Breaking News
Home / मनोरंजन / आजोबांनी लग्नमंडपात केलेला हा अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

आजोबांनी लग्नमंडपात केलेला हा अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

आपली टीम अनेक वेळेस वायरल व्हिडियोज विषयी लेख लिहिते. त्यात ही डान्स व्हिडियोज, लग्नाचे व्हिडियोज असे अनेक उपविषय येत असतात. पण काही वेळेस हे विषय एकत्र येतात आणि एक नवीनच वेगळा विषय तयार होत असतो. बरं त्यातून येणारी मजा ही नक्कीच दुप्पट आणि तिप्पट असा आनंद देणारी असते. पण सगळ्यांत जास्त मजा तेव्हा येते जेव्हा यातील एखाद्या व्हिडियोत एखादा अतरंगी माणूस असतो. खरंच ! कारण अतरंगी माणसं असा काही आनंद घेतात जीवनाचा की काय विचारू नका.

बरं त्यांचा अतरंगीपणा हा मूलतः असतो किंवा अगदी थोडी ‘घेतली’ असेल तरीही हे होऊ शकतं. किंवा काही वेळेस वय झालं की व्यक्तीला बऱ्याच गोष्टी जाणवतात. त्यातली एक म्हणजे लोकं काय म्हणतात यापेक्षा आपण आपल्याला आवडेल तसं (दुसऱ्यांना त्रास न होता) वागावं. कदाचित ही गोष्ट जाणवल्यामुळेही असेल पण काही जण अतरंगी वागतात.असो. ती कारणं काहीही असोत पण त्यातून मजा येते ती एक नंबर असते. अर्थात त्यांची ही मजा जास्त झाली तर मात्र त्यांच्या अंगाशी ही मजा येऊ शकते. पण तसं झालं नाही तर नकळत ही माणसं अनेकांचं मनोरंजन करून जातात.

त्यात लग्नसोहळ्यांत वगैरे त्यांना प्रवेश मिळाला तर मग काय मजाच मजा असते. कारण आधीच तो माहोल मजा मस्तीने भरलेला असतो. त्यात अशा कलंदर लोकांची एन्ट्री झाली की मग सगळे जण त्यांच्या सतरंगी वागण्याचा आनंद घेतात. त्यात डान्स वगैरे करायला लागले तर मोबाईल कॅमेरे सरसावलेच म्हणून समजा. याचाच प्रत्यय एक व्हिडियो बघताना आमच्या टीमला आला. हा व्हिडियो एक काकांचा आहे. अदमासे पाव मिनिटाचा व्हिडियो असेल. पण एवढ्या कमी वेळेत ही हे काका मस्त धमाल आणतात. बरं ही मजा उपस्थित असलेले सगळेच जण घेत असतात. त्यातूनच एक व्यक्ती हा व्हिडियो रेकॉर्ड करते आणि आपल्याला ही या काकांचा डान्स बघता येतो. काकांची वाकडं उभं राहत डान्स करण्याची स्टाईल अफलातून वाटून जाते. अर्थात काकांच्या समोर कोणी उभं असतं की नुसतेच गाण्यावर नाचत असतात ते कळत नाही. पण नाचण्याची खुमखुमी आहे हे कळून येतं. अर्थात याचमुळे या वयातही त्यांना डान्सचा आनंद घेता येतोय हे दिसून येतं.

कारण सहसा वय झालं आणि शरीर थोडं थकलं की आपण बऱ्याच गोष्टी वर्ज्य करतो. त्यात डान्स सारखं काही करणं तर दूरच राहील. ते काही बाबतीत योग्यही आहे. पण याबाबतीत काका मात्र कलंदर ठरतात. वय विसरून नाचतात. स्वतः ही आनंद घेतात आणि बघणाऱ्यांना ही आनंद देतात. यात उपस्थित आणि आपला ही समावेश असतोच. आपणही हा छोटा पण मनोरंजक व्हिडियो बघितला असेल. नसेल बघितला तर जरुर बघा आणि त्यातील काकांच्या डान्सचा आनंद घ्या.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.