मित्र असावा ऐसा, ज्याचा स्वर्गावरही डंका! मित्र हरामी असावेत. पण त्यांच्या कीडा इतकाही नसावा की तुम्हालाच उपाशी ठेवेल. मित्रांच्या नादी लागला त्याचा कार्यभार बुडाला, असं कुठं म्हटलं नव्हतं पण या व्हीडीओत बघा तुम्हाला कळेल की, मित्राला उपाशी ठेवले. काही मित्र असे भुकेलेले असतात ना की त्यांच्यामुळे तुमच्यावर उपाशी राहण्याची पाळी आलीयं. आता याच मित्राचं बघा ना, आता कुरकुरेचं पाकीटावरुन एवढं युद्ध कोण करु शकतं. एक मित्रच करु शकतो. एकतर त्या बटाटा वड्याच्या पाकिटात केवळ दोन तीन वडे शिल्लक राहीले होते. एक वडा दिला असता तरी पोरगं खुश झालं असतं, पण जर का समोरुन पोरगं धावत येतंंयं म्हणून वडे बकाबका तोंडात कोंंबायला लागला. असला कसला ह्यो मित्र, पण जीवाला जीव देणारा मित्रच. असतो. आता जरी वडे खाऊन हिणवून दाखवत असेल, तरी संकटात धावून येत असतो. असल्या मित्रांना कधी विसरु नका. त्याच्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ असतो. अन्यथा जगण्याला काय ही ही अर्थ नाही.
जगात आई वडील भावंड आणि मित्र… मात्र, यातलं एक जण जरी नसेल तर चुकल्या चुकल्या सारखं होऊन बसतं. मैत्रीची व्याख्या खूप जूनी आहे. ती कृष्ण अर्जून आणि कृष्ण सुदाम्यापासून ते आत्ताच्या जिगरी यारीपर्यंत आहे. मित्रांच्या याच मैफिलीत आपण कधी कधी हरवून जातो… जगण्याच्या या शाळेत त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाहीत. कितीही खोड्या केल्या कितीही मारामारी केली तरी मित्र हवा हवासा वाटत असतो. तो खाण्यासाठी आपल्यासाठीच भांडत असतो. पाहुण्यांकडे जाईल ना तेव्हा कदाचित कचरत असेल, पण तेच जर तुमच्या घरी आला तर तो बिनधास्त फ्रीज उघडून खाणारा आपला मित्रच असतो. जेवणाचा डब्बा सोबत खात असताना हक्काने भांडणारा आपलाच मित्र असतो. कधी घरी कुणी नसलं की किचनमध्ये शिरुन धुडगुस घालणारा आपलाच मित्र असतो. पण तोच नसेल ना तर घरात सोनं बनवून ठेवा तुमचीही इच्छा नसेल ना तर जेवणही घशाखाली उतरेना झालेलं असतं.
मित्रांच्या दुनियेत या गोष्टी आल्याच आता या खट्याळ मित्रांची गम्मत तर पहा ना. मित्र खाऊ संपवेल म्हणून जो काय ताव मारलायं ना तोंडात कोंबून कोंबून राहिलं नाही तरी सगळी खाऊची पुडी संपविलीयं पठ्ठ्यानं. का तर मित्र येऊन ताव मारल म्हणून. जस जसं वयं वाढत जाईल तस तसं पैसेही येऊ लागतील. पैसे येतील पण मित्रांसोबतची ही मैत्री परत येणार नाहीत. मित्रं हळूहळू आपापल्या कामात व्यस्त होऊ लागतील. बायका पोरांमध्ये रमतील त्यांच्या या सगळ्यात तुमच्या सोबत घालवलेला वेळ कदाचित परत येणार नाहीत. तुमच्या हातातली खाऊची पिशवी खेचून घ्यायला ते कधीही येणार नाहीत. उलट येताना तुमच्यासाठी खायला घेऊन येतील पण कदाचित वयाच्या पन्नाशीत साठीत तुम्हाला डायबीटीजमुळे ते खाता येणार नाही. तुमच्या हातातून तो खाऊ हिसकावून घेण्याची ताकदही तितकीशी राहिलेली नसेल. अशी ही मैत्री जिथं ज्यानं त्यानं आपलं मैत्रीत्व जपावं. आपल्या मित्रांसोबतचे ते क्षण जगून घ्यावेत. कारण ते पुन्हा येणारे नसतात. कितीही प्रयत्न केले तरीही आयुष्याची ही कॅसेट पुन्हा रिव्हाईंड होणं अशक्य असतं. त्यामुळं ती जिथून प्ले होईल ना तिथं मनमोकळं होऊन सुरू राहू द्यावी. तिला उगाच पळवण्याचा प्रयत्न करू नये. तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रींना शुभेच्छा…
बघा व्हिडीओ :