मुलं ही देवा घरची फुलं, असं आपण म्हणतो. लहान मुलांचं मन खूप निर्मळ असतं. म्हणून या चिमुरड्याचे प्रश्न किंवा त्यांची उत्तर ही फार मजेशीर असतात. सोशल मीडियावर आपण असे अनेक मजेशीर व्हिडीओ पाहिले असाल. लहान मुलांचा निरागसपणा अनेकांचं मनं जिंकतात. लहान मुलं फार गोंडस आणि निरागस असतात. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आपलं मन प्रसन्न करतात. ते जे काही करतात ते पाहून चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं. त्यामुळे सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ अनेकांचं मन जिंकत आहे. या व्हिडीओत एका मुलाने अशी गोष्ट केलेली आहे, जी आपल्यापैकी प्रत्येकाने कधी न कधी केलेली आहे. आपल्यापैकी अनेकांना लहानपणी अंघोळीला जायचा कंटाळा येत असेल. मग आई आपल्यामागे अंघोळ करून घे असं पुनः लावते. पण आपण काही आईचं ऐकत नाही… एकूणच काय तर ही स्टोरी प्रत्येकासोबत घडलेली आहे.
लहान मुलांचे भन्नाट व्हिडीओ हे सर्वचजण आवडीने पाहत असतात. शाळेत असताना आपण विविध खेळ खेळत होतो. अगदी घरी पण आपण काही करामती करायचो, ज्यावरून आपण आपल्या लहानपणी किती अतरंगी होतो, हे लक्षात येते. आणि पुन्हा एकदा आपले बालपण जागे करणारा आणि आपल्या अतरंगी असण्याची कल्पना देणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच लहानपण आठवेल.
खरं तर हे अशा मुलांचे व्हिडिओ पाहिले की आपल्यालाही असेच काहीसे करावे वाटते. लहानपणीची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. शाळेत आपण कायम वेगवेगळ्या करामती करत असायचो. काहींसाठी आपल्याला शिक्षा व्हायची तर काही वेळा आपण शिक्षेपासून बचावयचो. फक्त शाळेतच नाही तर घरी पण आपण अनेक करामती करायचो. या करामती जास्त करून रविवारी व्हायच्या कारण रविवारी आपल्याला सुट्टी असायची. आपण कधी कधी रविवारी खूप खेळायचो आणि एखादी करामत अंगलट आली तर खूप मारही खायचो.
तर आजच्या या व्हायरल व्हिडीओत एक मुलगा आहे. जो वडिलांच्या शेजारी निवांत झोपलेला आहे. आणि त्याची आई त्याला अंघोळीला बोलवत आहे. हा छोटासा मात्र एकदम भारी क्युट पद्धतीने नकार देतो आहे. त्याची नकार देण्याची पद्धत, आईने बोलवण्याची पध्दत पाहून तुम्हालाही नक्कीच बालपण आठवेल. अगदी असेच सेम टू सेम प्रसंग आपल्या आयुष्यात नक्कीच घडलेले असतील.
आता या चिमुकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आपण तेव्हा इतके अतरंगी नव्हतो, जशी ही आताची मुले आहेत. आता ही छोटीशी मुले किती अतरंगी आहेत, याची कल्पना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :