लावा ताकद! असा कलिंगड विक्रेता होणे नाही! आपलं नाणं किती खणखणीत वाजतंयं हे एकदा कळलं ना की मग काहीच अशक्य नाही. जगाच्या बाजारात तुम्हाला कुठेच म’रण नाही. आता या कलिंगड विक्रेत्याचंचं पहा ना, जर कलिंगड आतून खराब निघाला ना की काय होतं ना ते एकदा त्यालाच विचारा. एवढंचं कशाला एखादं कलिंगड चांगलं पारखून बिरखून घरी न्या, आणि चुकून जर का खराब निघालं ना राव तुमची काही खैर नसतेयं. पैसे कसे फुकट गेले इथून सुरू झालेलं लेक्चर तुम्हाला आयुष्यात एक गोष्ट धड बघून घेता येत नाही, तुम्हाला एक काम धड जमत नाही, कोण सांगतंयं नको त्या गोष्टी करायला पर्यंत येऊन पोहोचतील. बाजारात जा, आपल्या माणसांसाठी कलिंगड घेऊन या आणि खराब निघालं तर चुकी कुणाची तुमचीच ना!, असाच हिशोब असतोय.
कलिंगड खरेदी करणाऱ्याला इतकं टेन्शन असतंयं मग विचार करा कलिंगड खरेदी करणाऱ्याला काय काय झेलावं लागत असेल आणि विकतानाही त्याला किती डोक्याला शॉट होत असेल. अशाच एका कलिंगड विक्रेत्याला हेच दिव्य पार करायचं होतं. त्यानं काय केलंयं ते तुम्हीच पहा… लालबुंद असणाऱ्या या कलिंगडाच्या आतील रसरशीत कलिंगडाला पाहून तो भारावलाच आणि वेडा होऊन कलिंगड विकू लागलायं. ग्राहकांनाही त्याची अनोखी पद्धत आवडली. बाजारात जाणाऱ्या पोरासोरांचं लक्षही त्यानं वेधून घेतलं. बोलणाऱ्याची मातीही विकली जाते अन् न बोलणाऱ्याचं सोनही विकलं जात नाही, अशीच काहीशी दुनियेची रीत असते. तेच या कलिंगड वाल्याला कळून चुकलंयं. लालम् लाल म्हणत या पठ्ठ्यानं अख्ख्या मार्केटला आपल्या कलिंगडांची क्वालिटी सांगून टाकलीयं. त्याच्या या कलेचा व्हीडिओही व्हायरल झालायं. त्यामुळं कलिंगड घ्यायला गिऱ्हाईक इथंच येतील हे मात्र, नक्की..
बघा व्हिडीओ :