Breaking News
Home / मनोरंजन / आजोबांनी सर्वांसमोर केलेला हा ‘बेडूक डान्स’ पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

आजोबांनी सर्वांसमोर केलेला हा ‘बेडूक डान्स’ पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

माणसाला ज्यात आनंद मिळतो, माणसाने ते बिनदिक्कतपणे करत राहावं. स्वतःला आनंद, समाधान मिळतील, अशा कृती माणसाने सातत्याने करत राहाव्यात, फक्त त्यातून एखाद्याला हानी किंवा दुःख पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी. आता आपण मूळ व्हायरल व्हिडीओकडे वळूयात. काम की आपला छंद? बऱ्याचदा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी कामाच्या वेळेत करता येत नाहीत. साधारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कामच महत्वाचे वाटत असते. काम सुरू असताना अनेकदा असं घडतं की, आपल्याला काम करण्याचा मूड नसतो किंवा ताण येतो. मग अशावेळी आपण काहीतरी मनोरंजन शोधत असतो. पण ऐनवेळी आपल्यासमोर येणारी गोष्ट आपल्या आवडीची असेल तर त्यापेक्षा आनंद तो काय…

म्हणजे एखाद्याला डान्स करायला आवडत असेल आणि तो बोर झालेला असेल अन नेमक्या त्याच काळात वेळेत त्याच्यासमोर डीजे-ढोल-ताशा आला तर… असे हे योगायोग खूप कमी वेळा होतात. आता अशाच एका आजोबांचा एक भन्नाट स्टाईलने डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आजवर तुम्ही नागीण डान्स बघितला असेल, हिपहॉप, देशी, असे कित्येक प्रकारचे डान्स बघितले असतील. पण या आजोबांनी ज्या पद्धतीने आणि ज्या प्रकारे डान्स केला आहे, तसा डान्स तुम्ही या जन्मात तरी नक्कीच बघितला नसेल.

डान्स करायला प्रत्येकाला आवडतो. काही जणांचा अंगात तर गाणी ऐकताच संचारू लागतं. जिथं आहेत तिथंच ते थिरकायला सुरुवात करतात. काही जणांचा डान्स तर खूपच विचित्र असतो. जो पाहताच आपल्याला हसू आवरत नाही. असाच विचित्र आणि मजेशीर डान्स करणाऱ्या आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात त्यांनी डान्स करायला सुरुवात करताच पाहून सर्वजण हैराण झाले. डोक्यावर उडी मारून हे आजोबा एखाद्या तरुणाप्रमाणे डान्स करत आहेत. अंगात मळलेले कपडे, डोक्यावर पांढरे केस, खांद्यावर गमजा अशा अवस्थेत नाचलेले हे आजोबा अशा जल्लोषात नाचत होते की त्याचे नाव ते…

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता, आजूबाजूला काही तरुण व्यक्ती ढोल ताशा वाजवत आहे आणि आजूबाजूला लोक छान डान्स करत आहेत. या सर्व मनसोक्त डान्स करणाऱ्या लोकांना पाहून या आजोबांना पण डान्स करण्याचा मूड होतो. मग काय देहभान हरपून आणि लोक काय म्हणतील याचा विचार सोडून तेही नाचायला लागतात. त्यांच्या या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ढोल ताशाने आपली जुगलबंदी सुरू केल्यावर आणि सगळे एकाच तालात झुलू लागल्यानंतर आजोबा स्वतःला आवरू शकत नाही. सर्व जण डान्स करत असतात तेव्हा त्यांच्या मध्येच जाऊन ते अचानक असा डान्स करतात की इतर नाचणारे सर्वजण बाजूला होतात आणि त्यांनाच पाहत राहतात. भल्याभल्याना जे जमत नाही. ते या म्हाताऱ्यांना जमतं. ते म्हणजे तल्लीन होऊन नाचणं. आता एखादी स्पर्धा असते, तेव्हा तेथील स्पर्धक मार्क्स मिळवण्यासाठी नाचत असतात. तर काही नाचणारे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी नाचत असतात आणि टाळ्या मिळवत असतात. मात्र स्वतःसाठी नाचणारी या व्हिडीओतील म्हातारी आपलं मनोरंजनही करतात आणि टाळ्याही मिळवतात. या आजोबांनी मनसोक्त डान्स करत मनसोक्तपणे आयुष्य जगायचे कसे हेही या व्हिडीओत दाखवून दिले.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *