली करामत पाहून सध्या व्हायरल झालेल्या ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याचा ओळी आठवल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.