आई कुठे काय करते या मालिकेने स्वतःचा असा एक चाहतावर्ग तयार केलेला आहे. या मालिकेतील विविध व्यक्तिरेखांना घराघरातून ओळख मिळाली आहे. या सुप्रसिद्ध व्यक्तिरेखा साकार करणाऱ्या अनेक कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा आमच्या टीमने वेळोवेळी घेतला आहेच. ह्या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, यश सोबत इतर लोकप्रिय भूमिकांच्या खऱ्या आयुष्याविषयी लेख आम्ही लिहिले आहेत. आजच्या लेखातून आपण या मालिकेतील अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत. हा अभिनेता या मालिकेत अभि ही व्यक्तिरेखा साकारतो. होय, आज आपण निरंजन कुलकर्णी विषयी जाणून घेणार आहोत. निरंजन हा मूळचा अंबरनाथ येथे राहणारा. तिथे त्याचं बालपण गेलं. लहानपणापासून त्याला अभिनय क्षेत्राची ओढ निर्माण झाली.
त्याचं मुख्य कारण म्हणजे बालनाट्यं. तेव्हा बाल कलाकार म्हणून आणि आज कलाशिक्षक म्हणून तो बाल नाट्यांशी निगडित असतो. बाल नाट्यापासून सुरू झालेल्या या प्रवासात कॉलेज जीवनात एकांकिकांचं वळण लागलं आणि निरंजन यातील अभिनेता अजून तावून सुलाखून बाहेर पडला. निरंजन याचं स्वतःचं असं युट्युब चॅनेल आहे. या चॅनेल वर त्याने अभिनित केलेल्या नाट्यकृतींची झलक काही व्हिडियोज मधून मिळते. बालनाट्य, एकांकिका, नाटकं यांसोबतच निरंजन याने मालिकांमधूनही विपुल प्रमाणात काम केलेलं आहे. तूच माझा सांगाती, गणपती बाप्पा मोरया, उंच माझा झोका, आपलं बुवा असं आहे, जावई विकत घेणे आहे, तू अशी जवळ रहा या त्याने अभिनित केलेल्या मालिका. यातील त्याच्या जवळपास प्रत्येक व्यक्तिरेखा गाजल्या. राया ही व्यक्तिरेखा तर विशेष गाजली. तसेच गणपती बाप्पा मोरया मधील विष्णू देवांची भूमिकाही गाजली. तूच माझा सांगाती या मालिकेतील ज्ञानेश्वर या भूमिकेतील निरंजन यांचं खूप कौतुक झालं.
वर उल्लेख केल्याप्रमाणे निरंजन याचं स्वतःचं असं युट्युब चॅनेल आहे. जवळपास ११ हजारांहून अधिक स’ब’स्क्रा’य’ब’र्स या चॅ’ने’ल ने जमवले आहेत आणि ४४ लाखांहून अधिक व्ह्यूज या चॅनेल च्या व्हिडियोज ना मिळाले आहेत. या चॅनेल च्या माध्यमातून निरंजन याने काम केलेल्या मालिकांतील कलाकारांसोबत त्याने मोकळ्या वेळात केलेली मस्ती दिसून येते. तसेच काही प्रसंगी स्वतःच्या आयुष्यातील काही भाग निरंजन आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो आणि त्याच्या नाटकांचे व्हिडियोज आहेतच. असा हा हरहुन्नरी आणि मनमिळावू कलाकार सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत व्यस्त आहे. त्याची अभि ही व्यक्तिरेखाही प्रसिद्ध होते आहे. निरंजन यांस या मालिकेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !