सध्या सगळीकडे तापमानवाढ हा विषय अगदी चर्चेचा विषय ठरला आहे. कारणही तसंच आहे म्हणा. कारण गेल्या दीड दोन महिन्यात या उष्णतेने आपल्याला अगदी धुपवलं आहे. अगदी बाहेर कुठे जायचं तरी आपल्या कपाळावर आठ्या येतील अशी परिस्थिती आहे. कारण अशा गरम वातावरणात बाहेर गेलं तरी धड काही सुधरत नाही, तसेच घामाच्या धारांनी अजून चिडचिड होते. त्यामुळे आपसूक काम होईनाशी होतात. त्यामुळे कधी एकदा घरी, ऑफिसला किंवा एखाद्या आडोशाला जातोय असं वाटायला लागतं.
अर्थात हे सगळं आपल्या बाबतीत होतं, तसंच इतरांच्या बाबतीत ही होत असणार. त्यातही वाहनचालक, सिक्युरिटी गार्डस आणि ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचे किती हाल होत असतील याचा विचारच केलेला बरा. पण यातील बहुतेक सगळी मंडळी आहे त्या परिस्थितीत ही जुळवून घेतात आणि त्यावर मात करतात. तर काही मंडळी एक पाऊल पुढे जात, या परिस्थितीत ही आनंदी राहतात. खरं तर हे जवळजवळ अशक्य वाटतं. पण माणसाने आनंदी राहायचं ठरवलं की स्थळ, काळ, वेळ यांचं बंधन त्याला राहत नाही. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या टीमने बघितलेला व्हिडियो होय.
हा व्हिडियो दीड मिनिटांचा आहे. या दीड मिनिटांत आपल्याला एका दादांचा डान्स बघायला मिळतो. हे दादा एके ठिकाणी सिक्युरिटीच काम करत असावेत अस त्यांच्या पोषखावरून वाटतं. तसेच ते एखाद्या महामार्गावर असलेल्या ठिकाणी बहुधा रेस्टॉरंट मध्ये काम करत असावेत. अर्थात ते कुठेही काम करत असतील तिथे आनंदाच वातवरण असणार हे नक्की. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा हे दादा स्लो मोशन डान्स करायला सुरुवात करतात. नंतरही हा डान्स स्लो मोशन मधेच होत राहतो. या स्लो मोशन सोबतच दोन गोष्टी पूर्ण व्हिडियोभर कायम असतात. त्या महामार्गावर असलेली वर्दळ आणि त्या दादांचं हास्य. खरं तर ते डान्स करत असतात ती जागा काही डान्स फ्लोअर नक्कीच नसते. महामार्ग शेजारूनच जात असल्याने प्रचंड प्रमाणात धूळ उडत असते. तसेच वाहनांचे हॉर्न सातत्याने ऐकू येत असतात. त्यामुळे शांतता ही नावाला ही नसते. तसेच सूर्य वर आकाशात तळपत असतो. त्यामुळे तेवढाच काय तो प्रकाश असतो, बाकीची लायटिंग वगैरे काहीच नसते. एकूण काय तर सगळी परिस्थिती प्रतिकूल म्हणावी अशीच असते. पण या दादांचा स्वभाव मात्र आहे त्या परिस्थितीत आनंद घेण्याचा असतो. याचाच प्रत्यय त्यांच्या डान्स मधून येत असतो. हसत मुखाने ते डान्स करत असतात.
तसेच या व्हिडियोचं एक वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतंही गाणं ऐकू येत नाही. कारण ते दादा या कॅमेऱ्यापासून थोडे दूर असतात आणि वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे दादा काय गात असतात ते त्यांचं त्यांनाच ऐकू येत असत. आपण फक्त त्यांचा डान्स बघत असतो. पण प्रतिकूल परिस्थितीत ही हा असा मस्त डान्स त्यांनी केल्याने आपणही हा डान्स अगदी आनंदाने बघतो. विचार केला तर एरवी आवाज नसलेला दीड मिनिटांचा व्हिडियो आपण बघू का? अगदीच क्वचित. इतकंच काय तर व्हिडियोची सुरुवात आवडली नाही तर एका मिनिटाच्या आत, आपण व्हिडियो बंद करतो. फार वेळ घेत नाही. पण हा व्हिडियो मात्र त्यास अपवाद आहे. कारण अर्थातच डान्स करणारे ते दादा. माणसावर वेळ येते म्हणून अशी कठीण कामं करावी लागतात. पण या कठीण काळात आपल्यात एखादी कला असेल तर तीच आपल्याला काही क्षण आनंदाचे देऊन जाते. या दादांच्या बाबतीत हीच गोष्ट डान्समुळे होते. या लेखाच्या निमित्ताने या दादांना उत्तम आयुष्य मिळो ही सदिच्छा. तसेच त्यांचा डान्स ही या लेखाच्या माध्यमातून आणि सोशल मीडियावरून प्रसिद्ध होवो आणि त्यांना प्रोत्साहन मिळो हीच सदिच्छा !
बरं तर मंडळी, हा होता आमच्या टीमने लिहिलेला आजचा लेख ! या लेखाच्या शेवटी आपल्या वाचकांसाठी आम्ही वर उल्लेख केलेला व्हिडियो शेअर केला आहे. तो जरूर पहा आणि त्या दादांच्या मस्त डान्सचा आनंद घ्या. तसेच आपल्या टीमचे अन्य लेखही वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :