Breaking News
Home / मनोरंजन / आजी काय आज कोणाला ऐकत नाय, बघा आजीने भर मांडवात केलेला हा जबरदस्त डान्स

आजी काय आज कोणाला ऐकत नाय, बघा आजीने भर मांडवात केलेला हा जबरदस्त डान्स

कोणताही समारंभ असला की एकप्रकारे उत्साहाचं वातावरण असतं. या समारंभाच्या आधी आणि हा समारंभ पार पडत असताना या उत्साहाची परिसीमा पार केली जाते आणि हळूहळू ती कमी होते. तसेच एकदा का हा समारंभ संपला की त्यातील लोकांचा उत्साह ही संपलेला असतो. सगळेच पांगतात. उरतात ते तिथल्या रिकाम्या खुर्च्या, सतरंज्या आणि डेकोरेशन वगैरे असेल तर ते आणि हे सगळं साफ करणारी माणसं ! त्यामुळे काही काळापूर्वी जिथे चैतन्याचं वातावरण असतं तिथे सगळं सूनंसूनं झालेलं असतं. पण काही वेळा असंही होतं की एखादी व्यक्ती अशी ही असते जी या सगळया माहोलात ही आनंद शोधते.

आम्हालाही असं कोणी सांगितलं असतं तर आधी विश्वास बसला नसता. पण आमच्या समोर एक व्हिडियोच आला आणि सगळं स्पष्ट झालं. हा व्हिडियो एका समारंभाच्या स्थळाचा आहे हे आपण ओळखलं असेलच. व्हिडियो सुरू होतो तेव्हाच आपल्याला याची जाणीव ही व्हायला लागते. सगळ्या सतरंज्यांवर पाणी पिऊन टाकलेले प्लास्टिक ग्लास दिसत असतात. तसेच खुर्च्या ही एकावर एक रचून ठेवलेल्या असतात. आणि या सगळ्या वातावरणात एक आजी मध्यभागी उभ्या असतात. आजींचं वय झालंय अस त्यांच्या पांढऱ्या केसांवरून वाटत असल तरी पुढे त्या अशा काही डान्स करतात की एकदम जबरदस्त !

त्यात या व्हिडियोत आपल्याला, ‘सामी सामी’ हे पुष्पा सिनेमातील गाणं ऐकायला मिळतं. या सिनेमाची आणि या गाण्याची जादू काही रसिक मनावरून ओसारलेली नाहीये. हा व्हिडियो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. तसेच या व्हिडियोत या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन वापरलं असावं. व्हिडियो सुरू झाल्यापासून या आजींचा डान्स सुरू होतो आणि तो पुढचा काही वेळ चालतो. कदाचित जास्त वेळही चालला असावा. पण आमच्या टीमने बघितलेल्या व्हिडियोत हा डान्स केवळ ३० सेकंद चालतो. पण या तीस सेकंदात ही आजी जो काही डान्सचा धुरळा उडवतात की काय विचारू नका. आजी आधीच काटक असतात त्यामुळे अगदी सहजपणे डान्स करून जातात. तसेच त्यांच्या या डान्सला गतीही असते. त्यामुळे आज आजी काही थांबत नाहीत असच वाटतं. तसंच होताना ही दिसतं. नंतर तर जेव्हा गाण्यात सायरन वाजल्याचा आवाज यायला लागतो तेव्हा तर आजींची तंद्री लागलेली दिसते. हाताने घोषणा दिल्या सारख्या करत त्या डान्स करत राहतात. तसेच मध्ये एकदा अशा काही जोशात येतात की ठुमकत ठुमकत कधी एका कोपऱ्यात निघून जातात कळत ही नाही. एरवी आपल्याला तीस सेकंदांचे अनेक व्हिडियोज बघायला मिळतात आणि मिळतील. पण या आजींचा हा व्हिडियो जो आनंद आणि उत्साह देऊन जातो तो इतर कशातही मिळणार नाही.

आजींची एकंदर परिस्थिती बघता आर्थिक स्थिती चांगली नसावी. तसेच या वयातही आजी कष्ट करत असाव्यात अस दिसतं. त्यामुळे या गाण्याच्या निमित्ताने का होईना त्या थोडा वेळ उसंत म्हणून स्वतःसाठी नाचतात हे बघून बरं वाटतं. कदाचित तिथे इतर कोणी असतं तर आजी नाचल्या असत्या का हा प्रश्नच आहे. पण तिथे कोणी नसतं आणि आजी मस्त डान्सचा आनंद अनुभवतात. तेवढाच त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा ! असो. आमच्या टीमने हा व्हिडियो पाहिला आणि या आजींचा डान्स आवडून गेला. त्यांच्यातील उत्साह तरुणांनाही लाजवेल असाच आहे. आणि हे फक्त लिहायचं म्हणून नाही तर खरंच आहे. म्हणून म्हंटलं त्यांच्याविषयी लिहू. आपल्या वाचकांना ही त्यांच्या विषयी कळेल.

आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या या लेखाप्रमाणेच आमच्या टीमने अन्य लेखही लिहिले आहेत. यात वायरल व्हिडियोजपासून ते उदयोन्मुख कलाकारांपर्यंत अनेक विषयांचा समावेश आहे. आपण यातील जमतील तेवढे लेख जरूर वाचा. आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण उत्तम लेख तयार होतात. आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.