Breaking News
Home / मनोरंजन / आई आणि मुलीचे हे गोड भांडण पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

आई आणि मुलीचे हे गोड भांडण पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

लहान मुलं आणि त्यांचे व्हिडियोज म्हणजे थकलेल्या मनांना काही वेळ विरंगुळा असतो. या व्हिडियोज मुळे काही वेळा त्यांच्यातील सुप्त गुण कळून येतात तर काही वेळेस त्यांच्यातील केवळ निरागसपणाच आपल्या मनाची मरगळ झटकण्यास पुरेसा असतो. आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो पाहिला, ज्यातील लहान मुलीची निरागसता आमची मनं जिंकून गेली. तसेच आपल्या वाचकांचं ही या व्हिडियोवरील माहिती मुळे मनोरंजन होईल असंही वाटलं. त्यातूनच हा लेख लिहिला जातो आहे. चला तर मग जाणून घेऊयात, या व्हिडियो विषयी.

हा व्हिडियो आहे किआरा शिंदे नावाच्या साडेतीन वर्षाच्या एका चिमुकलीचा. चिमुकलीच म्हणायला हवं. कारण ती जेव्हा या व्हिडियोत बोलते तेव्हा तिचे गोड बोबडे बोल ऐकायला येतात. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आपल्याला ही गोबऱ्या गालांची चिमुकली तिच्या घरच्या स्वयंपाक घरात उभी असलेली दिसून येते. लहान मुलं रागावली की अजून गोड वाटतात नाही का !

इथे तर या चिमुकली मध्ये आणि तिच्या आईमध्ये काही तरी वाद चाललेला असतो. या चिमुकलीचं वागणं, रडणं यावरून तिची आई तिच्याशी बोलत असते. अर्थात आपल्याला केवळ आई काय बोलते हे कळतं. या चिमुकलीचे बोल तेवढेसे कळत नाहीत. पण खरं सांगायचं तर यातच गंमत आहे. कारण तिच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियांमुळे हा व्हिडियो मजेशीर बनतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर या व्हिडियोची ४० ते ६० सेकंद बघा. तुम्हाला धमाल वाटली नाही तर सांगा. त्यात या मुलीच्या देहबोलीमुळे मजाच येते. ती तिचे मुद्दे मांडत असताना अगदी जोरकसपणे मांडत असते. त्यामुळे तिचं डोकं अगदी मजेशीररित्या हलत. एकदा दोनदा तर या जोरकासपणामुळे तोल जातो की काय तिचा अस वाटतं. पण एकंदर बोलण्याचा आणि वाद घालण्याचा आवेश हसू आणतो हे नक्की. तसेच काही काही क्षण तर व्हिडियो संपल्यावर ही लक्षात राहतात. जसे की एका क्षणी (२०वं सेकंद) ही मुलगी रागात ‘फुफुफु’ असं म्हणते. त्यावर तिथे उपस्थित तिची आई आणि अन्य कोणी यांना हसू आवरत नाही.

तिच्या आईने दिलेली, ‘कशाला फुफुफु’ ही प्रतिक्रिया ही अगदी टायमिंग वर येते. त्यामुळे या माय लेकीचं हे बोलणं म्हणजे विनोदी संभाषणाचा एक इरसाल नमुना म्हणायला हवा. अर्थात हा व्हिडियो जस जसा शेवटाकडे येतो तस तस त्यांचं बोलणं हळुवार होत जातं. कदाचीत त्या मुलीच्या बोलण्यातून होणारे बदल तिची आई ओळखते आणि त्यानुसार स्वर बदलतो. आपल्या मनात काय चालू आहे हे आईचं ओळखू शकते हेच खरं. असो. हा व्हिडियो आहे तर तसा पावणे दोन मिनिटांचा. पण हा वेळ इतक्या झटकन जातो की कळतही नाही. याला कारणीभूत आहे या मुलीचा निरागसपणा आणि तिच्या मातोश्रींचं संवाद कौशल्य. मातोश्री अगदी खुबीने त्यांच्या बोलण्याने या संवादात विनोदी खुसखुशीतपणा आणतात. आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडला आहेच. आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्या ही पसंतीस उतरला असेलच यात शंका नाही. तसेच जर बघितला नसेल तर नक्की बघा. अगदी आवर्जून बघा. तेवढाच तुमच्या काम करून थकलेल्या मनाला विरंगुळा.

सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते. आपणही आम्हाला उत्कृष्ठ प्रतिसाद देत असता. त्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळत राहतं आणि नवनव्या गोष्टी करण्याची ऊर्जा टिकून राहते. एकूणच काय तर आपलं प्रोत्साहन आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि राहील. आपणही आम्हाला जसा आता पाठिंबा देत आहात तसाच यापुढेही देत राहाल हे नक्की. तेव्हा लेख वाचत राहा, शेअर करत राहा, आनंद वाटत रहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *