Breaking News
Home / मनोरंजन / आई बोलली, “कपड्याला डाग नको”.. म्हणून तरुणाने काय आयडिया केली ते, बघा व्हिडीओ

आई बोलली, “कपड्याला डाग नको”.. म्हणून तरुणाने काय आयडिया केली ते, बघा व्हिडीओ

जून महिना सुरु झाला आणि पावसाला एव्हाना सुरुवात झाली आहे. त्यामुळे कडकडीत उन्हात तापून निघालेले आपण, चातकापेक्षा ही अधीरतेने, पावसाची वाट पाहत होते. कारण हा पावसाळा, उन्हाची तीव्रता घालवेतोच, सोबतच पाण्याची पातळी वाढवण्याबरोबर निसर्ग पुन्हा हिरवागार करून टाकतो. अर्थात अस असलं तरी पावसाळ्यात एक गोष्ट अशीही होते जी कोणालाच आवडत नाही.

होय, तोच तो कपडे खराब करणारा चिखल होय. पहिला पाऊस आला की आपल्याला एवढं बरं वाटतं की साचलेला चिखल ही काही क्षणांसाठी बरा वाटून जातो. पण हे कौतुक क्षणभंगुर असतं. एकदा का कपडे खराब व्हायला सुरवात झाली आणि ते धुताना, हाताची हाडं गळ्यात आली की चिखलाला शिव्या पडतात. मग पुढचे सगळे चार महिने पावसाचा आनंद घेत गेला तरी, कपडे सावरण्यातही जातो. त्यात जरा कुठे कुचराई केली की चिखलपंचमी झालीच म्हणून समजा. पण अस असलं तरी त्यावर काही उपाय असतात. मग त्यासाठी वेगळे पादत्राणे वापरणे वगैरे उपाय आले. पण मंडळी, आपलं जग हे एकापेक्षा एक व्यक्तींनी भरलं आहे. या व्यक्तींच्या सुपीक डोक्यातून कधी काय आयडियाच्या कल्पना निघतील ते सांगता येत नाही. अर्थात प्रत्येक कल्पना काही प्रत्यक्षात येऊ शकत नाही. पण त्याचं प्रात्यक्षिक बघताना मात्र मजा येते. असंच एक मजेशीर पण कठीण प्रात्यक्षिक आमच्या टीमने बघितलं.

अर्थात, प्रत्यक्ष बघितलं नसलं तरी एका व्हिडियोमुळे हा सगळा प्रकार बघता आला. या व्हिडियोतुन आपल्याला चिखल अंगावर न उडवता, कपडे खराब न करता कस चालायचं ते दाखवलं आहे. अर्थात चालायचं म्हणत असलो तरी येथे पायांची भूमिका बदललेली असते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक आफ्रिकन माणूस एका ठिकाणी उभा असलेला दिसून येतो. कदाचित तिथे एखाद्या छोट्या पाणीस्रोताचं पात्र असावं. ते काहिही असलं तरी पावसाळ्यात जसा चिखल असतो तसा चिखल दिसून येतो. बरं या मुलाने, त्यामानाने उंची कपडे घातलेले असतात. व्हिडियोच्या सुरुवातीलाच तो शर्टाचे कफलिंक्स काढून देतो. यावरून एखादया महत्वाच्या ठिकाणीच तो जात असावा. पण एवढा चिखल आणि एवढे चांगले कपडे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. पण पठ्ठ्याने यावर उपाय शोधून काढलेला असतो. हा भाऊ, आपल्या शर्टाच्या बाह्या वर घेतो आणि थेट हॅन्ड स्टॅण्ड करतो ना भाई… फुल्ल ऑन अथलिटिक माणूस ! बरं तो जे अंतर पार करू इच्छितो ते काही छोटं अंतर नक्कीच नसत. कदाचित पायी असेल पण असं हातांवर उभं राहून जाणं म्हणजे कठीणच. माणूस कितीही बारीक असला तरी पूर्ण शरीराचा भार हातावर येतो. अगदी काही क्षणांनंतर या भावाच्या बाबतीत ही हेच झालेलं जाणवतं. आपला समतोल राखण्यासाठी तो पाय एकमेकांजवळ आणतो. पण तो त्याच्या या प्रयत्नांत यशस्वी होतो का? की सगळी चिखलपंचमी होते? याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ शकतो. पण त्याऐवजी तुम्हीच ती पाहिलीत तर? होय, आम्ही इथे सगळं लिहून आपली मजा काढून घेण्यापेक्षा, तो व्हिडियोच खाली शेअर करतो आहोत. हा लेख संपला की आपल्याला हा व्हिडियो बघता येईल.

आमच्या टीमने तर श्वास रोखून हा व्हिडियो बघितला. आपणही एकदा नक्कीच बघा. तसेच एक विशेष विनंती. हा व्हिडियो बघून, आपणही असं काही करायला जाऊ नका. कारण हातांवर उभं असलं की जराशी चुकी महागात पडू शकते. त्यात चिखलात हे असले प्रकार म्हणजे जीवावरचीच कामं आहेत. कारण त्या निसरड्या चिखलात, शेवाळात कधी काय होईल ते सांगता येत नाही. तेव्हा चिखल असो वा नसो, आपण कृपा करून हे असले स्टंट करू नका ही विनंती. असो. सध्या हा लेख इथेच थांबवूया. जेणेकरुन आपल्याला तो व्हिडियो बघता येईल.

तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *