Breaking News
Home / मनोरंजन / असा डान्सिंग अंपायर तुम्ही कधी पाहिला नसेल, सिक्स मारल्यावर ह्या अंपायरने जो डान्स केला तो पाहून हसू आवरणार नाही

असा डान्सिंग अंपायर तुम्ही कधी पाहिला नसेल, सिक्स मारल्यावर ह्या अंपायरने जो डान्स केला तो पाहून हसू आवरणार नाही

खेळ, मग तो कोणताही का असेना, आपली उत्सुकता वाढवणारा, रोमांचक क्षणांची अनुभूती देणारा असतो. अनेकवेळा तर खेळाडू आणि आपण इतके एकरूप होऊन जातो, की त्यांच्या बदल्यात आपणच खेळ खेळतो आहोत की काय असं वाटू लागतं. बरं, ही भावना वैश्विक म्हणावी अशीच आहे. प्रत्येक देशाचा वा प्रदेशाचा स्वतःचा असा आवडता खेळ असतो. आणि तो खेळला जात असताना, वर उल्लेख केलेल्या भावना अगदी उचंबळून येताना आपण पाहतो. त्यातूनच मग कधी तरी, कोणी तरी, केव्हा तरी, काहीतरी वेगळं वागतं आणि मग हसू आवरत नाही.

आपल्याला क्रिकेट सारख्या जेंटलमन खेळात ही हे दिसून येतं. अगदी खेळाडू, प्रेक्षक, यांच्यासकट, पंच सुदधा यात मागे नसतात. बिडी बॉवडेन हे न्यूझीलंड चे पंच आपल्याला सुपरिचित आहेतच. ते पंच म्हणून जेवढे उत्तम आहेत, तेवढेच, त्यांच्या विनोदि शैलीने, निर्णय देण्यासाठी ही प्रसिद्ध आहेत. त्यांनी चौकार, षटकार आणि विकेट यांच्यासाठी तयार केलेली शैली आपल्याला परिचित आहेच. अगदी तुम्ही आजही गुगलवर जाऊन ‘Funny Cricket Umpire’ असं टाइप केलंत, तरी बिली यांचं नाव येतं. यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात यावी. बरं बिलींसारखे अन्य काही पंचही विनोदी असले तरी बिलींची सर त्यांना नाही. पण तरीही हसायला मात्र येतच.

बरं हे केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर चालतं असं नाही. आपल्याकडे तर क्रिकेट हा खेळ अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, सगळ्या व्यक्तींपर्यंत पोहोचला आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे स्थानिक क्रिकेट असो, राष्ट्रीय क्रिकेट सामने असोत वा आंतरराष्ट्रीय सामने असोत, मजेशीर पंच दिसून येतातच. आमच्या टीमने अशाच एका पंचानां एका व्हिडियोच्या माध्यमातून पाहिलं. बरं हे पंच म्हणजे एक उत्साही तरुण आहे. त्याचा उत्साह एका सामन्यादरम्यान इतका शिगेला पोहचलेला दिसून येतो की आपली हसून हसून मुरकुंडी वळते. आमच्या टीमला तर हसूच आवरेना. अर्थात ही सगळी मजा, स्थानिक पातळीवर चालू असल्याने खपून गेली. पण या भावाने जो काही डान्स केलाय ! जबराट ! व्हिडियो सुरू होतो तेव्हा गोलंदाज चेंडू टाकतो. फलंदाज तो चेंडू तटवतो तो थेट सीमारेषेच्या पलीकडे. म्हणजे षटकार होय. समालोचन करणारे दादा तसं जाहीरही करतात. अर्थात त्यांच्या आधी पंचांनी हे सांगितलेलं असतं. पण पंच तेवढ्यावरच थांबलेले असतात का? अजिबात नाही. त्यांचा सळसळता उत्साह, रणवीर सिंगला ही लाजवेल असाच असतो. हा भाऊ, तिथे स्टंप सोडून थेट सिमारेषेकडे धावत सुटतो. समोर प्रेक्षक ही असतात आणि षटकार ठोकला गेला म्हणून गाणं ही सुरू असतं. बरं गाणं ही अगदी मस्त असतं. ‘आला, आला, आला…पाटील आला’ हे ते लोकप्रिय गाणं होय. आणि आपल्याला खरच हे पाटील (पंच), सीमारेषेजवळ येताना दिसतात.

बरं, येतात ते नुसते येत नाहीत. नाचत येतात. बरं नाचतच परत जातील असं वाटतं, तर तसंही नाही. येतात ते थेट, सीमारेषेच्या जवळ फतकल मारून बसतात आणि मग जो काही डान्स करतात, तो बघून हसून हसून वेडं व्हायची पाळी येते. आधीच आपण एवढे हसत असतो, त्यात हा डान्स ! अरे देवा, म्हणत आपण डोक्यालाच हात लावतो. त्याचवेळी वाटून जातं, हे असे पंच, आपण कधी क्रिकेट खेळलो तर असायला हवेत. पूर्ण पैसे वसूल होतील. काय मजा येते मंडळी ! धमाल ! कमाल धमाल ! आपणही हा व्हिडियो बघितला असेल, तर आपल्याला ही हे जाणवलं असेल. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. कारण तसंही आपल्या धावपळीच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण कमी असतात. त्यातील एखादं क्षण अशा मजेशीर व्हिडियोमुळे आला तर अजून लक्षात राहतो. आमची टीम तर हा व्हिडियो लक्षात ठेवणारच आहे. तसेच आपल्या वाचकांसाठीही हा व्हिडियो या लेखाच्या शेवटी शेअर करते आहे. आपण हा व्हिडियो जरूर बघा आणि आनंद घ्या.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *