तुम्ही आजपर्यंत कितीतरी अतरंगी डान्स पाहिले असतील पण असला करंट आणणारा डान्स तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिलेला नसेल. चारशे चाळीसचा झटका देणारे डान्स आपण पाहतो. पण या व्हीडिओत एकदा पोराला पहा. लगीन लोकाचं… आणि नाचतंयं… अशी गत असते काही लोकांची, पण या पोट्ट्यानं जी धमाल केलीयं. त्यानं अख्ख वऱ्हाड खूश करून टाकलंयं. आपण नाचायचं ठरवलं ना की अख्खं गाव येडं करून सोडायचं, असं सांगणाऱ्या या पोरानं अंगात एकदम करंट लावल्यासारखा पार खुळं करुन सोडलंयं सगळ्यांना. डान्स भारी होताच पण डान्स असा करावा की आजूबाजूच्या पब्लिकनंबी एकदम अंगात आल्यागत नाचावं, तसंच काहीसं यानं केलंयं बघा. दादाच्या हळदीत डान्स करताना गाणं असलं भारी लागलं आणि त्याचे जे पाय थिरकलं त्यातून काहीही त्यो मागे येईनाच. गाण्याचा ताल जो धरला आणि बीट पकडला की अंगात हाडं आहेत की नाही, हे कळलेलंचं नाही.
काही लोकांना डान्स करायला ओढावं लागतं. खेचून आणावं लागतं. हळद, लग्न, मुंज साखरपूडा, पार्टी, गणपती डान्स, गरबा असले काहीही प्रकार असूद्याच तिथं चार पाच प्रकारची लोकं तुम्हाला कायम भेटत जातील. एक गणपती डान्स करणारी, डिस्को डान्स करणारी, हीप ह़ॉप, रॅपर आता बरीचशी मंडळी बऱ्याच डान्स प्रकार घेऊन येतात. आपापली सिग्नेचर स्टेप दाखवून पार धुरळा करतात. त्यात एक आणखीही जमात असते ती म्हणजे ओढून न्या मग डान्स करणारी. या प्रकारच्या माणसांना चार पाच लोकांनी ओढून ताणून नेलं नाही तोपर्यंत डान्स काही करायची नाही. डान्स हा त्यांच्या रक्तात भिनलेला असतो पण त्याला स्टार्टर द्यायला एक वेगळा माणूस लागतो. पण हा दादा तर कुठून डान्स शिकून आलायं काय माहिती. व्हीडिओ पुन्हा एकदा बघा म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे डान्स करतानाच्या या प्रकारात जशी गाण्यानं बीट पकडली तशी पोरानं डान्सच्या स्पीडला स्पीड मॅच केला. डान्सला गाणंही तेवढंचं भारी लागलंयं. साई नाच म्हटल्यावर जो साई सुटला आहे तो थांबायचं नावच घेईना. सगळे स्टेप एकाच गाण्यात उतरवणारे काही लोक असतात ना त्यापैकीच एक हे डान्स मास्टर आपल्या डान्सच्या पावरने अख्ख्या हळदीच्या वातावरणाला माहोल करून टाकणाऱ्या या दादाला पोरांनीही उचलून धरलयं.
आता त्याच्या डान्सशिवाय गावात हळद काही होत नाही. एकेकाचा कंड असाच असतो तो ज्याला कीडाही म्हणतात. अधून मधून अशा हळदीत नाचल्यावर का होईना, तो विझवावा लागतो. मध्येच विझला नाही ना तर त्याची गत ही अशी होते. डान्सचा सगळा बांध फूटून जातो. डान्स डान्स आणि डान्स, आपल्या देशात डान्स आणि त्याचे रसिक यांना वेगळं केलं तर त्यांचं वेगळं राज्यच तयार होईल. डान्स करणाऱ्यांना आणि त्यांना दाद देणार्यांची ही संख्या कमी नाही. डान्सचं वेड असणारे हौशी लोक हळद, लग्नाला अशी हौस भागवून घेतात. टॅलेंटची कमी आपल्या गावा गावात कमी नाही. सगळ्या पोरांमध्ये तो कूटून कुटून आणि कुठून कुठून भरलाय. ते तुम्हाला हा व्हीडिओ पाहून लक्षात आलं असलं. तिथं जवळपास एखादा डॉक्टर बिक्टर असता तर चक्कर येऊन पडला असता. माणसाची हाडं अशाप्रकारे फोल्ड होऊ लागलीत म्हटल्यावर त्या डॉक्टरलाच आकडी आली असती. एवढा फाडू डान्स या पोट्ट्यानं दाखवून दिलायं. डान्सचं पॅशन अशाप्रकारे जपलंयं म्हटल्यावर त्याला या वयात एवढी सिद्धी प्राप्त होणं काही सोपी गोष्ट नाही. आपल्याला गरज आहे ती फक्त अशा टॅलेंटला दाद देण्याची पुढे आणण्याची.
बघा व्हिडीओ :