Breaking News
Home / मनोरंजन / आई खोटंखोटं रागावल्यावर ह्या बाळाने केलेले क्युट हावभाव पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

आई खोटंखोटं रागावल्यावर ह्या बाळाने केलेले क्युट हावभाव पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

लहान बाळं आणि त्यांचे हावभाव म्हणजे कमाल, धमाल, बेमीसाल समीकरण असतं. त्यांचं वय एवढं लहान असतं की बऱ्याच गोष्टी कळत नसतात. पण तरीही त्या त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर येणारे भाव आपल्याला मात्र हसवून सोडतात. अर्थात काही गोष्टी तर आपसूक कळतात म्हणा. जसे की कोणी ओरडले तर किंवा कोणी हसवण्याचा प्रयत्न केला तर आपसूक कळतंच. पण काही वेळेस एखादी व्यक्ती मग ती कितीही जवळची असो, प्रेमाने ओरडली तरी वाईट वाटू शकतं. आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो ही याच्याशी साधर्म्य असणारा आहे. अर्थातच हा व्हिडियो आहे एका छोट्या बाळाचा. अवघ्या काही सेकंदांचा आहे हा व्हिडियो. पण यात जो काही निरागसपणा आपल्याला दिसतो ना त्याला तोड नाही. या व्हिडियोत आपल्याला हे बाळ आई किंवा आजींच्या पायावर पहुडलेलं दिसतं.

ते टप्पोरे डोळे आपल्या मनात वसतात. दृष्ट लागू नये या बाळाला असं आपसूक मनात येतं. इथे या बाळाला घेऊन बसलेल्या ताईंना बाळाची जरा गंमत करण्याची हुक्की येते. मग काहीसं रागावल्यासारखं करत त्या ‘काय आहे’ एवढंच म्हणतात. मग काय, हे छोटं बाळ रडू लागणार असतं. डोळ्यात करुणा जमा झालेली असते आणि तोंडाचा पण चंबू झालेला असतो. पण त्या बाळाला चूप असं बोलतात. हे सगळं मस्करीत चालत असतं. पण बाळ मात्र रडणार असंच वाटत असतं. पण हे रडणं आवरलेलं असतं. पण काही क्षणच. थोड्या वेळानंतर त्या टप्पोऱ्या डोळ्यात पाणी येतं आणि आपसूक आपल्याला ही वाईट वाटायला लागतं आणि हा व्हिडियो संपतो.

खरं तर कधी कधी बाळांच्या खोड्या काढण्याची लहर आपल्यालाही येते. पण त्यांच्या गोंडस चेहऱ्यावर असलेले भाव बघून मात्र आपण स्वतःला आवरत घेतो. आम्हाला खात्री आहे की हे बाळ रडू लागल्यानंतर या ताईंनी ही मस्करीत का होईना ओरडणं बंद केलं असेल. व्हिडियो अगदी पंचवीस सेकंदांचा आहे. पण तरीही मनात घर करून जातो.

आपणही हा व्हिडियो पाहिला असेलच. त्याविषयी आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा. मित्रांनो हा व्हिडीओ म्हणजे आई आणि बाळ ह्यांच्यामधील एक गोड क्षण आहे. प्रत्येकाला वाटत असतं कि आपल्या मुलाचं हसणं-रडणं, त्याचे हे सुंदर क्षण कॅमेरामध्ये कैद करावे. त्याच प्रसंगाने हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. तर हे केवळ मनोरंजन म्हणून पहा. आपल्या प्रतिक्रिया आणि सकारात्मक सूचना यांमुळे आम्हाला नवनवीन गोष्टी कळतात. त्यांचा अंतर्भाव करत आम्ही नवनवीन लेख लिहीत असतो आणि त्यामुळे लेख उत्तम होत जातात आणि आपलं ही मनासारखं मनोरंजन होतं. तेव्हा आपल्या सकारात्मक सूचना आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळवत राहा. आपल्या टीमचा आणि आपला हा स्नेह सदैव कायम राहू दे ही सदिच्छा. आपल्या प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.