Breaking News
Home / मनोरंजन / असा क्रिकेटचाहता तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा आयपीएल सामन्यामधला हा अतरंगी व्हिडीओ

असा क्रिकेटचाहता तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा आयपीएल सामन्यामधला हा अतरंगी व्हिडीओ

सालाबादप्रमाणे यंदा आय.पी.एल. ची सुरुवात होते आहे. क्रिकेट म्हणजे धर्म समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात आय.पी.एल. च स्वागत किती जंगी स्वरूपात होतं आणि पूर्ण स्पर्धा होईपर्यंत काय मस्त माहोल असतो हे वेगळं सांगायची गरज नाही. मग यात आपल्या लाडक्या दोडक्या टीम्स आल्या. सोबत आपले लाडके आणि नावडते खेळाडू आलेच आणि या दोन्ही विषयांवर सोशल मीडियावर रंगणारी चर्चा, मिम्स ही आलेच. बरं त्यात अनेक वेळेस आपल्याला आवडणारे खेळाडू आपल्या आवडत्या टीम मध्ये असतीलच याची शाश्वती नसते ना. मग पंचाईत होते ती पाठिंबा देताना. पण मग आपल्या आवडत्या टीमला पाठिंबा देताना आपण या आवडत्या खेळाडूंबद्दलही चांगलं बोलत असतो मग त्यांची टीम कितीही न आवडो. पण मग या दोन्ही टीम्स निदान दोन वेळा तरी एकमेकांच्या समोर उभ्या ठाकणार. तेव्हा ? पण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही वर्षांपूर्वी एका आय.पी.एल. दरम्यान मिळालं होतं. आजच्या वायरल व्हिडियोने त्याची एक गंमतीदार उजळणी करूयात.

हा वायरल व्हिडियो आहे मुंबई इंडियन्सच्या चाहत्याचा. आपल्या टीमला पाठींबा देताना हा चाहता मॅच मध्ये अगदी समरसून गेलेला असतो. मुंबई इंडियन्स च्या नावाचा जयघोष सुरू असतो. त्यातही हा पठ्ठ्या अगदी आघाडीवर असतो. पण मुंबई इंडियन्स च्या खेळाडूंएवढाच एक खेळाडू त्याला प्रिय असतो हे आपल्याला काही वेळाने कळतं. मॅच असते चेन्नई सुपरकिंग्स सोबत. त्यामुळे जेव्हा आपल्या सगळ्यांचं लाडका माही अर्थात महेंद्रसिंग धोनी बॅटिंगला येतो तसा या चाहत्याचा नूर थोडा बदललेला जाणवतो. धोनी पिच कडे कूच करत असताना स्टॅण्ड मध्ये हा चाहता मुंबई इंडियन्स च्या जर्सी वर चेन्नई सुपरकिंग्स ची जर्सी परिधान करतो. अर्थात ही जर्सी असते धोनीच्या नावाने. मग काय जो पर्यंत माही मैदानावर आहे तो पर्यंत हा चाहता अगदी बेभान होऊन त्याला पाठिंबा देत असतो. पण जसा धोनी आऊट होतो, तत्क्षणी विजेच्या चपळाईने याने जर्सी बदललेली असते. त्यामुळे हा चाहता पुन्हा एकदा आपल्याला मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसायला लागतो. त्याच्या या गंमतीशीर वागण्याने आजूबाजूच्या चाहत्यांचंही मनोरंजन झालेलं दिसतं. एक चाहता तर त्याचं हात मिळवत अभिनंदन करताना दिसतो आणि व्हिडियो संपतो.

खळखळून हसवणारा हा व्हिडियो आपल्याला जुन्या आठवणींत घेऊन जातो. खासकरून जेव्हा क्रिकेट मॅचेस स्टेडियम मध्ये जाउन पाहण्याची मजा लुटता येत असे. पण सध्या मात्र स्टेडियम ऐवजी घरी बसूनच ह्या मॅचेस चा आंनद लुटता येणार आहे. करोनाची परिस्थिती निवळली तर निदान पुढील वर्षी तरी स्टेडियम मध्ये बसून मॅच चा आंनद लुटता यायला हवा अशी प्रार्थना करूयात. पण जोपर्यंत हा करोना जात नाही तोपर्यंत आपल्याला अंतर पाळणे, मुखपट्टी घालणे आणि सॅनिटायझर वापरणे हे अत्यावश्यक आहे. आपण ही सगळी खबरदारी घेत असाल हे नक्की. स्वतःची काळजी घ्या. आणि हो, हा लेख शेअर करत वायरल करायला विसरू नका. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *