लहान मुलं घरात असली की वातावरण किती प्रसन्न, हसत खेळत असतं हे वेगळं सांगायला नको. त्यांचा लडिवाळपणा, खोडकरपणा, निरागसपणा हा सगळा हवाहवासा वाटतो. तसेच त्यांना आलेला लटका राग आपल्याला ही हसायला भाग पाडतो. गंमत असते लहान मुलांची. खासकरून जेव्हा ही लहान मुलं लुटुपुटूची रागावतात किंवा आपल्याच पालकांशी गंमतीत हुज्जत घालतात तेव्हा तर धमाल येते. या विषयावर अनेक व्हिडियोज आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण त्यातले काही ठराविक व्हिडियोज अगदी लक्षात राहतात. आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो बघितला. एवढी मजा आली ना. मग काय तीच मजा आपल्या वाचकांना यावी म्हणून हा लेख लिहिण्याचा घाट घातला आहे.
हा व्हिडियो आहे संदीप शर्मा यांच्या युट्युब चॅनेल वरील. स्वतः एक उत्तम कलाकार असलेले संदीप शर्मा अनेक वेळेस आपल्या लहानग्या मुलीसोबत गाणं गाताना दिसतात. गोड स्वर आणि गोड स्वभाव असलेल्या या मुलीचा एक व्हिडियो काही वर्षांपूर्वी वायरल झाला होता. एवढा वायरल की जवळपास दोन करोड हुन अधिकांनी हा व्हिडियो पाहिला आहे.
या व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आपल्याला ही लहान मुलगी आणि तिची आई दिसून येतात. तिची आई या मुलीला खोटं खोटं ओरडत असते. रात्रीचे दोन वाजलेले असतात, तरीही ही चिमुकली जागी असते आणि वरून मोठ्या आवाजात बोलणं चालू असतं. त्यावरून तिची आई तिला रागे भरत असते. पण ही चिमुकली पण धीट असते. आईच्या प्रत्येक बोलण्याला तिचं काही ना काही उत्तर ठरलेलं असतं. पण खरी गंमत तेव्हाच येते जेव्हा आई हातवारे करत बोलायला लागते. कारण ही छोटी पोर पण आपल्या आईच्या अनुसार हातवारे करत राहते. हसायलाच येतं. तिचा तो निरागसपणा, धीटपणा अगदी आवडून जातो आणि गोड वाटतो. त्यात या चिमुकलीचे वडील हे चित्रीकरण करत असतातच. ते या दरम्यान एकच डायलॉग बोलतात आणि हशा पिकवतात- माँ शेर, लडकी सव्वाशेर. पण यानंतर एक क्षण असाही येतो जेव्हा आईचा आवाज अगदी टिपेला पोहोचतो अगदी खोटा खोटा राग असला तरीही. तेव्हा मात्र ही चिमुकली क्षणभर शांत होते. तिचा बदललेला नूर कळून येतो. तेवढयात तिच्या तोंडून निरागसपणे शब्द बाहेर पडतात – ‘डाटी’ म्हणजे आई मला ओरडली. ती तिच्या वडिलांकडे आईची तक्रार करत असते.
मग पुन्हा माय लेकीचं बोलणं होतं. यावेळी मात्र ही छोटी उठून येते आणि वडिलांकडे आईची तक्रार करते. एवढा निरागस आणि गोड प्रसंग वाटतो. मग काय या मुलीचे वडील सुद्धा आईला खोटं खोटं ओरडतात. तेव्हा माय लेक पुन्हा मस्करीत आमने सामने येतात आणि व्हिडियो संपतो.
व्हिडियो बघताना आपण खूप हसतो, जेव्हा ती छोटी म्हणते ‘डाटी’ तेव्हा तिची कीव ही येते. एकंदर काय आपण तिच्या लहानपणाच्या प्रेमात पडतो. गोड आहे पोर. आपल्या टीमकडून तिला खूप शुभ आशिर्वाद ! आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तेव्हा आपल्या ही पसंतीस उतरला असणारच. तसेच आपल्या टीमने यावर लिहिलेला हा लेख ही आपल्याला आवडला असणार यात शंका नाही. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आणि सकारात्मक सूचना नेहमीप्रमाणे आम्हाला कमेंट्स मधून कळू द्या. आणि हो लेख नेहमीप्रमाणे आठवणीने शेअर करा बरं का !! आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :