Breaking News
Home / मराठी तडका / आई अरुंधतीच्या भूमिकेसाठी मधुराणीने ह्यामुळे दिला होता नकार, कारण तिला भीती होती कि

आई अरुंधतीच्या भूमिकेसाठी मधुराणीने ह्यामुळे दिला होता नकार, कारण तिला भीती होती कि

मराठी मालिका आणि आपण प्रेक्षक यांचं एक अतूट नातं आहे. हे नातं केवळ मनोरंजन याच्या पलीकडे जातं. त्यामुळे मालिकेतील व्यक्तिरेखा या केवळ व्यक्तिरेखा राहत नाहीत. त्या आपल्या कुटुंबातील एक भाग असल्याचं आपल्याला सतत वाटतं. खासकरून आपल्याला सगळ्यांत जास्त आवडणाऱ्या मालिकेच्या बाबतीत तर आपण अगदी मनाने एकरूप होऊन जातो. त्यातील व्यक्तिरेखांचा त्या त्या कलाकारांविषयी विचारसुद्धा करू शकत नाही. सध्याच्या काळात एवढी लोकप्रियता मिळवलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. गेल्या काही काळापासून हि मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेत येणारे वेगवेगळे वळण ह्यामुळे मालिका दिवसेंदिवस खूपच रोमांचकारी होत आहे. त्याचसोबत मालिकेतील कलाकारांचा दमदार अभिनय हि या मालिकेची जमेची बाजू आहे.

या मालिकेतील आई म्हणजे अरुंधती ही व्यक्तिरेखा आपल्या जिव्हाळ्याची झाली आहे. इतकी जिव्हाळ्याची की या भूमिकेतील मधुराणी गोखले प्रभुलकर म्हणजेच आई (अरुंधती) हे समीकरण आपल्या डोक्यात अगदी पक्क झालं आहे. पण आपल्याला माहिती आहे का, की मधुराणीजींना या भूमिकेसाठी जेव्हा विचारणा झाली होती तेव्हा त्यांनी प्रथमतः नकार दिला होता. होय, आज त्यांना ही भूमिका साकारताना बघून वाटतं कि किती सहज अभिनय करतात या. अगदी या भूमिकेला पुरेपूर न्याय देताहेत. पण त्यावेळी त्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका मुलाखतीत ह्या बाबत खुलासा केला. जेव्हा सुरुवातीला त्यांना हि भूमिका ऑफर झाली होती तेव्हा त्यांनी हि भूमिका साकारायला नकार दिला होता. कारण त्यांना भीती होती ती म्हणजे त्या इतक्या मोठ्या मनाच्या आई वाटतील का? अजून दुसरं कारण होतं ते म्हणजे मालिकेत मुख्य भूमिका असल्यामुळे शूटिंग निमित्ताने महिन्यातील २०-२२ दिवस स्वतःच्या सात वर्षाच्या लहान मुलीला पुण्यात सोडून ठाण्यात शूटिंग करणं त्या माउलीला योग्य वाटेना. त्यामुळे अरुंधतीने भूमिकेसाठी नाही म्हटले होते. पण यावेळी त्यांचे यजमान आणि लोकप्रिय दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांनी मधुराणी यांना प्रोत्साहन दिलं आणि निर्धास्त केलं. त्यांच्या प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळे मधुराणी यांनी अगदी निर्धास्तपणे ही भूमिका स्वीकारली आणि पुढे जो इतिहास घडतो आहे तो आपण पाहतो आहोत. मालिका इतिहासातील गाजत असलेल्या मालिकांतील ही एक मालिका आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये.

आज मधुराणीजींना या भूमिकेसाठी लोकप्रियता मिळते आहेच. सोबतच त्या त्यांच्या कवितांसाठी ही प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेले कविता वाचनाचे कार्यक्रम आपल्या सगळ्यांनी पाहिले असतीलच. सोबतच काही कलाकृतींचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. यामुळे त्या एक अष्टपैलू कलाकार आहेत हे निर्विवाद सत्य आहेच. अशा या अष्टपैलू मधुराणीजींना येत्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! तसेच त्यांचे यजमान आणि कुटुंबीय यांनी त्यांना जो पाठिंबा दिला त्यामुळे मधुराणीजी आपल्याला या भूमिकेत दिसू शकल्या आहेत, तेव्हा प्रमोदजींचे ही विशेष आभार.आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्याला आवडतील अशा विविध विषयांवर आपली मराठी गप्पा टीम सातत्याने लिहीत असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण आमचे हे लेख शेअर करता, तेव्हा तेव्हा आम्हाला आपसूक प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे हा लेख आणि यापुढचे लेखही शेअर करत राहा. आपल्या मराठी गप्पा टीमप्रति असलेला आपला स्नेह कायम राहू द्या. धन्यवाद !!!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.