Breaking News
Home / मनोरंजन / असा डान्स बॉलिवूडमध्ये ह्याअगोदर कोणत्या अभिनेत्रींनीं केला नसेल, बघा डान्सची खरी जुगलबंदी

असा डान्स बॉलिवूडमध्ये ह्याअगोदर कोणत्या अभिनेत्रींनीं केला नसेल, बघा डान्सची खरी जुगलबंदी

प्रत्येक कलेचं सादरीकरण हे अतिशय महत्वपूर्ण असतं. त्यातून त्या कलेचे अनेक पैलू समोर येत असतात. हीच बाब द्विगुणित होते जेव्हा एखादं सादरीकरण ही दोन कलाकरांमधील जुगलबंदी असते. कारण दोन्ही कलाकार त्यांना अभिप्रेत असल्याप्रमाणे कलेला सादर करत असतात. यातून तत्क्षणी कोणाचं सादरीकरण आवडलं याचं मूल्यमापन होऊ शकतं. पण खरं तर कलारसिक म्हणून आपण मात्र आपलं दोन्ही सादरीकरणातून मनोरंजन होतं. हाच अनुभव आपल्याला अनेक वेळेस आपल्या चित्रपटांतील काही प्रसंगातून घेता येतो. खासकसरून जेव्हा दोन कलाकार किंवा दोन समूह हे नृत्य प्रकारात जुगलबंदी करत असतात.

या प्रसंगी आठवण होते ती आम्रपाली चित्रपटाची. यात आम्रपाली या व्यक्तिरेखेचं आयुष्य चितारलेलं आहे. सुनील दत्त साहेब आणि वैजयंतीमाला जी यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट. या चित्रपटात एक प्रसंग असा आहे की ज्यात आपल्याला आम्रपाली ही राजा आणि राव उमराव यांच्या समोर आपलं नृत्य पेश करताना दिसून येते.

पण याची सुरुवात होते ती दुसऱ्या एका नृत्यांगनेच्या नाचापासून. खरं तर काही नृत्यांगना या नृत्य सादर करत असतात. पण तेव्हाच या नृत्यात काही सदोष गोष्टी आहेत असं आम्रपाली ठामपणे सांगते. त्यावेळी कदाचित मुन्शी किंवा अमात्य असावेत ते उठून उभे राहतात. ते समजावून सांगतात की भर सभेत एखादया कलेत काही चूक किंवा बरोबर सांगण्याचा अधिकार प्रत्येकाला नाही. जर तसं केलं तर स्वतःचं म्हणणं पटवून द्यावं लागतं अन्यथा शिक्षेस पात्र असावं लागतं. हे ऐकून आम्रपाली सोबत आलेली मंडळी बावरतात. पण ती मात्र ठाम असते. ती थेट सादरीकरणाच्या जागी येते. एव्हाना संगीत सुरू होतं. आम्रपाली स्वतःचं नृत्य कौशल्य दाखवत असते. त्याचवेळी मघाशी जीचं नृत्य सुरू असतं ती नृत्यांगना पुढे सरसावते. मग पूढील काही वेळ दोघींमध्ये एकाच संगीतावर सामाईक डान्स स्टेप्स करत जुगलबंदी होते. दोघीही तोडीस तोड नाचत असतात. दोघींचा अभिनिवेश बघण्यासारखा असतो. या दोघींच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ही जुगलबंदी पुढे सरकते आणि मग नृत्याला सोबत लाभते ती साहित्याची. सुरुवातीस दांडिया खेळल्यासारखा डान्स केला जातो. मग झांजा वाजवल्या जातात. त्यात आम्रपाली ही व्यक्तिरेखा वरचढ ठरत असल्याचे अगदी सहज कळून येतं.

पण गंमत तर यापुढे आहे. नृत्य, सोबत साहित्य असा सामना रंगला असताना रांगोळी आणली जाते. प्रथमतः आम्रपालीची स्पर्धक पुढे सरसावते. तिच्या जवळ तबक घेऊन दासी असतेच. त्यातील रंग घेत ही स्पर्धक सुंदर असा मोर जमिनीवर चितारते. मग वेळ असते ती आम्रपालीची. ती मूलतः आत्मविश्वासपूर्ण असल्याने या आव्हानासाठी तयार असते. ती ही रंग घेते आणि वनराज सिंह चितारते. मग ही जुगलबंदी अजून पुढे सरकते.दोघीही तोडीस तोड वाटतात पण अपेक्षेप्रमाणे आम्रपाली निर्विवाद वर्चस्व गाजवत यशस्वी होते.

या चित्रपटाचे हक्क शाहरुख खान यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट कडे अबाधित आहेत. त्यांच्या युट्युब चॅनेल वरून हा व्हिडियो पाहता येतो. कित्येक करोड लोकांनी या अभूतपूर्व जुगलबंदीचा आस्वाद घेतला आहे. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याला ही तो आवडला असणार हे नक्की. आपल्या टीमला तर तो आवडलाच. सोबतच आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल असं वाटलं म्हणून हा लेखप्रपंच. आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया, सूचना यातून आम्ही सातत्याने शिकत असतो आणि सुधारणा करत असतो. तसेच आम्हाला प्रोत्साहन मिळतं त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. येत्या काळातही आपला हा स्नेह वाढीस लागो हीच सदिच्छा. आपल्या आमच्यावरील प्रेमासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.