Breaking News
Home / मनोरंजन / आई ओरडल्यामुळे रुसलेल्या ह्या मुलीचा व्हिडिओ पाहुन हसु आवरणार नाही, शेवट नक्की बघा

आई ओरडल्यामुळे रुसलेल्या ह्या मुलीचा व्हिडिओ पाहुन हसु आवरणार नाही, शेवट नक्की बघा

लहान मुलांची म्हणून एक गंमत असते. ती हसत खेळत असतात तेव्हाही गोड वाटतात आणि रागावली असली तरीही त्यांच्यातला गोडवा कमी होत नाही. किंबहुना त्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये पाहिल्यावर आपला राग कुठच्या कुठे पळून जातो. रागावलेल्या गोंडस गालांवर एक हलकी चापट मारून त्यांना माफ करावं असं वाटतं. आपण तस करतो सुद्धा. या सगळ्यांत ही लब्बाड मंडळी मात्र खुदकन हसतात आणि एवढा वेळ असलेलं तणावाचं वातावरण झटक्यात निवळत. याचीच साक्ष देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला आहे. त्यात होणारी गंमत खरंच जाणून घेण्यासारखी आहे.

होतं असं की या व्हिडियोत आपल्याला दिसते ती एक चिमुकली. अगदी चित्र काढलंय असं वाटावं असं तिचं गोंडस व्यक्तिमत्त्व दिसत असतं. गोबरे गाल, टप्पोरे काळे डोळे, हसल्यानंतर दिसणारे इवलेसे दात. खरंच गोंडस असते पोर. पण या पोरीने घरी काही तरी प्रताप करून ठेवलेले असतात. आपण घरी प्रताप केले की आई ओरडते, तसच इथेही होत असतं. तिची आई तिला ओरडते. या ओरडण्याचा परिणाम असा की ही चिमुकली मग गाल फुलवून बसते.

त्यावर आईच म्हणणं असतं, की आधी चूक करायची आणि मग नाकावर राग घेऊन बसायचं हे चालणार नाही. त्यात राग आल्यामूळे ही मुलगी वर बघत नसते. ते ही आई तिला सांगते. थोडीशी बडबडते. पण मग या मुलीच्या भावना अनावर होत आहेत हे तिला दिसून येतं. कारण एव्हाना तिचा खालचा ओठ वर आलेला असतो आणि आता कुठच्या ही क्षणी हिला रडू कोसळेल असं वाटत राहतं. पण समयसूचकता ही प्रत्येक आईची खासियत म्हणायला हवी. आपल्या मुलांना किती ओरडावं हे त्यांना बरोबर कळत. या माउलीला ही त्याचा अंदाज येतोच. मग काय आपल्या या छोट्या परिशी गोड गोड बोलत तिचा राग काढण्याचा प्रयत्न ही आई करत असते. सुरुवातीला काही क्षण जातात. पण लहान मुलंच ते. किती राग मनात धरून बसेल. शेवटी ही मुलगी खुदकन हसते. तेव्हा वर उल्लेख केलेल्या तिच्या दंतपंक्ती दिसतात. निरागसता म्हणजे काय हे त्या क्षणात पुन्हा जाणवतं. मग पुढचा काळ आईसाठी सोप्पा असतो. तिचा प्रयत्न असतो की या मुलीने तिच्याकडे बघावं. पण ही मुलगी मात्र तिरपा कटाक्ष टाकत आपल्या आईकडे एक दोनदा पाहते.

तिची आई तिच्या उजवीकडे बसली असल्याचं आधी लक्षात येत नाही. पण त्यांच्या संवादावरून याचा अंदाज येतो आणि तिरप्या कटाक्षाचा अर्थ कळतो. पुढे मग ही आई आपल्या मुलीकडून गालावर एक किस्सी मागत असते, ही मुलगी मात्र गोड हास्य करत तशीच बसून राहते आणि हा व्हिडियो संपतो. खरं तर केवळ एक मिनीट आणि काही सेकंदांचा हा व्हिडियो आहे. पण त्यातही या माय लेकिमधला संवाद मजा आणतो.तसेच त्या छोट्या मुलीच्या निरागस हास्याची आठवण आपल्या मनात व्हिडियो संपल्यावरही ताजी राहते. आपण हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्याला ही आवडला असणार.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपली टीम सातत्याने विविध विषयांवर लेखन करत असते. त्यात आपल्या वाचकांना जे विषय वाचायला आवडतील त्याविषयी लेखन केलेलं असतं. त्यामुळे वाचक म्हणून आपल्या प्रतिक्रिया जेव्हा आम्हाला कळतात तेव्हा अनेक गोष्टी शिकता येतात. तसेच आपल्या कमेंट्स मुळे हुरूप येतो आणि नवीन ऊर्जा मिळते. तेव्हा आपले हे स्नेहबंध असेच वृद्धिंगत होत राहू दे ही सदिच्छा. आपल्या प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *