९० च्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक चमकणारे सितारे आले परंतु ह्यापैकी काही एक दोन हिट चित्रपट देऊन गायब झाले, तर काहींनी आपल्या कुटुंबासाठी करिअर सोडले. त्याच सिताऱ्यांपैकी एक आहे ९० च्या दशकातील अभिनेत्री रितू शिवपुरी. तुम्हांला ‘लाल दुपट्टे वाली’ गाणे तर लक्षात असेलच, हे ‘आँखे’ चित्रपटाचे गाणे होते. ह्या चित्रपटातून रितू रातोरात स्टार बनली होती. ह्या चित्रपटांत रितूसोबत चंकी पांडे आणि मुख्य भूमिकेत गोविंदा होता. रितू शिवपुरीने ह्या चित्रपटानंतर अनेक चित्रपट केले, परंतु सर्वच चित्रपटात ती सहाय्यक अभिनेत्रीच्या रूपात दिसली. तिच्या काळात रितूची चर्चा एक बोल्ड अभिनेत्रींच्या रूपात होत होती. अनेक वर्षांपर्यंत चित्रपटात आपले नशीब आजमावल्यानंतर साल २००६ मध्ये रितू ने बॉलिवूड इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता, त्यानंतर रितू आपल्या वैवाहिक जीवनात रमली होती.
परंतु, ह्याच दरम्यान तिने इंडस्ट्री मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न तर केला परंतु पतीच्या आजरामुळे तिने आपला हा विचार बदलला. खरंतर, रितूच्या पतीच्या पाठीमध्ये ट्युमर होते, ज्यामुळे तिने करिअर पेक्षा पतीची देखभाल करणं महत्वाचे समजले. साल २०१४ मध्ये एका मुलाखतीत रितूने आपल्या चित्रपटसृष्टीला परतण्याच्या शक्यतेविषयी सांगितले होते कि, जेव्हा २००६ मध्ये ती पंजाबी चित्रपटासाठी १८ ते २० तास काम करून घरी परतायची तेव्हा तिचा पती झोपलेला दिसायचा. ह्या दरम्यान ती आपल्या पतीला वेळ देऊ शकत नव्हती, ह्या गोष्टीमुळे ती खूप त्रस्त असायची. तिला वाटायचे कि कदाचित करिअरच्या चक्कर मध्ये ती आपल्या कुटुंबापासून दूर तर नाही होणार. कारण ती तिच्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हती. तिने सांगितले होते कि, माझे पती खूप साधेसुधे माणूस आहेत. त्यांनी कधीही माझ्याशी ह्या गोष्टीबद्दल तक्रार केली नाही. परंतु मला ह्या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटायचे.
त्यामुळे तिने मग अभिनय सोडून काही वर्षे कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला. तिने चित्रपटांतून तर ब्रेक घेतला होता परंतु तिने आपल्यातील टॅलेंटला जाऊ दिले नव्हते. ह्यानंतर तिने ज्वेलरी डिझायनरच्या स्वरूपात काम करायला सुरुवात केली. रितू आपली आई सुधा शिवपुरी ह्यांच्या पावलावर चालण्याचे स्वप्न पाहते. काही वर्षांअगोदरच तिने टीव्ही सीरिअलमध्ये पुनरागमन केले आणि अनिल कपूरच्या ‘२४’ ह्या शो मध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसून आली. ह्यानंतर तिने ‘इस प्यार को क्या नाम दु’ ह्या टीव्ही शो च्या दुसऱ्या सीजनमध्ये खूप दमदार भूमिकेमध्ये दिसून आली. गोष्ट जर तिच्या लूक बद्दल कराल तर रितू आता बिलकुल सुद्धा ओळखू येत नाही आहे. अगोदर तर ती सुंदर दिसत होती परंतु आता पहिल्यापेक्षा अजून जास्त बोल्ड दिसत आहे.