Breaking News
Home / मनोरंजन / असे हळदीला नाचणारे मित्र आले तर नवरदेवाचे हेच हाल होणार, व्हिडीओचा शेवट पाहून हसू आवरणार नाही

असे हळदीला नाचणारे मित्र आले तर नवरदेवाचे हेच हाल होणार, व्हिडीओचा शेवट पाहून हसू आवरणार नाही

काही माणसं अशी असतात ना की जिथे जातात तिथे स्वतःचं नाव काढून येतात. अर्थात या वाक्याला एखाद्या नाण्याप्रमाणे दोन बाजू आहेत. पहिली बाजू अशी की काही जण असे मूलतः अतरंगी असतात ना की जिथे जातात तिथे नाव काढतात. इतकंच काय तर ते नसले की आपसूक त्यांची आठवण ही काढली जाते. दुसरी बाजू असते अशा व्यक्तींची जे एरवी शांत आणि सज्जन असतात. पण कधी कधी आली लहर आणि केला कहर असं काही तरी करून जातात. मग हा कहर केल्याचे चटके बसतातच म्हणा !

बरं काही वेळा हे चटके इतके जबरदस्त असतात की म्हंटलं तरी विसरता येणार नाही. त्यात एखादी गोष्ट करताना भीडभाड न बाळगणे हा स्वभाव असेल तर कल्याणचं झालं म्हणायचं ! कल्याण म्हणजे दुसऱ्या व्यक्तींचं ! बरं काही वेळा असं ही होतं की अचानक यांच्या अंगात बाहुबली वगैरे संचारतो ! म्हणजे तसा त्यांचा गोड गैरसमज होतो. पण यथावकाश त्याची कटू फळं इतरांना भोगावी लागतात. आम्हाला तर याचं प्रातिनिधिक उदाहरण बघायला मिळाल आहे. आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो म्हणजे हे एक उदाहरण आहे.

आता होतं काय तर एक दादा एका हळदीच्या कार्यक्रमात नाचत असतात. डीजेने मस्त गाणं लावलेलं असतं. समोर अख्खा पब्लिक जोमात नाचत असतं. पण या दादांचा या सगळ्यांपासून फटकून डान्स चालू असतो. पण व्यवस्थित डान्स करत असतात. अगदी आपले एकेकटे नाचत असतात. तेवढ्यात समोरून दुसरी एक व्यक्ती यांच्यासोबत नाचायला लागते. पण तरी दादा जास्त काही करत नाहीत. आपले हळूहळू डान्स करत असतात. तेवढ्यात या गर्दीतून एक व्यक्ती बाहेर येते. कपड्यांना हळद लागलेली ही व्यक्ती कोण हे काही वेगळं सांगायला नकोच ! खुद्द नवरदेव असतात ते ! कदाचित पूर्ण घोळक्यातुन बाहेर पडावं असं त्यांना वाटलं असणार ! पण आगीतून फुफाट्यात अशी त्यांची अवस्था व्हायला काही सेकंद पूरतात. त्यात ते बाहेर येतात तेव्हा पाठीमागे कोण कोण आहे याबाबत अनभिज्ञ असतात. तेवढ्यात वर उल्लेख केलेले दादा पुढे सरसावतात. आतापर्यंत शांत वाटणारे हे दादा चक्क नवऱ्याच्या दोन्ही पायांमधून डोकं घालून त्यांना उचलतात आणि नाचायला लागतात ना ! बरं इथपर्यंत ठीक आहे. पण नाचायलाच लागतात आणि अचानक भिंगरी फिरावी तसे फिरतात. ते ही एकदम आवेशात !

हे सगळं इतक्या पटकन होतं की नवरदेव आणि इतरांना सांभाळायला वेळ ही मिळत नाही. आणि अशा बेसावधवेळी जे व्हायचं ते होतं. नवरदेवाच्या अंगाला अजून हळद लावावी लागेल अशी परिस्थिती तयार होते. आता काय झालं असेल याची आपण कल्पना करू शकता, त्यामुळे त्याविषयी जास्त चिकित्सा नको ! पण एक मात्र खरं की आली लहर आणि केला कहर हे अगदी शब्दशः बघायला मिळतं. नाही म्हंटलं तरी आपण ही मजा घेतोच झाल्या प्रकारची. पण त्याचवेळी नवरदेवसाठी वाईट ही वाटत असतं. पण काय करणार मित्र जबरदस्त असले की किस्से ही मस्त आठवणीत राहतील असे होतात. असो.

आज लेख लिहायचा म्हणून व्हिडियो पाहत असताना आमच्या टीमला हा व्हिडियो दिसला. कमी वेळेचा असला तरी मनोरंजक वाटला. म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल. त्यातूनच मग आजचा हा लेख लिहिला गेला आहे. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *