आपल्या सर्वांच्या आयुष्यात शिक्षकाचं स्थान नेहमीच सर्वोच्च मानलं गेलं आहे. प्राचीन भारतीय मान्यतेनुसार, शिक्षकाचं स्थान देवापेक्षा वरचं मानलं जातं, कारण तो शिक्षकच आपल्याला योग्य आणि अयोग्य काय ते सांगत असतो, शिकवतो आणि चांगली कृती करण्यास प्रोत्साहन देतो. म्हणूनच शिक्षकांना शिष्याचा खरा मार्गदर्शक म्हटलं जातं. मात्र, आजच्या काळात लोकांना शिक्षकांचं महत्त्व कळत नाही. अनेक ठिकाणी अनेकदा त्यांच्यासोबत मारहाणीच्या बातम्या येत असतात, मात्र काही शिक्षक असे आहेत, की जे त्यांच्या शिक्षणाचा मान राखून देवासारखे पूजले जातात.
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये एका शिक्षकाच्या निरोपावर सर्वांचे डोळे ओलावले आणि मुले ढसाढसा रडू लागली. आजच हा व्हायरल झालेल्या शिक्षकाचा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील आहे. या व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, एका शिक्षकाच्या बदलीनंतर विद्यार्थी हमसून हमसून रडत आहेत. काही विद्यार्थी आपल्या या आवडीच्या गुरुजींना बिलगून रडत आहेत. गुरुजी त्यांची समजूत काढत आहेत.
गुरुजी आणि विद्यार्थ्यांचं हे नातं तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत अजून माहिती मिळाली नसली तरी सोशल मीडियावर या भावनिक नात्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. खरं पाहिलं तर आई वडिलांनंतरचा गुरु म्हणजे शिक्षक. शिक्षक मुलांना कितीही रागावला तरीदेखील त्याला शाळेत आल्याशिवाय, विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय चैन पडत नाही. वर्षानुवर्षे शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाला कुठेतरी उसंत घ्यावी लागते. त्यासही मर्यादा असतात त्या पाळणे गरजेचे असते. अशाच एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांना सोडून दुसऱ्या शाळेवर बदलीमुळे शिकवायला जावे लागत आहे. शाळेत त्यांचा तो दिवस शेवटचा दिवस होता. शिक्षकाचा स्वभाव, शिकवण्याची कला, बोलण्याची ती अनोखी शैली यामुळे आवडते शिक्षक म्हणून ते शाळेत परिचित होते.
मुलांना त्यांच्यावाचून करमत नसे अन मुलं नसली की त्यांनाही अतोनात त्यांची आठवण येत असे. असे अशा या भारी व्यक्तिमत्व असलेल्या शिक्षकाच्या बदलीचा दिवस आला अन नियमाप्रमाणे त्यालाही शाळेला अखेरचा सलाम करावा लागला पण यावेळी विद्यार्थ्यांची जी अवस्था आहे, ती अतिशय केविलवाणी आहे.
एवढे दिवस शाळेत शिकवल्यानंतर शिक्षकाला शाळेच्या वतीने निरोप दिला जात होता. सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी अन विद्यार्थिनी शाळेच्या आवारात जमले होते. काही विद्यार्थ्यांना शिक्षक आवरत होते पण तरीही विद्यार्थी सरांच्या गळ्यात पडून पडून रडत होते. शिक्षकांना निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. कुणी शिक्षकांचे पाय धरत होते, तर कुणी शिक्षकांना मिठी मारत होते. अशा या ग्रेट शिक्षकाला आमचा सलाम…
बघा व्हिडीओ :