Breaking News
Home / मनोरंजन / आजोबा आणि नातीचं हे गोड भांडण पाहून हसू आवरणार नाही, बघा एकदा व्हिडीओ

आजोबा आणि नातीचं हे गोड भांडण पाहून हसू आवरणार नाही, बघा एकदा व्हिडीओ

लहान मुलं घरात असली की सगळं घर कसं बोलकं असतं अस वाटतं. त्यात या घरात जर आजी आजोबा असतील तर अजून छान ! कारण अनुभवी आजीआजोबा या लहान मुलांना व्यवस्थित सांभाळून घेत त्यांना नवनवीन गोष्टी शिकवत असतात. मग त्यात त्यांच्या नातवंडांनी केलेल्या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देत तर कधी, त्यांच्या चुकीच्या वागण्याला सुधारत त्यांना नेटकं वळण लावताना दिसतात. आज या सगळ्यांची आठवण व्हावी असा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. या व्हिडियोविषयी आपल्या वाचकांसाठी एक लेख लिहावा अस ठरलं आणि आजचा हा लेखप्रपंच घडून येतो आहे. व्हिडियो सूरु होतो तेव्हा कॅमेरा हा हळुवारपणे घरातील तीन सदस्यांवर येऊन स्थिरावतो. एक असते छोटी चिमुरडी नात आणि दुसरे दोन सदस्य म्हणजे आजी आजोबा. आज्जी मस्तपैकी काही तरी काम करत बसलेल्या असतात आणि इथे आजोबा आणि नातीमधलं संभाषण सुरू असतं.

व्हिडियो थोडा वेळ बघितल्यानंतर लक्षात येतं की या आपल्या चिमुकलीने मम्मं करून घ्यावं असं तिचे आजोबा सुचवत असतात. पण त्यांचं बोलणं या छोटीला ओरडल्यासारखं वाटत असतं. त्यावर तिचा गोड आक्षेप असतो. अगदी ठामपणे ती आपले मुद्दे मांडत असते. त्यात धमाल येते ती तिच्या हातावाऱ्यांमुळे आणि देहबोलीमुळे. अगदी ठसक्यात बोलल्यासारखे तिचे हातवारे असतात. तिच्या या बेअरिंगच तिच्या आजोबांना हसू येत असत. तर आजी पण मजा घेत असतात. बरं तिने शांत राहावं म्हणून तिला खायला ही देतात. पण ते देत असताना त्यांनी जो डायलॉग मारला आहे आणि ते पण एकदम कडक टायमिंगने ! त्यामुळे आपण नकळतपणे हसायला लागतो. हसायचं दुसरं कारण या मुलीच्या वागण्यातून मिळत असत. त्यात आजोबा त्यांचा हट्ट सोडायला तयार नसतात आणि इथे नात पण तिच्या मतावर ठाम असते. आजी मात्र एकदम चिल असतात. त्यांना माहिती असतं की दोघांना शांत कसं करायचं ते.

पण जस जसा व्हिडियो पूढे सरकतो, त्या चिमुकलीचा पारा चढत जातो. आजोबा तिची मस्करी करतच असतात. पण न राहवून ती त्यांना हातांने चापटी मारते. मग एक मोठा चमचा घेऊन मारल्यासारखे करते. आता मात्र आजींना जाणवलेलं असतं की आपण मैदानात उतरलं पाहिजे. त्या एकदाच आवाज काढतात आणि मग नात आणि आजोबा शांत होतात. सोबतच व्हिडियो सुद्धा संपतो.

या व्हिडियोने आपल्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतीलच. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आजी आजोबांसोबत घालवलेले क्षण आठवले असतील. कदाचित आपण काही चुका केल्या असतील तर ते प्रसंग ही आठवले असणार. पण एक मात्र खरं की आजी जेव्हा त्या नातीला खाऊ देतात ते बघून आपली आजी आठवली असणारच. त्यातच, लहानपणी आपल्या घरी जाताना आजीने दिलेले खाऊचे पैसे ही आठवले।असतील. का निघून गेले ते दिवस अस न वाटलं तरच नवल. असो. हा व्हिडियो तसा चार वर्षे जुना आहे. पण तरीही आपल्याला आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवून आणतोच.

आपल्या आठवणी जागृत करतोच. आपल्या वाचकांना या व्हिडियोविषयी वाचन करायला आवडेल अस वाटलं आणि त्यातून हा लेख लिहिला गेला. तेव्हा वाचक म्हणून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायला आवडतील. त्याचप्रमाणे आजोबा आणि नात ह्यांचे नातं म्हणजे एकप्रकारची मैत्रीच होय. त्यामुळे मुलंही मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलतात, आपले विचार मांडतात, प्रेमाने भांडतात. त्यामुळे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चांगल्या प्रतिक्रिया येतील अश्या अपेक्षा आहे. तसेच आपल्या प्रतिक्रियेमुळे कुणाला ठेच पोहोचू नये, हीच तुम्हांला नम्र विनंती. आपला प्रतिसाद आम्हाला नकळतपणे प्रोत्साहन देऊन जात असतो. आपल्या सकारात्मक सूचना बरंच काही शिकवून जात असतात. तेव्हा येत्या काळातही आपल्या आमच्या लेखांवरील सूचना आणि प्रतिक्रिया आम्हाला कळत राहू द्या. त्यातूनच उत्तम लेख लिहिले।जाणार आहेत त्यांचा जरूर आस्वाद घ्या. आपला आणि आमचा स्नेह वाढीस लागो ही सदिच्छा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *