Breaking News
Home / मनोरंजन / असा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी

असा संबळ डान्स तुम्ही ह्याअगोदर पाहिला नसेल, बघा डान्सची हि अनोखी जुगलबंदी

आतापर्यंत आपण अनेक डान्स वायरल व्हिडियोज बघितले असतील. आपल्या टीमने वायरल व्हिडियोज वर लिहिलेले अनेक लेखही डोळ्यांखालून घातले असतील. पण मंडळी, आज आपल्या टीमने जो वायरल व्हिडियो बघितला आहे ना, त्याच्यासारखा भन्नाट वायरल व्हिडियो क्वचित बघायला मिळतो. आपल्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि तत्क्षणी निर्णय घेतला की यावर लेख लिहायचा. कारण आमच्या टीमसाठी हा एक जबरदस्त अनुभव होता आणि तुमच्या पर्यंत तो अनुभव पोहोचावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. चला तर मग या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.

आपला महाराष्ट्र हा लोककलेच्या दृष्टीने किती समृद्ध आहे हे काही वेगळं सांगायला नको. या महान राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी विविध लोककला दडलेल्या आहेत. त्यातीलच एक लोककलाप्रकार म्हणजे संबळ नृत्य होय. प्रामुख्याने नाशिक, खानदेश या भागात सादर होणारा हा नृत्यप्रकार. नावावरून आपल्याला कळलं असेलच की संबळ हे वाद्य वापरून संगीत वाजवलं जात आणि त्यावर जे नृत्य होतं ते संबळ नृत्य. या नृत्याचे विविध व्हिडियोज प्रसिद्ध आहेत. पण यंदा सगळ्यांत लक्षवेधी ठरलेला व्हिडियो म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला वायरल व्हिडियो आहे.

हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा दोन खंदे तरुण आपल्याला समोर दिसून येतात. सोबत संबळ वाजत असते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा लक्षात येतं की या दोघांचा डान्स सुरू झाला आहे. एकप्रकारे त्यांची जुगलबंदी चालू असते. त्यात कौतुकास्पद ठरतो तो त्यांचा आवेशपूर्ण डान्स. दोघंही हात उंचावत असा काही डान्स सादर करत असतात की आजूबाजूला उपस्थित असलेली बरीचशी मंडळी त्यांच्या आजूबाजूला येऊन गोलाकार उभी राहतात. हात उंचावत डान्स सुरू असला तरी त्यांचं पदललित्य अगदी खास लक्षात राहतं. त्यात दोघांचा आवेश असा असतो की जणू दोन योद्धे एकमेकांशी भिडण्या अगोदर खडाखडी करत आहेत. त्यात दोघांपैकी एक दादा तर मोठ्याने आवाज करत त्या डान्समध्ये अजून जान फुंकत असतात. या डान्स मधील काही स्टेप्सची सुरुवात ही त्यांनी केलेली दिसून येते. समोर असलेले गॉगल लावलेले दादा सुद्धा तोडीस तोड असतात बरं !! एका स्टेप ला तर संबळच्या तालावर असे काही लयीत नाचतात की मन जिंकून जातात.

मग पुन्हा आवेशपूर्ण डान्स सुरू असतो. त्यात मस्त अशी चढा ओढ दिसून येत असली तरी त्यात कुरघोडी करण्याची इच्छा दिसून येत नाही. वर उल्लेख केलेले पहिले दादा डान्स करताना एक मस्त स्टेप सुरू करतात. हातांचा वापर करत अगदी झोकून देत त्यांची स्टेप चाललेली असते. गॉगल वाले दादा पण तशीच छान स्टेप करत असतात. तेवढ्यात पहिल्या दादांच्या शूजची लेस सुटते आणि ते थांबतात. त्यावेळी हे दुसरे दादा ही काहीसे शांत होऊन डान्स करत असतात. कुरघोडी करायला जात नाहीत. हे बरं वाटतं. कारण खेळीमेळीचे वातावरण यांमुळे कायम राहतं हे विशेष. याच वातावरणात पूर्ण अडीच मिनिटे हे दोघेही धमाल डान्स करत राहतात.

हा व्हिडियो अडीच मिनिटांचा आहे खरा, पण त्यातील ऊर्जा आपल्याला त्या अडीच मिनिटांनंतर ही पुरते. किंबहुना आपण हा व्हिडियो एकदा पाहिल्या नंतर ही इतके वेळा पाहतो की विचारू नका. याच एक प्रमुख कारण म्हणजे यात विविध डान्स स्टेप्स असल्या तरीही त्या ठरवून केलेल्या नाहीयेत. त्यामुळे त्यात साचेबद्धपणा येत नाही. त्यात एक मोकळेढाकळेपणा आहे जो प्रेक्षकांना खूप आवडतो.

आपल्या टीमने ही हा व्हिडियो एकदा बघितला आणि पहिल्याच फटक्यात आम्हाला तो आवडला. आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आम्ही काय म्हणतो आहोत हे तुम्हाला कळलं असेलच. पण तुम्ही हा व्हिडियो पाहिला नसेल तर आवर्जून पाहा, आपल्याला नक्की आवडेल. तसेच मंडळी, आपली टीम आपल्या वाचकांसाठी म्हणजेच आपल्यासाठी नेहमी वैविध्यपूर्ण लेख घेऊन येत असते. त्यावर आपल्या ज्या प्रतिक्रिया येतात त्यावरून आम्हाला नवनव्या गोष्टी कळतात तसेच प्रोत्साहन ही मिळते. यातूनच मग नवनवे लोकप्रिय लेख लिहिले जातात. तेव्हा आपलं हे प्रेम आणि प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहो ही सदिच्छा. आणि हो… लेख वाचत राहा, शेअर करत राहा !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.