Breaking News
Home / मनोरंजन / असा डान्स तुम्ही ह्या अगोदर कधी पाहिला नसेल, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स पाहून तर हसू आवरणार नाही

असा डान्स तुम्ही ह्या अगोदर कधी पाहिला नसेल, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स पाहून तर हसू आवरणार नाही

समारंभ म्हटलं की त्याच्याशी निगडित प्रत्येकात उत्साह आणि ऊर्जा अगदी ओसंडून वाहत असते. इतकी की काहींना आपल्या या उत्साहाला आवर घालता येत नाही. त्यात ते काही ना काही अतरंगीपणा करून जातात. काहीवेळा याचमुळे त्या समारंभात गंमत ही येते आणि अशा उत्साही प्रभूती धमाल ही आणतात. पण अति तेथे माती ही असतेच. त्यामुळे आपल्या उत्साहाचा आणि उर्जेचा इतर कोणाला त्रास होणार नाही हे बघणं महत्वाचं असतं. ज्यांना स्वतःहून किंवा अनमानधपक्याने स्वतःला आवरायला जमतं ते त्या त्या समारंभात मस्त मजा करतात आणि आपसूक दुसऱ्या उपस्थितांचं ही मनोरंजन करून जातात.

त्यात हल्लीचा काळ हा सोशल मिडियाचा आहे. त्यामुळे समारंभात होणाऱ्या गंमती जंमती वायरल होणं हे काही आपल्याला नवीन नाही. किंबहुना अधे मधे कधी तरी एखादा व्हिडियो समोर येतो आणि त्यातील अतरंगीपणा आपल्याला लोटपोट करून हसवतात. बरं याला काही कुठंच ही बंधन नसतं. त्यामुळे समारंभ लग्नाचा आहे, की वाढदिवसाचा एखाद्याचा उत्साह गगनाला भिडला की आपलं मनोरंजन ठरलं म्हणून समजा. त्यात डान्स वगैरे असेल आणि सोबतीला डीजे एकदम जबरदस्त असेल तर क्या बात हैं.

जबरदस्त डीजे म्हणजे माहोल बघून आणि लोकांना त्यावेळी आवडतील अशी गाणी वाजवणारे डीजे. कारण अशी काही गाणी ऐकली की उत्साह अजून गहिरा होत जातो ना भाऊ. मग अजून चेव येऊन डान्स केला जातो. यात का कोणास ठाऊक पण नागीण डान्स करणारे खूप असतात. त्यांच्यातील सगळ्या भावना यावेळी गडबडा लोळून बाहेर येत असतात. मग येतात ते पूर्णपणे काटकोनी डान्स करणारे. त्यांच्याकडे पाहून त्यांचा उरलेला व्यायाम ते इथे करत असावेत असं वाटतं. अर्थात या डान्स प्रकारात आपणही कधी ना कधी येतोच हे ही खरं. असो. पण याउप्पर ही एक जबरदस्त प्रकारचा डान्स परफॉर्मन्स असतो. चेहऱ्याने डान्स करणारे. अर्थात काही जण हे खरंच प्रोफेशन फेस डान्सर असतात. हा उल्लेख त्यांच्याविषयी नाहीये हे लक्षात घ्या. कारण ते त्यांची कला सादर करत असतात. आपण ज्यांच्याविषयी बोलतो आहोत ती मंडळी, यात येत नाहीत. आपला विषय ज्यांच्या विषयी आहे ती मंडळी जरा ‘धुंदीत’ असणारी असू शकतात किंवा अंमळ जास्तीच उत्साही असू शकतात किंवा दोन्ही. असो. मुद्दा काय, तर त्यांचा डान्स म्हणजे जबराट असतो. आपल्या टीमने एक व्हिडियो पाहिला होता. हा व्हिडियो म्हणजे त्याच अगदी प्रातिनिधीक उदाहरण आहे. यात एक उत्साही व्यक्ती आपल्याला दिसून येते. शॉर्ट व्हिडियो असल्याने काही सेकंदच चालतो.

पण व्हिडियो बघून तुम्ही जे हसता ना ते हसणं काही मिनिट पुरतं. कारण या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव विनोदी असतात. त्यात पाठीमागे डीजेने ‘लोग केहते हैं मैं शराबी हुं’ हे शराबी चित्रपटातलं गाणं लावलेलं असतं. त्यामुळे अजून रंगत चढते. कधी घाबरल्यासारखे तर कधी हसल्याचे हावभाव करत हा भाई नाचत असतो. आपण ही जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्या ही आवडला असणार आहे हे नक्की. एक मात्र नक्की की या भावाने त्या समारंभात अतरंगी डान्सने अजून धमाल उडवून दिली असणार हे नक्की. आपण हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर पहा. तेवढाच दगदगीच्या वातावरणातून जरा बाहेर पडाल.

चला तर मंडळी हा होता आपल्या टीमने लिहिलेला आजचा लेख. हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.