समारंभ मग तो कुठचाही असो, आनंदात पार पडावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यातही लग्न समारंभ असेल तर सगळं सुव्यवस्थित पार पडावं असं वाटणं ही साहजिकच आहे. अर्थात सुव्यस्थित म्हणताना त्यात आनंद, मजा मस्ती ही अनुभवता आली पाहिजे. अन्यथा सगळं कोरडेपणाने होणार असेल तर मजा निघून जाते. पण लग्नात तशीही गाणं आणि डान्स यांची व्यवस्था केलेली असते, त्यामुळे तेवढासा कोरडेपणा येत नाही. वातावरण हलकं फुलकं राहतं. त्यात हल्ली भटजी आणि डीजे, यांच्या शिवाय लग्न होतंच नाहीत. गंमतीचा भाग सोडला तरी खरं आहे ते !
आता डीजे म्हंटला की डान्स फ्लोअर आलाच. त्यामुळे गाण्यासोबत डान्सही येतोच. आता फक्त एकच गोष्ट अजून हवी असते. ती म्हणजे दणक्यात नाचणारी मंडळी ! उत्साही आणि ऊर्जेने परिपूर्ण अशी मंडळी असतील की मग लग्नात रंग भरलेच म्हणून समजा. अगदी काही क्षणातच ही मंडळी सगळा माहोल आनंदाचा करून सोडतात. आता आमच्या टीमने बघितलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. हा व्हिडियो केवळ ३८ सेकंदांचा आहे. किती ? केवळ ३८ सेकंद ! तसेच आतापासूनच जवळपास चार ते पाच वर्षांआधि तो सोशल मीडियावर शेअर केला होता.
हल्लीच्या या फास्ट जमान्यात गेल्या काही महिन्यातील गोष्टी निष्कामी ठरतात की काय अशी परिस्थिती आहे. पण या अशा परिस्थितीत ही हा व्हिडियो आपल्याला आनंद देऊन जातो. अगदी आजही ! व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा दोन तरुण डान्स फ्लोअरच्या मध्यभागी डान्स करत असतात. बाकी सगळी मंडळी त्यांच्या भोवती कोंडाळ करून उभी असतात. हे दोघेही तरुण पंजाबी असावेत. पार्श्वभूमीवर, ‘कॅप्टन भांगरा दे’ हे सुप्रसिद्ध गाणं सुरू असतं. या गाण्यावर हे दोघे एकदम जोशात नाचत असतात. बरं यात कोणी कोरिओग्राफी केली आहे वगैरे वाटत नसत. जे काही आहे ते त्याक्षणी त्यांना जे आठवत त्यानुसार ते नाचत असतात. पण तरीही काही क्षण असे येतात की त्यांच्यातलं अफाट ट्युनिंग समोर येतं. खासकरून पटकन खाली बसून नाचताना तर दोघांचं टायमिंग आणि डान्स, अशा दोन्ही गोष्टी मन जिंकून जातात. तसेच हे एवढं सगळं इतक्या उत्साहात चाललेलं असतं की आपल्याला ही काही क्षण त्या उत्साहाचा स्पर्श होऊन जातो. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही हे जाणवलं असेलच. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. कारण उत्साही व्यक्ती असलेल्या ठिकाणच वातावरण ही कसं उत्साही होऊन जातं ते यांमुळे कळतं. बरं यासाठी आपला जास्त वेळही द्यावा लागत नाही. केवळ ३८ सेकंद फक्त !
आमच्या टीमने तर यापेक्षा जास्त वेळ हा व्हिडियो बघितला आहे. कारण आम्हाला त्यावर लिहायचं ही होतं आणि तो व्हिडियो आवडला सुद्धा ! म्हणूनच म्हंटलं आपल्या वाचकांना ही याविषयी सांगावं. त्याहेतूने आजचा हा लेख लिहिलेला आहे. आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे.
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा. तसेच आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही आठवणीने वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :