Breaking News
Home / मनोरंजन / ‘आई माझी मायेचा सागर’… ह्या मुलाने बनवलेलं गाणं ऐकून तुमचे देखील डोळे पाणावतील

‘आई माझी मायेचा सागर’… ह्या मुलाने बनवलेलं गाणं ऐकून तुमचे देखील डोळे पाणावतील

असं म्हणतात लहान मुलं म्हणजे देवा घरची फुलं. आणि ह्या मुलांचे पहिले दैवत म्हणजेच आई वडील. वडील परिस्थितीनुसार कठोर होत असतात. परंतु आई मात्र मनाने प्रेमळ होऊन आपल्या लेकरावर जीवापाड प्रेम लावते. तिच्या मायेची ऊब लेकराला हवीहवीशी वाटते. कधी वडील रागावले तर आईच पुढे येऊन लेकराला पदराखाली घेते. स्वतः उपाशी राहील पण लेकरू मात्र पोटभर जेवलं पाहिजे, हेच तिच्या ध्यानीमनी असतं. तिची पोराबद्दलची काळजी पाहून एखादवेळी दगडाला देखील पाजर फुटेल. माउलीला आपल्या लेकराबद्दल इतकं आभाळागत प्रेम, माया, काळजी असणारच हो, शेवटी नऊ महिने आपल्या पोटात जपून काळजी घेतली आहे तिने. स्वतःच्या जिवापेक्षा जास्त काळजी वाटणारच माईला. आता आईची माहिती किती सांगणार, आई वर तर अनेक पुस्तकं, कविता, चित्रपट, नाटकं निघाली. आता तुम्ही म्हणाल आम्ही इतकं आई बद्दल का सांगतोय? तर आम्ही आज एका व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत, ज्यात मुलाने एका हिंदी गाण्याच्या चालीवर आईवर एक सुंदर असं गाणं बनवलं आहे.

१९९५ साली आलेला ‘करन-अर्जुन’ चित्रपट तर खूप गाजला होता. त्या चित्रपटातील ‘ये बंधन तो प्यार का बंधन है’ हे आईवर चित्रित केलेले गाणं सुद्धा खूप हिट झाले होते. आपल्या व्हिडीओत असलेल्या मुलाने ह्याच गाण्याच्या चाली वापरून आईवर सुंदर आणि भावनिक गाणं बनवलं आहे. सदर व्हिडीओ एखाद्या छोट्या धाब्यावर रेकॉर्ड केले असून ह्या मुलाच्या आवाजात हे गाणं ऐकायला खूप भारी वाटतं. मुलाने जास्त सिरीयस न होता मस्ती म्हणून गाणं गायले असले तरी ह्या गाण्याला हवा असलेला वरच्या आवाजातील स्वर गाण्यात एक वेगळाच प्रभाव पाडतो. ह्या गाण्यात आईची महती सांगितली आहे, जे ऐकून आपल्या डोळ्यांत देखील आपसूकच पाणी येईल. आई वडिलांचे उपकार सुद्धा मुलाने गाण्यात मांडले आहेत. आपल्या जीवनाला आई वडिलांचा किती आधार असतो, त्यांच्याशिवाय आपण काहीच नाहीत. पुढे गाण्यात आईने आपल्यासाठी उन्हातान्हात कष्ट केले. कधी तिला मूठभर भाकर मिळाली नाही, तर कधी ती स्वतः उपाशी राहिली. मात्र लेकराला पोटभर अन्न मिळावे म्हणून ती मेहनत करत राहिली. त्यानंतर मस्ती मस्तीत हसत खेळात हा व्हिडीओ संपतो.

परंतु गाण्याची चाल आणि गाण्यातल्या ओळी मात्र गाणं संपलं तरी आपल्या लक्षात राहतात. आणि खरंच आहे, आपण कधी मोकळ्या वेळात जर विचार केला ना कि आईने आपल्यासाठी काय काय नाही केलं. तरी तुमची यादी अपुरी पडेल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती तुमचाच विचार करत असते. तुमच्यासाठीच झटत असते. आता ती आपल्या डोळ्यांसमोर आहे म्हणून आपल्याला तिचे इतके महत्व वाटत नाही. परंतु ती जेव्हा एका आठवड्यासाठी जरी माहेरी किंवा कुठे गेली तरी आपली किती कामे अडतात ह्याचा विचार करा. तिच्याशिवाय करमत सुद्धा नाही. आपल्याला आईची इतकी सवय झालेली असते कि ती बाहेर गेली कि आपली कामं आवरता आवरत नाहीत. आणि आईची खरी किंमत त्यांना विचारा ज्यांची आई ह्या जगात नाही. खरंच मित्रांनो तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात, आई तुमच्या जवळ आहे. फक्त तिलासुद्धा तुमचे प्रेम दिसू दे. तिच्याबद्दलची तुमची काळजी दिसू दे. तिच्याशी शक्य होईल तितक्या प्रेमाने वागा, तिचा आदर करा, तिची काळजी घ्या, आणि तिच्या कामाचे कौतुक करा. ह्या गोष्टी वडिलांना सुद्धा लागू होतात बरं का. आणि हो, खाली दिलेला हा व्हिडीओ पाहायला विसरू नका. खरंच खूप छान गाणं म्हटलं आहे मुलाने.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.