Breaking News
Home / मनोरंजन / असं कुणी शाळेत जबरदस्ती उचलून नेतं का, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

असं कुणी शाळेत जबरदस्ती उचलून नेतं का, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

शाळेत जाणाऱ्यांपैकी एक तरी असा चंपू असतो. ज्याला रोज शाळेत जायचंच असतं. शाळेत गेल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. शाळा एके शाळा. बरं शाळेत गेला तरीही सगळा अभ्यास पूर्ण झालेला. सगळ्याच विषयात हुषार. मग बाई त्याला वर्गाचा मॉनिटर बनवतात. बाईंचा लाडका होत असतो. बाई त्याला सारखा खाऊ देऊ इच्छितात. बाईंनी त्याला चॉकलेट दिलं तर आमच्या सारख्या ढ लोकांच्या अपेक्षा भंगाचा आणखी एक बांध तुटून पडतो. बाई काय आम्हाला चॉकलेटं देईना आणि हुश्शार पोरापुढं आपला काय टिकाव लागना. तरी बी आपण इमानं इतबारं शाळेत येतो. पण आपल्या जिगरी मित्रं आहे ना इलास. म्हणजे तसं त्याचं नाव विलास विठ्ठल बने हाय पण आम्ही त्याला लाडानं इलास हाक मारतो. आमच्याकडं त्याच्या बद्दल एक जोक कायम प्रसिद्ध आहे. त्याची मालवणी बायको आसल तर कशी हाक मारलं, इलास इलास काय हो?, जाऊदेत. मालवणी लोकांना कळणारा जोक आहे तुम्ही लो़ड घेऊ नका. इलासला रोज शाळेत कसं आणायला लागतंयं ते तुम्ही पाहिलंचं असाल.

सकाळी उठा. इलासच्या घरी जा आणि त्याला आमच्या शाळेत घेऊन जा, अशीच गत आता आमची झालीयं बघा. आधी दप्तराचं ओझं त्यातं याचं ओझं असं ओझ्यानं आयुष्य जड होऊन बसलंयं. इलासच्या डोक्यात एक दगुड घालावा, असं वाटायलंयं मला तर. आमच्या सारख्या लोकांना आधीच मॅडम भाव देत नाही, त्यात इलास आपल्या आयुष्याचा इलाज न करता आम्हाला असा ओझ्याखाली दाबून ठेवतोयं. बरं आम्ही इलासला घेऊन शाळेत येतो त्याचं बी कुणाला कवतीक नाही. त्याऊलट इलासच्याच बाबतीत कधी कधी बाई कवतीक करायल्यात की हे बेनं किमान शाळेत तरी आलं. आता असल्या लोकांमध्ये रहायचं तरी कसं तुम्ही मला सांगा बरं. इलासच्या या सगळ्या गोष्टीत एक तर त्याचं तरी चांगलं होईल किंवा आमचं वाईट तरी होईल. काय खरं नाय. एकदा शाळेत न्यायाला त्याच्या आईनं आम्हाला बोलावून घेतलं होतं. बेन्यानं सरळ गप गुमान शाळेत यावं की नाही. आणि त्याच्या आयशीनं नाही तर पुन्हा शाळेत पाठवू नये ना. आम्हाला सारखी वझी उचलालया का लावत्यात. त्यांच्या या सगळ्या गोष्टींच्या मधोमध आमचा जीव चाललायं ते कोण सांगेल यांना. इलासच्या या सगळ्या गप्पा आणि गोष्टींच्या लढाईत आम्हाला एक मात्र नक्की कळलंयं की इलास आता काय खरं शाळेत येण्य्यासाठी बनलेलाच नाहीये.

तो फक्त अवली बनायलाच जन्माला आलायं. तर त्यानं काय केलं ते तुम्हाला सांगतो म्हणजे एक गोष्ट नक्की तुम्हाला कळेल. इलासनं केलं. त्याला शाळेत यायचं नव्हतं. त्यानं एकदम मस्त पैकी प्लान बनवला. शाळेत येण्यापासून वाचण्यासाठी त्याचा प्लान तयर झाला. त्यांच्या या सगळ्या गोष्टीमुळं आमचं कंबरडं मोडणार होतं हे नक्की. त्यांच्या या थट्टामस्करीत आमच्या कमरेचा पार भूगा होऊन बसतो. इलासनं काय करावं शाळेत यायचं नाही म्हणून दप्तरात आजपर्यंतची सगळी पुस्तकं भरली. पुस्तकानंतर एकदम अचानक गेल्या वर्षीची पूस्तकं भरली. त्यानंतर डबा भरला. दोन वॉटर बॉटल भरल्या. सगळं घेऊन घट्ट दप्तर पकडून बसला. त्याला हलायलाच मागं ना त्याच्या आईनं आम्हाला बोलावून घेतलं. पोरं म्हणाली उचला रे याला पण हा काय हलायला मागना. शेवटी पोरांनी कसा बसा करुन याला उचलला पण उचलल्या उचलल्या चार पाच जण्याच्या पाठीत कळ गेली. त्या युक्तीनं त्याला त्या दिवसासाठी सुट्टी मिळाली. आता तुम्ही जास्त लोड घेऊ नका, खालील व्हिडीओ पहा आणि मस्त राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.