Breaking News
Home / मनोरंजन / असं कुणी स्पोर्ट्स शूज चेक करतो का राव, सेल्समॅन टेन्शन मध्ये आला ना… व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

असं कुणी स्पोर्ट्स शूज चेक करतो का राव, सेल्समॅन टेन्शन मध्ये आला ना… व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

आपली टीम वायरल व्हिडियोज अगदी आवर्जून बघत असते. म्हणजे आम्हा स्वतःला आवड आहे म्हणून ही आम्ही बघतो. तसेच या लेखनाच्या निमित्ताने सुद्धा वायरल व्हिडियोज बघणं होतं. यातून एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवतं की हे वायरल व्हिडियोज म्हणजे अनेकवेळा अतरंगी लोकांचे सतरंगी किस्से असतात. आपण स्वतः आपल्याला आवडणारे अनेक वायरल व्हिडियो आठवून बघा. अर्थात गंभीर विषय मांडणारे व्हिडियो आपण यात येत नाहीत हे आपण जाणताच. पण तो एक अपवाद वगळता, बाकीचे व्हिडियो हे सहसा धमाल मस्तीचे असतात.

दिवसभराचे थकून भागून आल्यावर हे असे व्हिडियो बघितले की मनाला बरं वाटतं. आमच्या टीमच्या बाबतीत ही असंच काहीसं झालं. वीकेंडला आम्ही सगळे बाहेर जाऊन आलो होतो आणि सोमवारी दुपारी परतलो होतो. आता संध्याकाळी काम करण्याची इच्छा कोणाला होणार सांगा. तरी मनाची समजूत काढत कसे बसे तयार झालो. विषय काय असावा करता करता एका वायरल व्हिडियो वर येऊन थांबलो आणि मग त्यावरच लिखाण करायचं ठरवलं. लिहिलं सुदधा. पण मग मागचं काही अर्धवट लिखाण ही बाकी होतं ते आधी पूर्ण केलं. म्हणून आज हा लेख आपल्या भेटीस येतोय. पण मंडळी, तेव्हा काय किंवा आज काय, हा व्हिडियो आनंद देऊन जातोच जातो. पण तुम्ही म्हणाल त्या व्हिडियोत एवढं आहे काय? अहो मस्त धमाल आहे आणि तीही काही सेकंदात. ते ही अगदी एका मिनिटाच्या आत.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक आलिशान दुकान दिसतं. महागड्या शूज ब्रँडचं ते दुकान असतं. आता तुम्हाला तर माहिती आहेच की या शूजची किंमत किती जास्त होऊ शकते. अगदी आपण विचारही करू शकणार नाहीत इतके महागडे शूज विकायला असतात. तर अशा या दुकानात एक सेल्समन आणि एक मुलगा जो गिर्हाईक असतो ते दिसून येतात. तो सेल्समन एका बॉक्स मधून त्या मुलाला शूज काढून देतो. बॉक्स जसा मस्त हिरव्या रंगाचा असतो तसाच शूजही अगदी रंगेबीरंगी असतो. मस्त वाटतो. हा गिर्हाईक असलेला मुलगा हे दोन्ही शूज पायात घालून बघतो. फिटिंग वगैरे व्यवस्थित आहे ना हे पाहतो. आपण असतो तर आपणही हेच केलं असतं. आणि आपण अजून जास्तीत जास्त, चालून बघितलं असतं. पण हा पोरगा अतरंगी असतो. बरं या दोघांचा संवाद चित्रित केला जात असतो म्हणजे हे सगळं मुद्दामहून ठरवुन केलं गेलंय हे कळतं. पण आता अजून काय करेल हा विचार मनात येत असतानाच हा पोरगा धूम ठोकतो ना भाऊ… बरं जी धूम ठोकतो ती थेट दुकानाच्या बाहेर. त्याच्या पाठोपाठ हा सेल्समन ही धावतो. धावणारच ना मंडळी, कारण जर हा पोरगा शूज घेऊन पळाला तर नुकसानभरपाई त्या सेल्समनला द्यावी लागली असती. काय अवस्था झाली असेल बिचाऱ्या सेल्समनची..

फाटून हातात आली असणार. पण सुदैवाने धूम ठोकलेला पोरगा तसाच वळून पुन्हा दुकानात येतो. तेव्हा त्या सेल्समनचा जीव अगदी भांड्यात पडल्याचं आपण बघू शकतो. आम्ही तर हा व्हिडियो बघून खूप हसलो. आम्हाला हा व्हिडियो एवढा आवडला की म्हंटलं यावरच लिहू. त्यातूनच हा लेख लिहिला गेलेला आहे. बरं केवळ लेखावर आपल्याला समाधान मानायला लावू का आम्ही? नाही. त्यामुळे आमच्या टीमने सदर व्हिडियो या लेखाच्या खाली शेअर करायचं ठरवलं आहे. आपण तो नक्की बघा. आपणही आनंद घ्या आणि हा लेख शेअर करून इतरांना ही आनंद घ्या.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.