लग्न असो, गॅदरिंग असो, वरात असो वा जत्रा असो… सगळीकडे एक गाणं कायम लावलं जातं आणि त्या गाण्यावर नाचल्याशिवाय लोकांचं मनही भरत नाही. कार्यक्रम कोणताही असो… नागीण डान्स तर झालाच पाहिजे ना भावा… लग्न, उत्सव, वरात, पार्टी अगदी काहीही असो नागिन डान्स केल्याशिवाय कार्यक्रमाला मजाच येत नाही. कार्यक्रमात एक तरी महाभाग असा असतोच जो दा’रुच्या नशेत नागिन डान्स करून दाखवतो. आजवर नागिन डान्सचे विविध प्रकार तुम्ही पाहिले असतील. परंतु असा डान्स तुम्ही नक्कीच पाहिला नसेल. हा व्यक्ती आपण चक्क खराखुरा नाग आहोत असे समजून लग्नात नाचताना दिसत आहे. त्याचा हा डान्स पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. या अनोख्या डान्सचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. गावाकडची काही यंगराट पोरं लै बिलिंदर असतेत. गावाकडच्या या इपितर पोरांमध्ये एक रहेमानी किडा डसलेला असतो. त्यामुळे ही काही ठराविक तळीराम पोरं कायम सर्किटसारखं वागतेत.
आता आमच्या हाती असा एक व्हिडिओ लागला, ज्यात गावाकडची एक नादखुळा गडी नागीण डान्स करत आहेत. सा’प झालेला हा गडी लोळून लोळून एवढा मळाला आहे की, घरी गेल्यावर त्याला बायको हाताने कपडे धुवायला लावील. खरं पाहिलं तर आता सोसायटीच्या निव’डणूक जोरात आहेत. आणि याच निव’डणुकीत अनेकांनी गुलाल उधळला. आता गुलाल कुणीही उधळला तरी काही ठराविक लोकं अशी असतात, जी ज्यांच्या भंडारा तिकडं खोबरं म्हणून जात असतात. आणि पार्टीच्या नावाखाली मोकार मजा करतात. आता अशाच एका कार्यकर्त्याला भलताच जोश आला आणि भाऊ थेट नागीण डान्स करायला लागला. आता सुरुवातीला आपल्याला वाटतं की, या व्हिडिओमध्ये हा माणूस असा शेतात का लोळतोय? पण यामागे कारण त्याच्या अंगात नागिन शिरली आहे… इच्छाधारी वैगरे नागिन नाही तर, गाण्यातली नागिन आहे. या भावाने थेट रस्ता सोडून शेतात डान्स सुरू केला तोही लोटांगण घालून आणि सरपटणाऱ्या नागिनीसारखा. भाऊला एकावेळी अनेक माणसे आवरत होती पण भाऊ मात्र कुणालाही आवरत नव्हता. याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2-3 जण पुढे सरसावले पण त्यांनीही घेतल्याने आणि जास्त झाल्याने तेही याला आवरू शकले नाहीत.
सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा भाऊ खूपच जोशात होता कि त्याला भानच राहिले नाही कि आपण अंगण सोडून शेतात कधी आलो ह्याचे. आता याचा हा व्हिडीओ बघून हा बायकोची बोलणी खाणार हे नक्कीच. बीडमध्ये सध्या सोसायटीच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि निवडणुकीमध्ये विजय झालेल्या उमेदवारचे कार्यकर्ते डीजे लावून नाचत होते. तिथं या कार्यकर्त्याला दारू इतकी चढली की त्यानं नागिन डान्सवर असा काय ठेका धरला की त्याला भानच उरले नाही. डीजे बंद झाला तरी हा युवक डान्स करतच राहिला. याचा डान्स पाहून याच्या अंगात नागिन तर शिरली नाहीना ? असा प्रश्न पडला. कारण याला आवरणही कठीण झालं होत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :