Breaking News
Home / मनोरंजन / आजी अंगाई गीत गाऊन झोपवत असताना ह्या मुलीने का’य आयडिया केली पहा, बघा व्हिडीओ

आजी अंगाई गीत गाऊन झोपवत असताना ह्या मुलीने का’य आयडिया केली पहा, बघा व्हिडीओ

मराठी गप्पाच्या वाचकांचे मनोरंजन करणे हे आपल्या टीमचे ध्येय आहे हे तर आपण जाणता. त्यासाठी वैविध्यपूर्ण लोकप्रिय विषयांवर आपली टीम सातत्याने लिखाण करत असते. मग त्यात कलाविश्वातील बातम्या असोत, सामान्य ज्ञानावर आधारित माहिती असो वा अगदी वायरल व्हिडियोज असोत. आपली टीम लोकप्रिय विषयांवर नेहमीच लिखाण करत आलेली आहे. आजच्या लेखाचा विषय ही लोकप्रिय आहेच. लहान मुलांचे खट्याळपणामुळे वायरल झालेले व्हिडियोज. आजचा व्हिडियो आहे एका छोट्या मुलीचा. ओवी देवरे असं या चिमुकलीचं नाव. लहान असली तरीही चाणाक्ष असलेली ओवी तिच्या गोड व्हिडियोज मुळे आपल्याला आवडून जाते. हे व्हिडियोज आपल्याला जागृती ठोंबरे या नावाने असलेल्या युट्यु’ब चॅ’नेल वर पाहायला मिळतात. त्यात ही छोटीशी ओवी आपल्याला अनेक रुपांतून भेटते. कधी आजीसोबत पोळ्या लाटत असते, तर कधी दत्तगुरुंच्या वेशात दिसून येते. पण एक व्हिडियो मात्र आपल्या अगदी खास लक्षात राहतो.

हा व्हिडियो आहे ओवी आणि तिच्या आजीचा. यात आजी ओवीला झोप यावी म्हणून अंगाई गात असतात. त्यात ओवी त्यांना साथ देत असते. अर्थात व्हिडियो च्या कॅप्शन मधून मात्र ओवी आजींना थांबवत असते असं वाचायला मिळतं. तसंही असेल असं मानुन आपण गालातल्या गालात हसतो आणि व्हिडियो पाहायला सुरुवात करतो. या व्हिडियोतुन खट्याळ ओवी आणि सुरेल आजी यांची मस्त अशी केमिस्ट्री दिसून येते. आजी एक दोन ओळी म्हणतात त्याला आलाप घेत ओवीची साथ मिळते. पण या दरम्यान ओवीच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव मात्र वेगवेगळे असतात आणि गंमतीदार ही. आपणही तिच्या या बाललीलांचा आनंद घेत असतो. प्रत्येक वेळी आजी काही ओळी म्हणतात आणि त्याला ओवीच्या आलापाची साथ मिळते. हेच पुन्हा पुन्हा होतं आणि प्रत्येक वेळी आपल्याला हसू फुटतं. बालपण देगा देवा हेच खरं.

या वयातला निरागसपणा आपल्यात पुन्हा कधी येतच नाही. त्यामुळे या वयात केलेली मजा मस्ती सुद्धा गोड वाटते. या व्हिडियोतील खट्याळ ओवी करत असलेली मजा आपल्या मराठी गप्पाच्या टीमला तर खूप आवडली आणि त्यामुळे हा लेख लिहायला घेतला. हा व्हिडियो पाहिल्यावर तुम्हालाही आवडेल किंबहुना आवडला असेलच एव्हाना. सोबतच हा लेख ही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. पण केवळ एकाच लेखावर समाधान मानू नका मंडळी. वर उल्लेख केल्याप्रमाणे आपली टीम सातत्याने विविध विषयांवर लेखन करत असते. तेव्हा या लेखांचा ही आस्वाद घ्या. आपल्याला जे जे लेख आवडतील ते लेख शेअर करा. तेवढाच आमच्या टीमला प्रोत्साहन मिळाल्याचा आनंद. मराठी गप्पावर आपला लोभ कायम असावा. मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *