Breaking News
Home / मनोरंजन / आज्जी येताच आजोबांनी घा’बरून डान्स थांबवला आणि पळत सुटले, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

आज्जी येताच आजोबांनी घा’बरून डान्स थांबवला आणि पळत सुटले, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

आपण वाचक म्हणून मराठी गप्पावर अनेक वायरल व्हिडियोज वरील लेख वाचले असतील. त्यात बहुतांश असे गंमतीशीर वायरल व्हिडियोज हे लहान मुलांशी संबंधित असतात हे आपल्याला लक्षात आलं असेलंच. तर अनेक वेळेस वायरल व्हिडियोज च्या माध्यमांतून वृद्ध व्यक्ती काही तरी कला सादर करताना आपल्याला दिसतात आणि आपण आश्चर्यचकित आणि भावनाविवश होतो. पण आज आमच्या टीमच्या नजरेस असा व्हिडियो पडला आहे जो पाहिल्याने आपल्या चेहऱ्यावरचं हसू जाता जात नाही. हा वायरल व्हिडियो आहे एका आजोबा आणि आज्जींचा. व्हिडियो अगदी काही सेकंदांचा आहे. पण जी धमाल येते ती अवर्णनीय. सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप वायरल होत आहे. चला तर ह्या व्हिडीओबद्दल जाणून घेऊया.

या व्हिडियोच्या सुरवातीला एके ठिकाणी काही जण नाचत असतात. त्यात कच्ची बच्ची, मोठी मंडळी आणि या सगळ्यांतून मोठे असे एक आजोबा सामील असतात. जसे वयाने मोठे, तसा त्यांचा उत्साह सुद्धा मोठाच. अगदी बे’होष होऊन आजोबा नाचत असतात. मधेच एखादं पोरगं गुलाल उधळीत असतं. तेवढ्यात आपल्याला लांबून एक आकृती चालत येताना दिसते. त्यात आपल्याला एवढं काही विशेष वाटत नाही. काही क्षण जातात आणि मग मात्र या आजोबांना त्या आकृतीचं विशेष वाटायला लागतं. त्या आकृतीला बघून आजोबा जी धूम ठोकतात की ज्याचं नाव ते. अतिशय वेगाने आजोबा काळोखात कुठे गुडूप होतात की कोणालाही काही कळत नाही. अर्थात या आकृतीमागे कोण असू शकेल, याचा आपण योग्य अंदाज एव्हाना बांधला असेलच. आजोबांना पिटाळून लावणाऱ्या त्या एक आज्जी होत्या. त्यांना येताना बघून आणि त्यांच्या हातातील काठी बघून आजोबांनी चि’त्त्याला हरवतील या वेगाने धूम ठोकली.

कारण काहीही असो, पण काही क्षण यांमुळे आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटतं हे नक्की आणि हलकेच ‘घरो घरी मातीच्या चुली’ ही म्हण ही विनाकारण आठवते बुवा. असो. ह्या लेखातून आपलं मनोरंजन व्हावं हाच आमच्या टीमचा उद्देश. त्यामुळे आपल्याला हा लेख आवडल्यास आमचे इतर लेखही वाचा. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नका पहा. आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा जरूर कळवा. मनोरंजन क्षेत्र, वायरल व्हिडियोज, भारतभरातील बातम्या असा लेखांचा खजिना आमची टीम आपल्या भेटीस घेऊन येत असते. असे हे विविधांगी लेख पटकन वाचण्यासाठी वर उपलब्ध असलेल्या स’र्च ऑप्शनचा वापर करा. आमचे नियमित वाचक असण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.