Breaking News
Home / मनोरंजन / असा जबरदस्त डान्सप्रकार तुम्ही ह्या अगोदर कधी पाहिला नसेल, बघा हा भन्नाट डान्स व्हिडीओ

असा जबरदस्त डान्सप्रकार तुम्ही ह्या अगोदर कधी पाहिला नसेल, बघा हा भन्नाट डान्स व्हिडीओ

मित्राचं लग्न आहे म्हंटलं की आपल्या अंगात जो उत्साह संचारतो ना त्याला तोड नाही. कारण त्या पोट्ट्याच्या लग्नात नाचायला जी काही मजा येणार असते त्याची स्वप्न आपण रंगवत असतो. इतकंच काय तर त्याला आगाऊ सांगूनही ठेवतो की भावा, तुझ्या लग्नात आता आम्ही काय धमाल करतो ते बघच. अर्थात त्याला काहीही सांगायची गरज नसते. कारण त्याने पण अनेक मित्रांच्या लग्नात अशीच मजा, मस्ती आणि धमाल केलेली असते. बरं ही मजा मस्ती मनोरंजक होण्यासाठी एक गोष्ट अतिशय महत्वाची असते. ही गोष्ट म्हणजे डान्स फ्लोअर आणि डीजे. कारण आपला आनंद नाचून व्यक्त करण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. आणि त्यात अपने यार की शादी हैं याचा तुफान आनंद असतोच.

बरं हीच भावना जगभर असलेली दिसते. त्यामुळे लग्न असलं की डान्स हा असतोच. त्यातही मित्रांनी स्पेशली केलेला डान्स ही असतोच. त्याला अर्थातच काही पर्याय आणि अपवाद नसतो. पण काही वेळा या समारंभात तेथील स्थानिक नृत्यांचा ही समावेश केलेला असतो. अगदी आपल्याकडे असतो तसाच हा सहभाग ही मनोरंजक ठरतो. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडियो आज आपल्या टीमने बघितला. या व्हिडियो विषयी अजून सांगण्याआधी हा एक जबरदस्त उत्साहाने भारलेला व्हिडियो आहे हे नमूद करायला हवं. हे मुद्दामहून नमूद करायचं कारण म्हणजे आमच्या टीमने इतके डान्स व्हिडियोज आतापर्यंत बघितले आहेत पण यापेक्षा गतिमान आणि तरीही आवडून जाणारा व्हिडियो हाच पाहिला. आता या व्हिडियो विषयी थोडं जाणून घेऊयात.

त्याआधी हा व्हिडियो काजकाव भागातील असल्याचं वाटतं. या भागातील हा एक स्थानिक नृत्यप्रकार असावा असं वाटतं. यात सहसा एक मुलगी डान्स करत असलेल्या ठिकाणी गोलाकार आकारात फिरत असते आणि तिच्या समोर एकेक करून मुलं येत जातात आणि जबरदस्त पदलालित्य दाखवत असतात. बरं काही काळाने दुसरी मुलगी पहिल्या मुलीची जागा घेते आणि मुलांचा डान्स तर होतच असतो. याच डान्सला लेझिंका डान्स म्हणत असावेत असा अंदाज बांधता येतो. यात संयतपणे डान्स करणारी मुलगी असते आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे मुलं येत असतात आणि डान्स करत असतात. यात हा मुलगा म्हणजे गरुड पक्षाचं प्रतीक मानला जातो अस एके ठिकाणी वाचण्यात आलं आहे. तसेच यात मुली आणि मुलं एकमेकांना कधीही स्पर्श करत नाहीत असं ही कळतं. असो. हा सगळा तपशील आपल्या वाचकांना याविषयी माहिती मिळावी या हेतूने दिलेला आहे. त्यात काही बदल असू शकतात याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी. असो. पण एवढं सगळं जर या डान्स मध्ये होत असेल तर ते या व्हिडियोत बघायला मिळतं का? अर्थातच होय अस हे उत्तर आहे. किंबहूना यात जी मुलं सहभागी होतात त्या मुलांच्या परफॉर्मन्सने तर एकदम जबरदस्त अशीच प्रतिक्रिया आपल्याकडून येते. त्यात सयंतपणे साथ देणाऱ्या मुलींच ही कौतुक वाटतं. त्यांची नजाकत ही आवडून जाते.

बरं मुलांचा परफॉर्मन्स जबरदस्त असतो म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे गतिमान पदलालित्य आणि विविध करामती !यात ही मंडळी, पायांची हालचाल इतक्या वेगाने करतात की हा व्हिडियो मुद्दामहून एडिट केलाय की काय अस वाटावं. पण तस नक्कीच नाहीये. बरं हे सगळं होत असताना ज्या नवऱ्या मुलाचं लग्न आहे त्याला ही मंडळी मागे सोडतील होय. ही सगळी मित्र मंडळी त्याला ही यात सामील करून घेतात. सुरुवातीला या मुलांचा आणि मुलींचा, उल्लेख केल्याप्रमाणे डान्स सुरू असतो. मग मात्र हा मित्रांचा सगळा ग्रुप एकत्र येतो आणि मुली अगदी अलगदपणे बाहेर पडतात. मग मात्र या दोस्तांची दोस्ती बघायला मिळते. मग त्यांचं एकत्र घोळक्यात नाचणं असो वा त्या नवऱ्या भोवती गोलाकार कोंडाळ करत नाचणं असो. खूप मजा येते. इतकंच काय तर ही मंडळी त्या नवऱ्या मुलाला धरून हवेत उडवतात. खरंच पोरं भारतीय असो वा परदेशी, हे असले किडे केल्याचं समाधान जे मिळत ना त्याची तुलना नाही कशाशी ! बरं त्याला एकदा असा काही उडवतात की जवळपास त्या छोट्या छताला पाय लावून येतोय की काय अस वाटतं.

अर्थात थोड्या वेळाने हे सगळ थांबतं पण आपल्या मनात मात्र हा व्हिडियो कायमचा घर करून राहतो. आमच्या टीमला तर हा व्हिडियो प्रचंड आवडला. आता आमच्यात लग्नाळू असे बरेच आहेत. त्यामुळे ती मजा, ती धमाल आणि तो उत्साह अगदी आपलासा वाटला. अगदी व्हिडियोला परदेशी टच असला तरी. तसेच या अद्भुत आणि काहीशा अतरंगी डान्सने ही आमचं मन जिंकून घेतलं.

त्यामुळे आपण यावर लेख लिहावा हे पहिल्याच फटक्यात ठरलं होतं आणि आम्ही या लेखाच्या निमित्ताने ते केलं ही आहे. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.