दा’रू पिणं आनंदासाठी असो की दु:ख विसरण्यासाठी, एका दा’रूड्याला दा’रू पिण्यासाठी एक छोटंसं कारण सुद्धा पुरेसं ठरतं, असं बोललं जातं. घरात भांडणं झाली तरी दा’रू लागते, ऑफिसमध्ये प्रमोशन झालं तरीही दा’रू लागते आणि नोकरी गेली तरीही दा’रूचं लागते. एकूणच काय दा’रुड्यांच्या आयुष्यात कधीही दा’रूच असते.
आपल्याकडे असं म्हटलं जातं की, घरातला एक माणूस दा’रूचा गुलाम झाला की त्याच्या आसपासच्या किमान वीस जणांचे तरी जीवन नासते. त्याचे आई-वडील, बायको, इतर कुटुंबातील सदस्य या सगळ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्रासाला, हिं’सेला आणि निर्दयतेला बळी पडावे लागते. दा’रुड्याच्या शरीराचे नुकसान होते ते वेगळेच. डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराचा असा कोणताही अवयव नाही जिथे दा’रूचा विपरीत परिणाम होत नाही. हे सगळं माहित असुनही काहीजण दा’रूच्या आहारी जातात. अशाच एक दा’रूड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.
दा’रू पिऊन गाण्यावर धिंगाणा घालणाऱ्या अनेकांना तुम्ही पाहिलं असेल. दा’रू पिताच किती तरी जण आऊट ऑफ कंट्रोल होतात. त्यानंतर त्यांचा स्वतःवर ताबा राहत नाही आणि ते काय करत आहेत तेसुद्धा समजत नाही. सध्या अशाच एका म्हाताऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दा’रू पिऊन तर्राट झालेल्या या म्हाताऱ्याने चांगलाच धिंगाणा धातला आहे. रस्त्यावर हा म्हातारा अगदीच सैराट झाला आहे. त्याने असा डान्स कमी कराटे स्टेप केल्या आहेत की सुरुवातीला ते पाहून तुम्हाला शुद्धीत असणाऱ्या माणसाला चक्करच येईल. भारी गोष्ट म्हणजे त्यानंतर जे घडलं ते पाहून हसूही आवरणार नाही. एक दा’रूडा काय काय करेल आणि बोलेल याची कोणालाच कल्पना नसते. काही लोक थोडेसे प्यायल्यानंतर लोळू लागतात तर काहीजण उशिराने दा’रूच्या आहारी जातात. जो खूप म’द्यधुंद असतो तो कोणाशीही कसंही उलट सुलट बोलू लागतो.
असे अनेक व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. पण एका दा’रुड्याला तो चक्क स्वतःशी बोलतो, समोर कोणीच नसताना कराटे करतो. आणि सगळ्यात हसू येतं ती गोष्ट म्हणजे स्वतःच स्वतःशी कराटे खेळता खेळता थेट गटारात पडतो. असाच एक व्हिडिओ आमच्या समोर आला आणि आम्ही हसून हसून लोटपोट झालो. अरे किती ती कॉमेडी… एखादा कॉमेडी शो बघून जेवढं हसू येत नाही तेवढं हा व्हिडीओ पाहून येतं.
या व्हिडीओत दिसणारा म्हातारा अशा पद्धतीने समोर कोणी नसताना कराटे करतो आहे की, जे पाहून आपल्याला वाटतं हा खरोखरच एखादा समोर आला तर त्याला मारेल. इतक्या वेगाने तो हातपात हलवतो की त्याचं स्वतःवरचं नियंत्रण संपते आणि तो थेट कोलांट्या उड्या मारून गटारात पडतो. भारी गोष्ट म्हणजे गटारात पडूनही त्याचे कराटे सुरूच आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :