Breaking News
Home / मनोरंजन / आजकाल लोकं कोणत्या संगिताच्या तालावर नाचतील काही सांगता येत नाही, बघा भाऊंचा हा अतरंगी व्हिडिओ

आजकाल लोकं कोणत्या संगिताच्या तालावर नाचतील काही सांगता येत नाही, बघा भाऊंचा हा अतरंगी व्हिडिओ

80 चे दशक म्हणजे एकदम भारी काळ होता. तो एक असा काळ होता, जेव्हा प्रत्येक रस्त्यावर आणि परिसरात एक गोष्ट गुंजत होती, ती म्हणजे ‘अरे अजून किती अँटेना फिरवू भाऊ… आले का नाही सिग्नल? गेल्या का मुंग्या?… मग खालून आवाज यायचा… होईन होईन… अजून थोडं फिरवा.. मग सगळं ओक्केमधी होईन… आणि मग थोड्याच वेळात खाली घरात टीव्हीवर चित्र व्यवस्थित दिसत असायचे. या सगळ्या घडामोडीनंतर वर अँटेना सेट करायला गेलेला व्यक्ती खाली यायचा. हा किस्सा आहे दूरदर्शनच्या काळातील टीव्हीचा… तेव्हा दूरदर्शन लोकांसाठी पूर्णपणे नवीन होते. त्यावेळी लोकांना दूरदर्शनवर (दूरदर्शन टीव्हीवर) येणारे सर्व काही मोठ्या थाटामाटात पाहायला आवडायचे. मात्र, दूरदर्शनच्या जमान्यात आणखी एक मजेशीर गोष्ट असायची, ती म्हणजे टीव्हीवर चालत असताना अचानक टीव्हीच्या लहरी स्क्रीनची पाण्यासारखी हालचाल… दिवस बदलत गेले त्यांनतर सरकारी सह्याद्री चॅनल आलं. त्याचं म्युझिक लोकांना पाठ झालं होतं.

पुढे जाऊन देशात उदारीकरणाच्या धोरणाने जोर धरला आणि पुढच्या 15 वर्षात टीव्ही खूप बदलला. पण शेवटी म्हणतात न… जुनं ते सोनं. दर रविवारी आणि शनिवारी एकदम भारी भारी कार्यक्रम असायचे. रंगोली असेल मिकी माउस असेल किंवा लोरेण हार्डी असेल… ही झाली लहान मुलांना आवडणाऱ्या कार्यक्रमांची यादी… मोठ्या लोकांसाठी भारी भारी चित्रपट लागायचे. काही काळानंतर एक नविन मालिका सुरु झाली. तुम्हाला आठवते का ती मालिका खुप हिट झाली होती ती बघ बरं आठवुन जरा……. आठवली??… नाहि मी सांगतो. चंद्रकांता… आठवली का? त्यातला तो यख्खु पिताजी म्हणनारा. क्रुर सिंग? आठवला का? त्यावेळेस ती रवीवारी सकाळी ९ ला सुरु व्हायची. अशा एक न एनेक आठवणी दूरदर्शन आणि सह्याद्रीच्या आहेत. आता हे सगळं सांगण्यामागे एक हेतू आहे तो म्हणजे काल आमच्या टीमकडे एक व्हायरल व्हिडीओ आला. ज्यामुळे या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.

एवढचं नाही तर हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून खूप लोकांनी तो स्टेट्सला पण ठेवला. अनेक लोकांचे हा व्हिडीओ पाहून अक्षरशः पोट दुखले. कारण हा व्हिडीओ होताच तेवढा हसवणारा… तर सर्वसामान्य माणूस नाचायचे असल्यावर काय करेन… तर डीजेवर लग्नात नाचेल. किंवा हलगी-ताशा-ढोल याच्या सुरावर ताल धरेल. पण इथ एका पठ्ठ्याने कमाल केली आहे.

सह्याद्रीच्या बातम्या लागायच्या आधी जे म्युझिक लागायचं का? या भावाने चक्क त्यावरच डान्स केला आहे. आणि हा भाऊ गाड्या नीट करत असल्याने हातात पान्हा घेऊन हा भन्नाट डान्स केला आहे. विशेष बाब म्हणजे हा डान्स करताना त्याने साधा पाय ही उचललेला नाही. असलं हा खतरनाक डान्स बघून बघून लोकांनी या भावाला कोपरापासून नमस्कार केला. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *