Breaking News
Home / मनोरंजन / आई बहिणीला मा’रत असताना भावाने पुढे येऊन जे केले ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

आई बहिणीला मा’रत असताना भावाने पुढे येऊन जे केले ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

लहान मुलांच वागणं हे कधी कधी गंमतीशीर असतं, कधी राग अनावर करतं, तर कधी कौतुकाने डोळ्यांत पाणी आणतं. पण या सगळ्यांमध्ये महत्वाचं म्हणजे लहान मुलांचा निरागसपणा आपलं मन जिंकून जातो. किंबहुना आपल्या मोठ्यांच्या आयुष्यात निरागसपणा हा जवळजवळ निघून गेलेला असतो. आजूबाजूच्या परिस्थतीशी झुंजताना ते होणं साहजिकच असतं. पण तरीही या ना त्या कारणाने जेव्हा आपण लहान मुलांच्या संपर्कात येतो तेव्हा निरागसपणा आपल्याला पुन्हा एकदा स्पर्श करून जातो. त्यामुळेच मग वर उल्लेख केलेल्या कितीही गोष्टी झाल्या तरी शेवटी त्यांची परिणीती प्रेमातच होते.

त्यात आपली मुलं एखादं काम मनापासून करत असतील तर अजून भरून येतं. आता, आज आमच्या टीमने बघितलेल्या व्हिडियोचं उदाहरण घेऊ. हा व्हिडियो जुना की नवा ते माहीत नाही. पण त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना या कालातीत आहेत हे नक्की. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक लहान मुलगा एका भिंतीजवळ उभा असलेला दिसून येतो. पण तो एकटाच नसतो. त्याच्या पाठीमागे त्याची छोटी बहीण असते. तर त्याच्या समोर दोन स्त्रिया असतात. बहुधा त्यांच्या पैकी एक कोणी तरी त्या दोन लहानांची आई असावी. पण नक्की काय ते सांगता येत नाही. असो. पण एक मात्र खरं की त्या घरातील मुख्य व्यक्ती असाव्यात.

तसेच काही कारणामुळे त्या ओरडत असतात. बहुधा खोटं खोटं ओरडत असाव्यात असा अंदाज करता येतो. बरं यातही त्या या दोन लहानांमधील त्या छोट्या मुलीला ओरडत असतात. पण हे बघून तिचा तो किंचितसा मोठा भाऊ पुढे सरसावलेला असतो. आपल्या बहिणीचं संरक्षण व्हावं यासाठी जणू ढाल बनून तिच्या पुढ्यात उभा असतो. तसेच ओरडणाऱ्या त्या दोघींना वारंवार असं करू नका अस सांगत असतो. इतकंच नाही तर अजूनही बरंच काहीसं बोलत असतो. पण आपल्याला येणारा त्याचा अस्पष्ट आवाज आणि बहुधा अनोळखी भाषा यांमुळे संभाषण काही कळत नाही. पण खरं तर गरज ही नसते. कारण त्याची देहबोली आणि चेहऱ्यावरील चिंता सगळं सांगून जात असते. तसेच एकटा असला तरी नेटाने या आलेल्या, ‘संकटाचा’ सामना करत असतो. त्या बहिणीला जेव्हा कोणी तरी खोटं खोटं मारल्यासारख करतात तेव्हाही तो तिला वाचवायला पुढे जातो. बोलणं आणि नकारार्थी मान हलवण चालूच असतं. पण हे सगळं करूनही काही साध्य होईना तेव्हा तो बहिणीचा हात पकडून सरळ तिसऱ्याच व्यक्तीकडे घेऊन जातो जी कॅमेऱ्यातून या सगळया प्रसंगाचं चित्रीकरण करत असते. बरं नुसता जात नाही तर त्या दोघींचं, ‘नाव ही सांगतो’. या क्षणाला मात्र आपल्याला हसू ही येतं आणि त्याचं कौतुक ही वाटतं.

नंतर ही काही वेळ हा व्हिडियो चालतो. पण यात नोंद घ्यावी अशी बाब म्हणजे त्याची छोटी बहीण शांत असते. बहुधा तिला हे सगळं नाटक आहे हे कळत असतं. पण आपले छोटे भाऊ मात्र गंभीर होऊन वागत असतात. अर्थात ते काहीही असलं तरी त्याचं हे वागणं आपलं मन जिंकून जातं. आपल्या ओळखीतल्या किंवा अगदी घरातल्या एखाद्या भावा बहिणीची जोडी यावेळी लक्षात येते. अगदी आपल्याला ही बहीण वा भाऊ असेल तर त्यांची आठवण मनात तरळून गेल्या शिवाय राहत नाही. असो.

आपल्या टीमने हा सदर व्हिडियो बघितला आणि आम्हाला तो आवडून गेला. म्हंटलं यावर नक्की लिहिलं पाहिजे. यातूनच आजचा हा लेख लिहिलेला आहे. आमच्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *