पोलीस दल आणि माणुसकी यांचं एक अतूट नातं असतं. पोलीस दलात काम करणं हे किती जिकिरीचं आणि प्रसंगी जीवावर बेतणारं काम असतं हे काही नवीन सांगायची गरज नाही. पण त्यामुळे निडर आणि धडाकेबाज वृत्ती असणं महत्वाचं असतं. तसेच या कडक शिस्तीच्या पाठी तेवढाच माणुसकीचा झरा मनात असण्याची गरज असते. आपण मराठी गप्पाच्या माध्यमातून विविध बातम्या वाचल्या आहेत, त्यातून पोलिसांनी वेळप्रसंगी जीवावर उदार होऊन कसं कसं काम केलं, हे आपण पाहिलं आहेच. तसेच त्यांच्यातील कलाकार असलेले काही पोलीस बांधव ही पाहिले. आजच्या लेखातून आपण कर्तव्याची परिसीमा गाठणाऱ्या एका पोलिसाच्या कृतीचा आढावा घेऊ.
आमच्या टीमच्या नजरेस एक जुना व्हिडियो आला. यात एक वृद्ध स्त्री एका मध्यमवयीन स्त्री सोबत उभी असलेली दिसते. जवळच एक पोलीस अधिकारी उभा असलेला दिसतो. रेल्वे स्टेशन असल्याने वर्दळ आणि घोषणांचा आवाज असतोच. तो पोलीस अधिकारी आणि त्या स्त्रिया यांच्यात काही तरी बोलणं चालू असतं. तेवढ्यात तो पोलीस अधिकारी त्या वृद्ध स्त्रीच्या खांद्यातील बॅग काढून घेतो आणि खाली ठेवतो. आता काय होणार याची उत्सुकता निर्माण होते. ती स्त्री एकदा धडपडते. तेवढ्यात तो पोलीस अधिकारी तिला सावरतो आणि तिला अलगद उचलून घेतो. आपल्या लक्षात तोपर्यंत आलेलं असतं, कि हा अधिकारी आणि त्या स्त्रिया यांच्यात काय बोलणं चालू असेल. तो पोलीस अधिकारी त्या स्त्रीला तसाच उचलून घेऊन प्लॅटफॉर्म चे जिने पार करत करत वर ब्रिज वर घेऊन जातो. सोबत असलेली मध्यमवयीन महिला त्या वृद्ध स्त्रीच्या हातातील बॅग घेऊन पाठीमागून येत असते.
त्या ब्रिजच्या पायऱ्यांवरून चढ उतार करणारे प्रवासीही या पोलीस अधिकाऱ्याच्या कृती कडे पाहत असतात. कदाचित आमच्या टीमने केला तसाच मनोमन सलाम ही प्रवासी मंडळी या पोलीस अधिकाऱ्याला करत असतील. वर उल्लेख केल्याप्रमाणे पोलीस दल आणि माणुसकी यांतील नातं हे अतूट आहे. याचं हा व्हिडियो म्हणजे जिवंत उदाहरण. प्रसंगावधान दाखवून वेळ प्रसंगी कामाच्या पलीकडे जाऊन या वृद्धेला मदत करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यास आमच्या टीमचा मनापासून मानाचा मुजरा. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपल्या मराठी गप्पावर वायरल व्हिडीओज वरील लेख आम्ही नेहमी शेअर करत असतो. तुम्ही त्या लेखांचा हि आस्वाद घ्या.
बघा व्हिडीओ :