Breaking News
Home / मनोरंजन / आईस्क्रीम लवकर मिळाले नाही म्हणून मुलगा चिडला आणि बघा पुढे काय केले ते

आईस्क्रीम लवकर मिळाले नाही म्हणून मुलगा चिडला आणि बघा पुढे काय केले ते

लहान मुलांचे अनेक मजेशीर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. निरागस अशा लहान मुलांचे हे व्हिडिओ कधी चेहऱ्यावर हसू आणतात तर कधी रडवतात. त्यांचा आनंद असो वा राग असो… सगळ्या भूमिका टोकाच्या असतात. “मानलं तर आपलं नाहीतर ठोकलं” अशी त्यांची कायम भूमिका असते. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आजवर तुम्ही अनेक आईस्क्रीम विकणाऱ्या लोकांचे व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. जे आईस्क्रीम देतो देतो म्हणतात पण ग्राहकाच्या हाती काही देत नाहीत. कधी फक्त कोन देतात तर कधी टिशू पेपर देतात मात्र आईस्क्रीम काही देत नाहीत. मात्र त्यांची ही चेष्टा फक्त मोठी माणसे खपवून घेतात. आपल्या अनोख्या शैलीत आईसक्रीम (Ice cream) देणाऱ्या आईसक्रीमवाल्यांचे बरेच व्हिडीओ (Ice cream video) तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील (Ice cream prank video). ज्यातून आईसक्रीम विक्रेते टर्किश स्टाइलने आईसक्रीम देत असतात. म्हणजे पहिल्यांदा ते आईसक्रीम देत नाही तर ग्राहकासोबत आधी मजा करताना दिसतात. याला प्रँक म्हणा, आपलं कौशल्य दाखवणं म्हणा किंवा ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा म्हणा.

पाहताना खूप मजा येते. पण ज्या व्यक्तीला आईसक्रीम खाण्याची घाई आहे, त्यांना हे असे प्रँक बिलकुल आवडत नाही. त्यापैकीच एक म्हणजे लहान मुलं. कारण त्यांना आईसक्रीमवाल्याच्या कौशल्याशी किंवा स्टाईलशी काही देणंघेणं नसतं. त्यांना खायची असते ती फक्त आईसक्रीम. पण हे आईस्क्रीमवाले लहान मुलांसोबतही अशीच चेष्टा करतात. मग जेव्हा जेव्हा एखादा रागीट लहान मुलगा समोर येतो, तेव्हा काय होते हे पाहण्यासाठी आणि आपले मनोरंजन करून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहणे, गरजेचे आहे भावांनो…

आईसक्रीम प्रँकचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आईसक्रीम प्रँकचा असाच एक भन्नाट आणि खळखळून हसायला लावणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहेत. ज्यात एका लहान मुलासोबत आईसक्रीम विक्रेता प्रँक करताना दिसतो आहे. पण हा मुलगाही काही कमी नाही. त्यांनेही आईसक्रीम प्रँक करणाऱ्या विक्रेत्याला चांगलाच धडा शिकवला आहे. ज्यानंतर कायमच तो आईस्क्रीम विक्रेता लहान मुलांसोबत असे प्रँक करताना आधी विचार करेन.

व्हिडीओत पाहू शकता एक छोटा मुलगा आईसक्रीम पार्लरजवळ उभा आहे, विक्रेता सुरुवातीला टर्किश शैली दाखवत आपलं करतब दाखवतो. त्याच्यासोबत मजामस्ती करतो. पहिल्यांदाच जेव्हा तो लहान मुलाची चेष्टा करतो, तेव्हाच हा पोरगा रागावून जॅकेट काढतो आणि आईस्क्रीम विक्रेत्याला फाईट देण्याच्या पोजमध्ये उभा राहतो.

दुसऱ्यांदा पुन्हा आईस्क्रीम वाला या मुलाची चेष्टा करतो. तेव्हाही हा मुलगा रागाने त्याने हातात दिलेला कोन खाऊन टाकतो. यावरही आईस्क्रीम वाला आईस्क्रीम देत नाही, हे पाहून हा मुलगा वडिलांच्या मागे जाऊन थांबतो कारण पुन्हा चेष्टा केली तर हा रागीट मुलगा त्याला काहीतरी डॅमेज करून गेला असता. कारण आधीच हा मुलगा रागाने त्याला बोलत असतो. तरीही शेवटी हा मुलगा राग अनावर झाल्याने चक्क आईसक्रीमचा कोनच फोडून टाकला आणि कचाकचा खाल्ला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *