Breaking News
Home / मनोरंजन / असा जबरदस्त स्टंट तुम्ही कधी पाहिला नसेल, परंतु शेवट पाहून मात्र हसू आवरणार नाही

असा जबरदस्त स्टंट तुम्ही कधी पाहिला नसेल, परंतु शेवट पाहून मात्र हसू आवरणार नाही

मध्यंतरी एका मित्राच्या घराजवळ गेलो होतो. तो बऱ्याच मोठ्या सोसायटीत राहतो. त्यामुळे बरीच वर्दळ असते. संध्याकाळची वेळ होती. मुलांचं खेळणं चालू होतं. तिथे काही सायकल्स होत्या. त्यातील काहींच्या टायरना बघून तर एखाद्या बाईकच्या टायरची आठवण यावी. त्यामुळे आपसूक आमच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आपण कसे सायकली, भाड्याने घेऊन चालवत होतो वगैरे…

याचवेळी लक्षात आलं, की आपण बहुधा या विषयी कधी लिहिलं नाहीये. मग नुसतंच कसं लिहावं, एखादा प्रसंग तर हवा. पण कोणाला असा काही प्रसंग आठवेना की ज्यावर एखादा लेख होईल. मग एखादा वायरल व्हिडियो वगैरे असेल तर बघायला हवा वगैरे उपाय सुचले. त्यातूनच आजचा हा लेख, आकारास येत आहे. कारण प्रयत्नांती परमेश्वर असतोच. आमच्या टीमने इंटरनेट वर सर्च केलं, तर काही व्हिडियो दिसले. त्यातील एक बघताना जाम हसलो. हा व्हिडियो तसा जुनाच आहे. कारण याची चित्रफीत ही तशी जुनी असल्याचं जाणवतं.

तसेच हा व्हिडियो कुठे तरी परदेशात चित्रित झाला असावा. पण मंडळी, या व्हिडियोत दिसणारी घटना मात्र आपल्या बाबतीत ही कधी तरी घडली असण्याची शक्यता आहे. कारण, अर्थातच आपले जिगरी पण दलिंदर मित्रमंडळ. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक मुलगा सायकल चालवत असल्याचा क्लोजअप शॉट दिसतो. हळूहळू कॅमेरा पाठी जाऊ लागतो आणि हा मुलगा पूर्णपणे दिसू लागतो. आता हा काय कारनामा वगैरे करून दाखवतो याची उत्सुकता असते. तसा तो करूनही दाखवतो. आपली सायकल, पाठच्या चाकावर तोलून धरण्याचा स्टंट तो करू पाहत असतो. पण बहुधा, त्याच्या मित्राने, त्याच्या सायकलच्या बाबतीत एक कारनामा आधीच करून ठेवलेला असतो. कारण जशी तो सायकल उचलतो तसा पुढचा टायर वेगळा होतो ना महाराजा ! त्या क्षणापासून या पोरांचं जे ओरडणं सुरू होतं ते काही थांबल्या थांबत नाही. आपणही असतो तर आपलीही हीच गत झाली असती. म्हणजे आपल्या बाबतीत कांड झालाय हे कळतंय पण काही करताही येत नाही. बरं, जो चित्रीकरण करतोय, तो खिदळतोय.

यावरून काय ते समजून जावं. आपली सुरुवातीची प्रतिक्रिया, ‘अरे ए…’ अशी असली, तरी नंतर मात्र आपण मनापासून हसत सुटतो. अर्थात व्हिडियो काही चट्कन संपत नाही. पण ते सगळंच इथे आता सांगत नाही. आपण ते स्वतः बघावं आणि त्याचा आनंद घ्यावा असं आम्हाला वाटतं. त्यासाठी आमच्या टीमने खासकरून हा व्हिडियो आपल्या या लेखाच्या खाली शेअर करायचं ठरवलं आहे. तसंही हा लेख, संपत आला आहेच. तेव्हा हा लेख, संपल्या संपल्या, आपण हा व्हिडियो बघू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *