Breaking News
Home / मनोरंजन / आई रा’गावली असताना ह्या मुलाने असं काही केले तिचा रा’ग कुठच्या कु’ठे गेला, बघा हा वायरल व्हिडीओ

आई रा’गावली असताना ह्या मुलाने असं काही केले तिचा रा’ग कुठच्या कु’ठे गेला, बघा हा वायरल व्हिडीओ

लहान मुलं आणि त्यांचं भावविश्व म्हणजे आपल्यासाठी अप्रूप आणि कौतुकाची बाब. पण या भावविश्वात मग्न असताना ही लहान मुलं काही वेळेस असं काही करून जातात की आपला राग अनावर झाल्याशिवाय राहवत नाही. खासकरून त्या बाळाच्या आईचा. कारण ही माऊली सगळं सांभाळत असते, त्यात या बाळाचे लाडही करत असते, त्याला हवं नको ते बघत असते. कामाच्या ओझ्यामुळे थकून जाते बिचारी आणि त्यात बाळराजेंनी काही पराक्रम करून ठेवले की मग मात्र तिचा पारा चढल्यावाचून राहत नाही. कितीही प्रेम असलं आपल्या बाळावर तरी ती त्याला रागे भरतेच. असंच काहीसं घडलेल्या एका आई आणि बाळाचा व्हिडियो सोशल मीडियावर आमच्या टीमला सापडला. हे बाळ एवढं गोंडस दिसतं की पाहताच क्षणी प्रेमात पडावसं वाटावं. त्याचे ते गोबरे गोबरे गाल बघून गुगली वुगली वुश करावंसं वाटतं. पण त्याच क्षणी त्याच्या टपोऱ्या डोळ्यांकडे नजर जाते आणि वाईट वाटतं. कारण आई या बाळाला ओरडत असते आणि त्यामुळे डोळ्यात रडवेले भाव असतात.

इथे दुसरी कडे आई साहेबांचा पारा चढलेला असतो. आपल्या भावविश्वात रममाण या बाळाने आपल्या धुंदीत सगळे टिशू पेपर खराब करून टाकलेले असतात. आधीच कामाचा रगाडा आणि त्यात अजून एक काम, त्यामुळे आई चिडलेली असते. या बाळाला वरच्या रुम मध्ये बंद करण्याची ताकीद मिळते. खासकरून चिपकली (पाल) असलेल्या रूम मध्ये. त्याला वारंवार विचारत असते असं का केलं म्हणून. तिचा संताप अनावर झालेला असतो. या संपूर्ण वेळेत बाळाच्या चेहऱ्यावर जुनेच खजील झाल्याचे भाव असतात. काहीच प्रतिक्रिया न आल्याने आईचा पारा अजून चढत जातो पण तेवढ्यात हे लबाड बाळराजे खुदकन हसतात. त्याच्या मिश्किल हास्याने आपणही चकित आणि आनंदी होतो. जणू काही एखाद्या मोठ्या माणसासारखं या बाळाने आपलं हसू आवरतं घेतलेलं असतं आणि वेळ आल्यावर हसत असतो असं वाटत राहतं.

पण एवढ्या निरागस आणि गोंडस बाळाच्या चेहऱ्यावर हसूच छान दिसतं. आणि आईची प्रतिक्रिया ? अहो ती तर माऊली ना. त्याचं हसू बघून तिचा राग क्षणार्धात कुठच्या कुठे पळून गेलेला असतो. एवढा वेळ व्यक्त केलेला राग कुठच्या कुठे गेलेला असतो. आपल्या टीमने एवढे व्हिडियोज पाहिले आणि त्यावर लेखन केलं. पण सगळ्यात गोड आणि लाघवी वाटावा असा हा व्हिडियो. आपल्या मराठी गप्पाच्या टीमच्या वतीने आणि वाचकांच्या वतीने ही या गोंडस बाळाला खूप खूप आशिर्वाद.

आपल्याला हा लेख आवडला असल्यास चट्कन जाऊ नका. कारण हा तर फक्त एक लेख आहे हो. असे अनेक लेख दररोज आपली टीम लिहीत असते आणि प्रकाशित करत असते. ते ही खास तुमच्यासाठी. तेव्हा त्यांचा आनंद घ्या आणि इतरांनाही तो वाटा. त्यासाठी आपले लेख शेअर करा. आपला आमच्या टीमवर असलेला लोभ सदैव कायम असुद्यात. धन्यवाद !!!

बघा हा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.