Breaking News
Home / मराठी तडका / आई कुठे काय करते ह्या मालिकेतील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार, ३ नंबर जोडी तर नक्की पहा

आई कुठे काय करते ह्या मालिकेतील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार, ३ नंबर जोडी तर नक्की पहा

स्टार प्रवाहवरील गेल्या वर्षभरात सर्वात जास्त लोकप्रिय आणि चर्चेत असणारी मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. २३ डिसेंबर २०१९ ला आलेल्या ह्या मालिकेला आता काही दिवसांतच वर्ष पूर्ण होईल. ह्या मालिकेतील कथानक आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली हि मालिका मराठी मालिकांमध्ये टी आरपी मध्ये देखील नंबर एकवर होती. ज्याप्रमाणे हि मालिका गाजत आहे त्याचसोबत ह्या मालिकेत काम करणारे कलाकार देखील तितकेच लोकप्रिय होत आहेत. मग ती अरुंधती असो, अनिरुद्ध असो, संजना असो किंवा मग मालिकेतील इतर कलाकार, सर्वांनाच ह्या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. आजच्या लेखात आपण ह्या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराविषयी जाणून घेणार आहोत.

१. मधुराणी गोखले प्रभुलकर (अरुंधती)

मालिकेत अरुंधतीची मुख्य भूमिका निभावणारी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले प्रभुलकर. मधुराणी ह्यांनी अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. नवरा माझा नवसाच्या चित्रपटांत अशोक सराफ ह्यांच्या सोबत गों-धळलेली न्यू-ज अँकरची भूमिका त्यांनी उत्तमरीत्या निभावली होती. त्यांनी सुंदर माझं घर, गोडगुपित, मणीमंगळसूत्र ह्यासारख्या चित्रपटांत कामे केलीत. मधुराणी गोखले प्रभुलकर ह्यांचा विवाह ९ डिसेंबर २००३ रोजी दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर ह्यांच्याशी झाला. प्रमोद प्रभुलकर हे देखील मराठी चित्रपटसृष्टी निगडित काम करतात. ते एक दिग्दर्शक आहेत. गेल्यावर्षीच त्यांचा ‘युथट्यूब’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचसोबत प्रमोद आणि मधुराणी दोघेही मि-रॅकल्स अ-कॅडमी चालवतात. ह्या अ-कॅडमी अंतर्गत तरुणांना अभिनयाचे शिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहन देतात. दोघांनाही एक लहान मुलगी देखील आहे.

२. मिलिंद गवळी (अनिरुद्ध)

मिलिंद गवळी ह्यांनी मालिकेत ग्रे शेड असणारी अनिरुद्ध नावाची व्यक्तिरेखा निभावली आहे. त्यांनी हि भूमिका इतक्या उत्तमप्रकारे निभावली आहे कि त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. मिलिंद गवळी ह्यांनी बालकलाकार म्हणून ‘हम बच्चे हिं-दुस्तान के’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यांनी हिंदी, मराठी, दक्षिणात्य भाषांमधून कामं केली आहेत. त्यांनी मध्ये अभिनयातून गॅप घेत मुंबई युनिवर्सिटी मधून एम.कॉमचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ऑल इंडिया रेडियो साठी रीतसर परीक्षा देऊन त्यात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर अभिनयात पून्हा कमबॅक केलं आणि मग मागे वळून पाहिलं नाही. मिलिंद ह्यांच्या पत्नीचे नाव सौ. दीपा गवळी. एकदा जळगाव येथे एका विवाहसोहळ्यादरम्यान दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर पुढे दोघांनीही प्रेमविवाह केला. दोघांनाही मिथिला नावाची एक मुलगी असून ती उत्तम नर्तिका आहे आणि ती नृत्य सुद्धा शिकवते. २०१८ मध्ये तिचा विवाह संपन्न झाला.

३. अभिषेक देशमुख (यश)

मालिकेत आईची नेहमी साथ देणारा पात्र म्हणजे यश. यशाची भूमिका निभावली आहे ती म्हणजे अभिनेताअभिषेक देशमुख ह्याने. अभिषेकला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकांपासून केली. ‘मुंबई मान्सून’, ‘पैगाम’ ह्यासारख्या नाटकांत त्याने मुख्य भूमिका साकारल्या. त्याचसोबत त्याने ‘मुलगी पसंत आहे’ हि लोकप्रिय मालिका केली. ह्या मालिकेतील त्याची ‘वा-सू’ हि भूमिका खूप लोकप्रिय ठरली. माधुरी दीक्षित निर्मित ‘१५ ऑगस्ट’ ह्या चित्रपटांत काम केले आहे. त्याच सोबत त्याने ‘फो मो’, ‘गर्दीतले द-र्दी’, ‘होम स्वीट होम’ ह्यासारख्या वेबसिरीजमध्येही काम केले आहे. यशचे लग्न अभिनेत्री कृतिका देव हिच्यासोबत २०१८ साली झाले. कृतिकाने खूपच कमी काळात नाटक, सिनेमा, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्स, मालिका, जाहिराती अशा विविध माध्यमांतून कामे केली आहेत. त्याचसोबत ती उत्तम नर्तिका आणि निवेदकसुद्धा आहे. ‘इंटरनेट वाला लव’ हि तिची लोकप्रिय मालिका. ‘राजवाडे आणि सन्स’, ‘बकेट लिस्ट’ ह्यासारख्या लोकप्रिय मराठी चित्रपटांत काम केले. त्याचसोबत पा-निपत, हवाईजादा ह्यासारख्या हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले. यश आणि कृतिका ह्या दोघांच्याही लग्नाला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.

४. रुपाली भोसले (नवीन संजना)

‘आई कुठे काय करते’ मालिकेत लॉ-कडाऊन मध्ये एका कलाकाराची बदली करण्यात आली. ते पात्र होते संजनाचे. मालिकेत जुन्या संजनाची म्हणजे दीपाली पानसरे हिची जागा नवीन संजना म्हणजे रुपाली भोसले हिने घेतली. आता रुपाली संजनाची खलभूमिक खूप उत्तमप्रकारे निभावत आहे. रुपाली हिला आपण ‘मराठी बिग बॉस सीजन २’ मधून ओळखतोच आहे. रुपालीने ह्याअगोदर ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘एक झोका नियतीचा’ ह्यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये कामे केली आहेत. तर ‘बडे दूर से आए है’, ‘तेनाली रामन’ ह्यासारख्या हिंदी मालिकेतही काम केले आहे. रुपालीने ‘सं-दुक’ ह्या मराठी तर ‘रि-स्क’ ह्या हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले आहे. रुपालीच्या खऱ्या आयुष्यातील प्रियकराचे नाव अंकित म गरे असून दोघांचीही पहिली भेट एका कॉफी शॉप मध्ये झाली होती. अंकित हा चित्रपट निर्माता असून त्याने ‘गडद जांभळ’ ह्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याचसोबत अंकित हा ‘मराठी बॉक्स क्रिकेट’ संघाचा मालकही आहे.

५. दीपाली पानसरे (जुनी संजना)

‘आई कुठे काय करते’ मालिकेत महिला खलभूमिका असलेले मुख्य पात्र म्हणजे संजना. संजनाचे हे पात्र सुरुवातीला अभिनेत्री दीपाली पानसरे हिने साकारले होते. दिपाली पानसरे हिने संजनाची भूमिका खूप उत्कृष्टरीतीने वठवली होती. पण लॉ-कडाऊननंतर मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी मालिकेतून बाहेर जाण्याचा पर्याय निवडला. दिपालीने हिंदी सोबतच मराठी मालिकांमध्ये कामे केली आहेत. तिने ‘हम लडकीया’, ‘इस प्यार को क्या नाम दु’, ‘दिल तो हॅप्पी है जी’, ‘अ-दालत’, ‘देवों के देव महादेव’ ह्यासारख्या अनेक हिंदी मालिकेत काम केले आहे. त्याचसोबत ‘एक थी डा-य-न’ ह्या चित्रपटात सुद्धा काम केलेले आहे. ‘देवयानी’ मालिकेतून ती लोकप्रिय झाली. दिपालीच्या खऱ्या आयुष्यातील पतीचे नाव सुवीर सफाया आहे. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दिपालीचे १० फेब्रुवारी २०१४ रोजी प्रियकर सुवीर सोबत ज-म्मूमध्ये लग्न झाले. सुवीर हे व्यवसायाने ते बँकर आहेत. दोघांनाही एक मुलगा असून त्याचे नाव रुयान असे आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.