Breaking News
Home / मनोरंजन / असा अतरंगी बँड तुम्ही ह्या अगोदर कधी पाहिला नसेल, कोपऱ्यातल्या पिआनो वाल्याने तर कहरच केला

असा अतरंगी बँड तुम्ही ह्या अगोदर कधी पाहिला नसेल, कोपऱ्यातल्या पिआनो वाल्याने तर कहरच केला

जीवन म्हणजे सुख आणि दु:ख अशा दोन्ही प्रकारांचा मेळ आहे. अनेकदा जीवनात बऱ्याचदा अपेक्षित प्रसन्न क्षण येत नाहीत मग आपण आनंदी राहणं सोडून द्यायचं का?जर असं केलं तर जीवन नीरस आणि कडवट होऊन जाईल. मग प्रसन्नता कशी प्राप्त करावी? … आता हे वाचून जरा डोक्याला शॉट लागला असेल तरी एक गोष्ट लक्षात घ्या. आज शेकडो कोटींचा मालक असलेला माणूस मनसोक्तपणे गुलाबजाम खाऊ शकत नसतो कारण त्याला शुगर असते तर अगदी झोपडीत राहणारा माणूस लोकाच्या लग्नात पोटभर गुलाबजाम खाऊन घरी बांधून आणतो संध्याकाळसाठी… आपण ठरवायचं कोण समाधानी आहे? तर विषय असाय की, आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यात आनंद आणि दुःख दोन्ही आहे. कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम आनंद किंवा दुखी राहू शकत नाही. सुख आणि दु:ख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आनंदा नंतर दु:ख असते आणि दु:खानंतर आनंदी राहणे सामान्य गोष्ट आहे. आनंदी राहणे फार कठीण नाही, परंतु हे सर्व आपल्या दैनंदिन कामांवर आणि आपल्या विचारांवर अवलंबून असते. काही लोक अमाप पैसा, संपत्ती, बंगला, इज्जत, गाडी, नोकर, मोठं मोठे पै पाहुणे असं सगळं काही पुरेपूर असताना झोपताना झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतात तर काही लोक वरीलपैकी एकही गोष्ट नसताना खूप समाधानाने झोपतात आणि सकाळी लवकर उठून कामालाही लागतात.

आता तुम्ही म्हणाल बस झालं लेक्चर… मूळ मुद्द्यावर या… तर आता तसही मूळ मुद्दा लक्षात घेऊ कारण विषय आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा आहे. काहीजण कोठेही बँड वाजताना दिसला की, लगेच त्या ठिकाणी जाऊन इतरांसोबत नाचायला लागतात. त्यांना काहीही फरक पडत नाही. कोणाचं लग्न आहे की लोक काय म्हणतील. त्यांना फक्त नाचण्याचा आनंद घ्यायचा असतो. ते सर्वांसोबत मनमुराद नाचतात आणि नाचल्यानंतर प्रसन्न होऊन निघूनही जातात. अशी लोकं प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक क्षणी आनंद शोधतात. आज आमच्याकडे अशा लोकांचा व्हिडीओ आला आहे, जे कुठल्याही परिस्थितीत आनंदी आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल हे नक्कीच…

या व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, स्टेजवर एक कार्यक्रम चालू आहे. ज्यात 7-8 पोरं एकत्र येऊन वेगवेगळे वाद्य वाजवत आहेत. आणि स्वतः नाचत नाचत फुल एन्जॉय करत आहेत. यातील एकेक मुलगा गाणे वाजवताना आणि नाचताना प्रचंड तल्लीन झालेला आहे. हे त्यांच्या हावभावावरूनच कळते. गम्मत म्हणजे त्यांना बघताना आणि मागे चालू असलेले गाणे बघून आपण हा व्हिडीओ बघताना तल्लीन होतो. मन संपूर्ण एकाग्र होते. काही व्हिडीओजची ही जादू असते, ज्यात आपण गाणे ऐकताना, बघताना एकनिष्ठ होतो आणि आपल्याला समाधान प्राप्त होत असते.

तर या आजच्या व्हिडिओतील ही मुले असाच एक गाण्याच्या तालावर वेगवेगळे वाद्ये वाजवत डोलत आहे. एवढंच काय तर त्यांची वाद्ये ओरिजिनल नाहीत. कुणी डबडे वाजवत आहे तर कुणी फळीचा पियानो केला आहे. कुणी मोठ्या टोपल्याचा ढोल केला आहे तर कुणी नरसाळ हे पिपाणी म्हणून वापरले आहे. त्यात पीआनोवाल्याने तर कहर केला आहे… त्याने काय केले आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ तर बघावाच लागेल ना भाऊ…

व्हिडीओ बघताना आपणही हरवून जातो, खरंतर ही अवस्था म्हणजे आयुष्यच्या एका परमोच्च बिंदूचे समाधान देणारी आहे. एखाद्या ऋषीला अनेक वर्षांची घोर तपश्चर्या करून जे मिळत असेल ना ते समाधान, ती वृत्ती ही या मुलांना काही क्षणात मिळाली असावी, असं मला वाटतं. आता हा व्हिडीओ बघून तुम्हीही नक्कीच समाधानी व्हाल, याची खात्री मला आहे. आता हा व्हिडीओ बघा आणि आनंद घ्या, काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा. ज्या ठिकाणी आनंद मिळेल त्या ठिकाणी जावून इतरांशी समरस होण्याचा प्रयत्न करतात. यालाच तर आनंद मिळवणे म्हणतात, आयुष्य खऱ्या अर्थाने जगणे, हेच असतं.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *