Breaking News
Home / मनोरंजन / असे संबळ नृत्य तुम्ही ह्याअगोदर पाहिले नसेल, भाऊंनी सर्वांसमोर केला मनापासून डान्स

असे संबळ नृत्य तुम्ही ह्याअगोदर पाहिले नसेल, भाऊंनी सर्वांसमोर केला मनापासून डान्स

तुम्ही कितीही महत्वाच्या कामात असा, कुठल्याही ठिकाणी असा. जेव्हा तुमच्या कानावर संबळ, ताशा, ढोलकी आणि सनई अशा वाद्यांचा सूर कानावर पडतो तेव्हा आपोआप तुमचे अंग डुलायला सुरू करते. तमाशातली ढोलकी असो वा जागरण गोंधळातील संबळ असो. ते वाजायला लागले की, आपले शरीर आणि मन उत्स्फूर्त होते आणि आपले पाय हळूहळू थिरकायला लागतात. पण ईच्छा असूनही आपण विविध कारणांनी नाचायचे टाळतो. लोक काय म्हणतील? हे आपलं वय आहे का नाचायचं? आपल्याच घरच्या कार्यक्रमात आपण कसं नाचणार?, असे विविध प्रश्न आपल्याला छळतात. पण समोर वाद्यांनी ताल असा धरलेला असतो त्यामुळे आपल्या मनावर ताबा ठेवता येत नाही. आणि थोडी का होईना आपण उभ्या उभ्या कंबर हलवत असतो. एखादा पाय जमिनीवर आपटून त्या लयीला प्रतिसाद देत असतो.

मात्र अशा ठिकाणी काही दिलखुलास नग असतात. जे कुठलेही काम मनमोकळ्यापणे करतात. मग नाचणं असो गाणं असो वा उनाडक्या करत फिरणं असो… सगळं काही एकदम मस्तमौला… या लोकांचं हसणंही सात मजली आणि मनमोकळं असतं. असाच एक व्हिडीओ आमच्या हाती लागला. ज्यात नाचणारा तर नाचतच होता पण नाचणारा इतका उत्स्फूर्तपणे नाचत होता की, त्यासोबत वाजवणाराही नाचू लागला. या व्हिडीओत आपल्याला २ प्रकारची जुगलबंदी दिसून येईल. पहिली म्हणजे संबळ आणि सनई या वाद्यांची. दुसरी जुगलबंदी आहे ती नाचणारा आणि वाजवणाराची. नाचणारा एकदम गावाकडचा कार्यकर्ता आहे. त्याला पद्धतशीर नाचण्याचा कुठलाही गंध नाही. मात्र संबळ आणि सनई ज्या पद्धतीने माहोल बनवत आहे त्याच तालावर हा गडी जमेल तसे नाचत आहे. आजूबाजूला कोण आहे, याचा लवलेशही या गड्याच्या तोंडावर दिसत नाही. आजूबाजूला काही महिला उभ्या आहेत. २ आजीही आहेत त्याही या यंग्राट नाचणाऱ्या गड्याला पाहून हसत आहेत.

परंतु नाचणारा हा गडी मात्र कशाचीही फिकीर न करता संबळ आणि सनईच्या तालावर आपला नाच जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. संबळ वाजावणाऱ्या काकांचेही साठी ओलांडलेली वाटत आहे मात्र त्यांच्या वाजवण्यात आणि नाचण्यात असणारा जोश एखाद्या तरुणाला लाजवेल, असा आहे. ‘जुनं ते सोनं’ या म्हणीला साजेसा असा माहोल या वाजंत्री काकांचा आहे. त्यांचा उत्साह, ऊर्जा ही एकदम अनोखी आहे. ‘अस्सल मराठी रांगडेपणा’ ज्यात असतो, अशी ही जुगलबंदी आहे. यातील वाद्ये तुम्हालाही थिरकायला मजबूर करतात, हे नक्की. हि जुगलबंदी पाहून तुमचं मनोरंजन होईल, हे १००% नक्की. आम्ही व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पाहून घ्या. आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. मराठी गप्पाला मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *