Breaking News
Home / मनोरंजन / असा वडील पुन्हा होणे नाही… मुलीची विदाई करताना वडिलांची अतरंगी रिॲक्शन पाहुन हसु आवरणार नाही

असा वडील पुन्हा होणे नाही… मुलीची विदाई करताना वडिलांची अतरंगी रिॲक्शन पाहुन हसु आवरणार नाही

लोक आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लग्नाचे व्हिडिओ पाहाताना दिसतात. त्यामुळे, लग्नाचे सगळ्याच प्रकारचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. कधी कधी व्हायरल होणारे हे व्हिडीओ एकदम विचित्र आणि डोक्याला शॉट लावणारे असतात तर काही एकदम निखळ मनोरंजन करणारे असतात. भर कोरोना काळातही काही लग्न जोमात झाली कारण आपल्याकडे लग्न म्हणजे एखाद्या उत्सव आणि सणाप्रमाणं केलं जातं. गडबड, गोंधळ, धिंगाणा, मजा, सुग्रास जेवण, मान अपमान अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडच्या लग्नात असतात. लग्नात काही महत्वाच्या वेळा असतात, त्यापैकी एक म्हणजे वरातीची आणि दुसरी म्हणजे नवरीला पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा. जेव्हा नवरीबाई आणि नवरदेव एकमेकांना वरमाळा घालतात. यानंतर स्टेजवर येऊन ज्याला त्याला हवा करायची असते. एवढंच नाहीतर काही जणांना नवरीची किंवा नवऱ्याची चेष्टा मस्करी करायची असते… वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढायचे असतात. तर बिदाई म्हणजेच पाठवणीच्या वेळेसही एकदम रडारडी सुरू असते.

यादरम्यान अनेकदा अशा घटना घडतात, ज्यामुळे आपण एकदम आश्चर्यचकित होतो. मात्र या घटना सर्वांच्या डोक्यात फिट होतात. या गोष्टी ज्या नंतर खूप गोड किंवा नको वाटणाऱ्या आठवणींच्या स्वरुपात कायम स्मरणात राहातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ जुना आहे मात्र हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदाचा आहे, ज्यात आपल्याला अशी काही कॉमेडी बघायला मिळाली आहे की, जी तुम्हाला आजवर कोणत्याच लग्नात पाहायला मिळाली नसेल.

तर लग्नात अनेक भावुक करणारे क्षण येतात, जिथे नवरीच्या आई-वडिलांच्या बांध फुटतो. पण या सगळ्या पलीकडे लग्नातला सगळ्यात भावूक करणारा क्षण म्हणजे जेव्हा नवरी जिथे आपलं आयुष्य घालवला, त्या घराचा निरोप घेते तेव्हा, आई-वडिलांचा निरोप घेते तो क्षण सगळ्यात भावुक असतो. ती आता तिच्या पतीसोबत तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करण्यासाठी निघते. त्या क्षणी वधूला तिचं घर तिचे आई-वडील आणि भाऊ-बहिण आठवतात. पण कोणत्याही मुलीसाठी सगळ्यात भावनिक क्षण हा तिच्या वडिलांपासून लांब जाणं हा असतो.

खरंतर हा फक्त मुलीसाठी नाही तर तिच्या वडिलांसाठीही असतो. मात्र कधी कधी वडील हे अतरंगी असतात, मुलीला पाठवणी करतानाही ते कॉमेडी करण्याच्या मूड मध्ये असतात. असाच हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, लग्नानंतर विदाईचं वातावरण आहे आणि मग अचानक नवरीने वडिलांना पाहून मिठी मारली. यावेळी वधू खूप भावूक झाली असून ती वडिलांच्या छातीवर डोके ठेवून रडते. यावेळी तिचे वडिलही आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून भावूक होण्याचा अभिनय करत आहे. नंतर, नववधू वळताच तिचे वडील मागून दोन्ही हात वर करून नाचू लागतात. वधूच्या वडिलांना पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. काही जण मोठमोठ्याने हसू लागले. नववधू निघू लागताच वडील मस्त नाचू लागतात आणि जवळ उभे असलेले पाहुणे हसायला लागतात. वधू मागे वळून पाहताच तिचे वडील पुन्हा भावूक होण्याचा अभिनय करू लागतात. अवघ्या 20 सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.