पोलीस स्टेशन म्हटलं की तिथे चोरी, दरोडा, ह’त्या, मा’रहाण अशा अनेक तक्रारींसाठी लोक जात असतात. पण भारतात काही अशा घटना घडतात, जे ऐकून पाहून जग सुद्धा चकित होऊन जाईल. भारतातील हिंदी भाषिक राज्यातील पोलिसांकडे चक्क एक तीन वर्षाचा चिमुरडा तक्रार करण्यासाठी आला होता. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, या चिमुकल्याचे कोणी आणि काय नुकसान केले असेल? त्याला कुणी त्रास दिला असेल… असं नेमकं काय घडलं असेल की, या लहानग्याला थेट पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावीशी वाटली… आता सगळ्यात आधी तक्रार तर आई वडिलांना करायला पाहिजे होती. मात्र हा पोरगा थेट पोलीस स्टेशनला आला म्हणजे काहीतरी विषय नक्कीच असणार ना… कारण या पोराला दुसऱ्या तिसऱ्या कुणाची तक्रार करायची नसून स्वतःच्या आई वडिलांची तक्रार करायची होती.
आता हा एवढासा पोरगा तक्रार घेऊन आला आणि बरं ही तक्रार इतर कोणी नाही, तर तो आपल्याच आईविरोधात करण्यासाठी आला होता. इतकंच नाही, तर आपल्या आईला अटक करा अशी मागणीही त्याने पोलिसांकडे गेली. निरागस मुलाची ही तक्रार ऐकून पोलिसांनाही हसू आवरत नव्हतं. सगळे पोलीस मोठ्यांची तक्रार सोडून याची तक्रार नोंदवायला आले… इतरही तिथे उपस्थित असलेले व्यक्ती याची नेमकी तक्रार काय आहे, हे बघायला आले. शेवटी या पोराची तक्रार ऐकून सगळ्यांना हसू आले मात्र तरीही हा एवढासा चिमुकला खूपच गांभीर्याने आईला अटक करा, असे सांगत होता…. शेवटी जास्त पिक्चर बघितल्यावर हे असे परिणाम होतात, हे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना लक्षात आलं.
हा व्हायरल झालेला व्हिडीओ बहुदा बिहारमधील आहार. या मुलाने स्वतःच्या आईची तक्रार घेऊन पोलिस स्टेशन गाठले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आईची तक्रार घेऊन हा अवघ्या 3 वर्षीय मुलगा जेव्हा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा पोलीस कर्मचारीही थक्क झाले.
खरं पाहिलं तर ‘मुलं ही देवा घरची फुलं… अशी म्हण आहे. मात्र अनेकदा ही लहान मुलं असं काही करतात की, ते पाहून सर्वच चकीत होतात. असाच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक तीन वर्षांचा चिमुकला आपल्या आईविरोधातच पोलिसांकडे तक्रार करत आहे. एवढेच काय तर तिला तुरुंगात टाका अशी मागणी देखील तो करत आहे. मात्र तो का असे करतोय असा सवाल तुम्हाला पडला असेल. तर ते कारण ऐकून तुम्हाला देखील हसू येईल.
जेव्हा पोलीस विचारतात की, आई नेमकं काय करते? तर तो मुलगा म्हणतो की, आई माझे सगळे चॉकलेट चोरून घेते. तसेच मला मारते. आईने माझ्या सर्व कँडी चोरल्या आहेत. आईने चोरी केली आहे. चॉकलेट्सही चोरले आहेत.’ आता हा व्हिडीओ पहा आणि मजा घ्या…
बघा व्हिडीओ :