Breaking News
Home / मनोरंजन / आजोबांनी सर्वांसमोर केलेला हा अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

आजोबांनी सर्वांसमोर केलेला हा अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

आपली टीम, आपले वाचक आणि मनोरंजक व्हिडियोज यांची अशी काही नाळ जोडली गेली आहे की विचारू नका. किंबहुना आपली टीम आणि आपले वाचक यांना जोडणारा एक जबरदस्त दुवा म्हणजे हे मनोरंजक व्हिडियोज आहेत. अर्थात येथे आम्ही मनोरंजक व्हिडियोज म्हणतो आहोत याची कृपया नोंद घ्या. कारण मनोरंजक व्हिडियोज मध्ये वायरल झालेले, न झालेले किंवा वायरल होऊ शकतील अशा सगळ्याच मनोरंजक व्हिडियोजचा भरणा असतो. पण अस असलं तरी सहसा आपलं लक्ष वायरल व्हिडियोज कडे जास्त जातं. मानवी स्वभाव आहे.

पण उल्लेख केल्याप्रमाणे असे ही काही व्हिडियोज असतात जे वायरल होत नाहीत पण आवडून जातात. इतके की त्यांच्या विषयी आपण लिहावं असं आमच्या टीमला वाटतं. बरं यात केवळ आमच्या आवडीनिवडीचा विचार नसतो आणि आपल्या वाचकांना प्राधान्य असतं हे तर आपण जाणता. आता तुम्ही म्हणाल मग एवढं आहे तर आज कोणता व्हिडियो आमच्या भेटीला आणला आहे? उत्तर आहे एक जुना पण अतरंगी व्हिडियो ! आता अतरंगी म्हंटलं की त्यात सतरंगी माणसं असतात हे आपण जाणतो. किंबहुना ती असतात म्हणून तर व्हिडियोज हे अतरंगी होत असतात.

या माणसांचं वेगळं वागणं, काही वेळा तिरकस बोलणं, त्यांच्या इतर लकबी यांच्यामुळे हे व्हिडियोज आवडतात. आजच्या व्हिडियोत ही आपल्याला एका आजोबांच्या तिरकस लकबी बघायला मिळतात. या लकबी आपल्या चेहऱ्यावर एक हसू उमटवतात ते कायमचं ! किंबहुना या हसुच कधी खळाळून हसण्यात रूपांतर होतं हे आपल्याला ही कळत नाही. आता कोणत्याही अतरंगी माणसाचा व्हिडियो असला की हे होतंच की नाही, मग हा व्हिडियो यांस अपवाद कसा असेल. बरं त्यात अजून एक गंमत अशी आहे की या व्हिडियोतील आजोबांचा डान्स आणि सोबत वाजत असलेलं गाणं यांचा तसा काही संबंध आहे असं वाटत नाही. आजोबा कदाचित एका वेगळ्याच गाण्यावर किंवा धूनवर डान्स करत असावेत. अर्थात त्यांचा हा ‘डान्स’ म्हणजे ‘अंगविक्षेप आणि लकबी’ यांचा मेळा आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. असो. पण त्यांचा हाच ‘डान्स’ आपल्याला हसवून जातो हे नक्की. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आपल्याला काही जण एके ठिकाणी जमलेले दिसतात. बहुधा राजस्थान मधील एखादं गाव असावं. तिथे अनेक गावकरी जमलेले दिसून येतात. त्यांच्या या घोळक्यात वर उल्लेख केलेले आजोबा उभे असतात. व्हिडियो सुरू होतो आणि त्यांचा डान्स सुद्धा सुरू होतो ! बरं गाणं एकदम सुनं सुनं वाटत असतं.

‘हा मैंन भी प्यार किया’ चित्रपटातील ‘मुबारक मुबारक’ हे ते गाणं असतं. पण त्याच्या अगदी विसंगत असा या आजोबांचा डान्स असतो. पण त्यात जी काही ऊर्जा भरलेली असते ती ऊर्जा आपल्याला आवडून जाते. त्यात त्यांच्या लकबींमुळे आपलं सुरुवातीला असलेले हसू अचानकपणे हसण्यात रूपांतर झालेलं असतं. इतकंच काय पण आपण हा व्हिडियो पुन्हा पुन्हा बघितला की आपण नक्कीच खळखळून हसतो. आणि सांगा ना का नाही बघणार पुन्हा पुन्हा ! अहो, एवढं थकून भागून आपण जरा विसावत असतो. त्यात आजूबाजूला चाललेल्या गोष्टींनी डोक्याची पार भाजी झालेली असते. त्यामुळे पुन्हा डोक्याला ताण देणारं काही तरी बघावं म्हंटलं की कंटाळा येतो. पण हे अस डोक्याला ताप न देणारं पण झटक्यात होणारं मनोरंजन हवंहवंसं वाटतं. अर्थात हेच काय ते मनोरंजन असं कधीच होत नाही. यापेक्षा कित्येक पटीने उत्तम असं मनोरंजक बरंच काही उपलब्ध असतं. आपल्या टीमचे प्रत्येक लेख याच उत्तम मनोरंजनावर तर आधारलेले असतात. पण कधी तरी थोडं डोकं बाजूला ठेवून बघावं अस मनोरंजन आवश्यक असते. त्यातूनच मग असे काही अतरंगी व्हिडियोज समोर येतात. अर्थात या आजोबांच्या सतरंगी वागण्याला सलाम आहेच. कारण आपल्यापैकी प्रत्येकाला असं वागावं अस वाटत असतं. पण हिम्मत होत नाही. तोच आपला

जुना मित्र असलेला, ‘लोग क्या कहेंगे’ हा प्रश्न आपल्या समोर उभा असतो. पण या आजोबांसारखा बिनधास्त स्वभाव असलेली मंडळी मात्र यास छेद देतात. म्हणूनच की काय कितीही वेगळं वाटलं तरी त्यांच्या या अशा वागण्याचं कौतुक आणि किंचित आकर्षण हे आपल्या मनात सदैव असतं. असो. आता या विषयावर अजून लिहायला लागलो तर एक स्वतंत्र विषय तयार होईल आणि लेख सुद्धा लांबेल. त्यापेक्षा या आजोबांच्या बिनधास्त स्वभावाला सलाम करत आपण हा व्हिडियो एकदा बघा. या व्हिडियोचा मनसोक्त आनंद घ्या. आपल्या मनात असलेल्या चिंता काही क्षणांसाठी विसरून जा आणि जीवनाचा आनंद लुटा !!!

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.