काही घटना अश्या असतात ज्यावर आपला विश्वासच बसत नाही, परंतु त्या घडून गेलेल्या असतात. अगदी अशीच काहीशी घटना काही दिवसांअगोदर शेजारील राज्यात घडली आहे. गुजरातमधील राजकोट येथील एक खूपच आ’श्चर्यकारक घटना समोर आलेली आहे. येथे तीन भावंडानी स्वतःला एकाच खोलीत जवळपास १० वर्षे कै’द करून घेतले होते. ह्या मुलांची वये ३० ते ४२ दरम्यानची आहेत. त्या ‘साथी सेवा’ ह्या एनजीओ ने काही दिवसांअगोदरच त्या मुलांच्या वडिलांच्या मदतीने वाचवले आहे. हि एनजीओ बेघर असलेल्या लोकांसाठी कल्याणकारी कामे करते. ह्या संस्थेच्या अधिकारी जालपा पटेल ह्यांनी सांगितले कि ह्या खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा समोरील दृश्य खूपच भयावह होते.
खोलीमध्ये कोणताच प्रकाश नव्हता, तिथे शिळं अन्न आणि मानवी वि’ष्टेचा दुर्गंध येत होता. खोलीच्या आतमध्ये सगळीकडे वर्तमानपत्रे अस्ताव्यस्त पसरलेली होती. खरंतर ह्या मुलांची हि परिस्थिती दहा वर्षाअगोदर आईच्या नि’धनानंतर झाली आहे. कदाचित ती मुले मानसिकरीत्या आजारी आहेत. त्या मुलांच्या वडिलांचे सुद्धा हेच म्हणणं आहे कि, त्या मुलांची मानसिक परिस्थिती ठीक नाही आहे. त्यांना लवकरात लवकर उपचाराची गरज आहे. अमरी, भावेश आणि मेघना अशी ह्या तिन्ही भावंडांची नावे आहेत. दहा वर्षांअगोदर ह्या मुलांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. जेव्हा एनजीओने त्यांना खोलीतून सोडवले, तेव्हा ते खूपच अस्ताव्यस्त आणि खूपच वाईट परिस्थितीत होते. त्यांचे केसं आणि दाढी खूपच वाढलेली होती. ते इतके अशक्त होते कि त्यांना नीट उभे सुद्धा राहता येत नव्हते. एनजीओच्या सदस्यांनी त्यांची स्वच्छता केली आणि केसं, दाढी काढली. आता एनजीओ त्यांना एका अश्या जागी पाठवण्याचा विचार करत आहे, जिथे त्यांना चांगले अन्न आणि उपचार मिळू शकेल.
त्या मुलांच्या वडिलांनी सांगितले कि, “त्यांची मुलं चांगली सुशिक्षित आहेत. त्यांचा ४२ वर्षीय मोठा मुलगा अमरीश बीए, एलएलबी उत्तीर्ण आहे. तो अगोदर वकिलीचे काम करायचा. त्यांची ३९ वर्षीय मुलगी मेघना हि मानसोपचारामध्ये मध्ये ग्रॅज्युएट आहे. तर छोटा मुलगा अर्थशास्त्रामध्ये ग्रॅज्युएट आहे. तो एक चांगला क्रिकेटपटू होता.” मुलांचे वडील हे एक सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. ते सांगतात कि, “माझ्या पत्नीच्या नि’धनानंतरच तीनही मुले मानसिकरीत्या तुटून गेली होती. ह्या घटनेनंतरच त्यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. ते रोज खोलीच्या बाहेर जेवण ठेवून देत असे.” त्यांनी सांगितले कि काही लोकं असं सुद्धा म्हणतात कि माझ्या नातेवाईकांनी त्यांच्या वर काही जा’दूटोणा केला आहे. असं असूनही, ह्या संपूर्ण घटनेची अद्याप कोणीही पो’लिसांमध्ये तक्रार केलेली नाही आहे.