Breaking News
Home / मनोरंजन / असले महानग लग्नाला बोलवत जाऊ नका, हा अतरंगी व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

असले महानग लग्नाला बोलवत जाऊ नका, हा अतरंगी व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

सध्या आपल्या आजूबाजूला सगळीकडे लग्नाचा पाढा आपल्याला अनुभवायला मिळत असेल. लग्न एके लग्न, लग्न दुणे लग्न ते लग्न दाहे लग्न. गेल्या दोन ते तीन आठवड्यात तर याच्यात जबरदस्त भर पडली आहे. दर आठवड्याला निदान एका तरी ओळखीच्या व्यक्तीच लग्न होताना आपण अनुभव असाल. अर्थात अस असलं तरी लग्न आणि इतर समारंभ यांना हजेरी लावताना जी मजा येते ती कशातच नाही हे ही खरंच. त्यामुळे तुम्ही आमच्या टीमसारखे लग्नवेल्हाळ असाल तर बघायलाच नको.

कारण लग्नात जाणं हा अनुभव बरंच काही शिकवून जातो. तसेच बराचसा आनंद ही देऊन जातो. त्यात आपल्या सारख्या लेखक मित्रांचा गोतावळा असला की निरीक्षण हे चालूच असतं. तसेच लग्न म्हंटले की किस्से हे घडत असतातच. ते ही अगदी न ठरवता. ठरवून केलेले किस्से आनंद देतातच. पण न ठरवता केलेले किस्से तर त्याहून भारी असतात. ते सोलकढी सारखे असतात. पहिल्या घोटात काही कळत नाही. त्यामुळे उत्साहात येऊन माणूस घटाघटा सोलकढी पितो आणि मग जो तिखट ठसका लागतो की बाबाबाबा. पण जी मजा येते ती कमाल असते. बरं त्यात किस्से करताना एखादा कमी विचार करणारा असेल तर हसून हसून पोट दुखायची वेळ यावी. आपल्या टीमचं एक बरं आहे. अनेक लग्नात झालेले किस्से खुद्द स्वतः अनुभवता येतात.

त्याचप्रमाणे हे लेख लिहीत असताना ही अनेक व्हिडियोज बघण्यात येतात जे हसवून सोडतात. त्यातीलच एक म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो. खरं तर लग्नाच्या व्हिडियोज विषयी आपल्या टीमने विपुल लेखन केलेलं आहे. पण हा व्हिडियो पाहिला आणि राहवलं नाही हो. यात आपल्याला दिसतो एक माणूस, जो एका वरातीत उभा असतो. आता वरात म्हणजे डान्स , धमाल मस्ती ही आलीच. सोबतच फटाके वगैरे तर आलेच. बाकी गोष्टी माहीत नाहीत, पण या माणसाच्या हातात एक फ्लेअर दिलेला असतो. ज्यातून झिरमिळ्या किंवा धूर बाहेर पडतो असा फटाका. अर्थात हा माणूस तो फटका फोडण्यासाठी म्हणून उभा असतो. आजूबाजूला काही माणसं उभी असतात. जवळच लग्नाची गाडी उभी असते. कदाचित वरात सुरूच होत असावी किंवा अगदीच अंतिम टप्यात असावी. फक्त या माणसाच्या त्या फ्लेअर फुटण्याची वाट बघत सगळे थांबेलेले असतात. आता फुटेल मग फुटेल म्हणून सगळे खोळंबलेले असतात. त्यात आपण हा व्हिडियो पहिल्यांदा पाहतो तेव्हा आपल्याला सुद्धा बराच वेळ झाला की काय असं वाटत. पण तसं नसतं. व्हिडियो छोटाच आहे. पण ते वाट बघायला लावणं मात्र डोक्यात जातं. पण जेव्हा व्हिडियो संपतो तेव्हा मात्र आपण सगळे जण हसून हसून लोटपोट झालेले असतो. इतका वेळ थांबलो ते बरं झालं असं आपल्याला वाटून जातं. इतकं की आपण हा व्हिडियो पून्हा पाहतो.

यावेळी मात्र जास्त वेळ थांबायला लागलं असं वाटत नाही. पण मजा मात्र पहिल्यांदा व्हिडियो पाहिला तेवढीच येते. आता ती मजा काय आहे हे मात्र इथे सांगितलं तर मग काही फायदा नाही. त्यातील गंमत निघून जाईल. त्यापेक्षा आपल्याला जमेल तेव्हा हा व्हिडियो बघा. एव्हाना आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला आम्ही काय म्हणतो आहोत हे जाणवलं असेलच. त्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे नकळत घडलेले किस्से जास्त आनंद देऊन जातात हे ही यानिमित्ताने अनुभवायला मिळतं. मजा येते.

मंडळी हा होता आजचा लेख. आपली टीम विविध किस्से घडतात त्यावर लेख लिहीत असतेच. हा लेख त्यातीलच एक होय. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.