Breaking News
Home / मनोरंजन / आजकाल नवरा नवरीला उचलून घेणा-या तरुण पिढीने हा आदर्श घ्यावा, जोडीचे सगळीकडे होत आहे कौतुक

आजकाल नवरा नवरीला उचलून घेणा-या तरुण पिढीने हा आदर्श घ्यावा, जोडीचे सगळीकडे होत आहे कौतुक

आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या परत परत होत नाहीत. उदारणार्थ लग्न ही अशी गोष्ट आहे जी शक्यतो आयुष्यात एकदाच होते. सेलेब्रिटी किंवा मोठमोठ्या हिरो लोकांच्या आयुष्यात मात्र कितीही वेळा होऊ शकते. तर विषय असाय की, 2-4 दिवसांपूर्वी एक बातमी वाऱ्याच्या वेगाने अवघ्या महाराष्ट्रात पसरली. ती बातमी होती, लग्न मोडल्याची आणि लग्न मोडण्याचे कारण होते की, नवरदेवाच्या मित्रांनी नवरीच्या तोंडावर मजेने तांदूळ फेकून मारले. तर लग्नात असे अनेक किस्से होत असतात. मात्र सध्याच्या काळात किरकोळ कारणांमुळे लग्न मोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

सोशल मीडियावर लग्नसमारंभातील अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. तसेच काही गंभीर व्हिडीओही समोर येतात. आपल्याला असले व्हिडीओ पाहून हसू येते, मात्र तिथे उपस्थित असलेले लोक मात्र प्रचंड गंभीर असतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ मागे व्हायरल झालेला आणि अखेर चेष्टा मस्करीमुळे ते लग्न मोडलं. मात्र या अशा चेष्टेच्या काळात एका जोडप्याने आदर्श पध्दतीने लग्न कसे करावे, आदर कसा असावा, हे लग्नात दाखवून दिले आहे आणि याचेच कौतुक सगळीकडे होत आहे.

गडबड, गोंधळ, धिंगाणा, मजा, सुग्रास जेवण, मान अपमान अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडच्या लग्नात असतात. लग्नात काही महत्वाच्या वेळा असतात, त्यापैकी एक म्हणजे वरातीची आणि दुसरी म्हणजे वरमाळेची. जेव्हा नवरीबाई आणि नवरदेव एकमेकांना वरमाळा घालतात. यावेळी काही जणांना नवरीची किंवा नवऱ्याची चेष्टा मस्करी करायची असते… कुणी नवरदेवाला उचलून घेते तर कुणी नवरीला. आणि यातच कधी कधी नको असणाऱ्या घटना घडतात. या अघटित गोष्टींनंतर ज्या नंतर खूप गोड किंवा नको वाटणाऱ्या आठवणींच्या स्वरुपात कायम स्मरणात राहातात.

मात्र अशी चेष्टा मस्करी करण्यापेक्षा आज या व्हिडीओत जे घडलं आहे, ते घडलं तर अधिक उत्तम होईल. आजच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरा जेव्हा नवरीला वरमाला म्हणजेच हार घालत असतो तेव्हा नवरी गुडघ्यावर बसते आणि नवरा हार घालतो. तर जेव्हा नवरी हार घालते तेव्हा नवरा गुडघ्यावर बसतो. खऱ्या अर्थाने ही संसारात प्रेम वाढण्याची आणि संस्कृतीचा आदर करण्याची पद्धत आपल्या तरुणाईला पुढे घेऊन जाणारी ठरेल.

आता या व्हायरल व्हिडीओमुळे 2 गोष्टी होतील. पहिलं म्हणजे वरमाला घालण्याचा एक चांगला पायंडा लग्नात पडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं लग्नही लोकांच्या लक्षात राहील. तसं पाहिलं तर आपलं लग्न लोकांच्या लक्षात राहावं यासाठी खूप पैसे खर्च करतात. मात्र या जोडप्याने आपल्या एका छोट्याशा कृतीतून आपलं लग्न लोकांच्या लक्षात राहिलं, असं केलं आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील विचार आपल्याला पटला तर हा व्हिडीओ आणि लेख नक्कीच शेअर करा.

एकमेकांचा, त्यांच्या आवडी-निवडीचा, त्यांच्या कामाचा आदर केला तर संसारातील आदर, प्रेम आपोआपच द्विगुणीत होईल. आणि लग्नाच्या या वरमाला घालण्यातुन हा आदर व्यक्त केला जात असेल तर संसार सुखाचा होणार, यात शंकाच नाही.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.