Breaking News
Home / जरा हटके / आजोबा कोर्टाचे चौकीदार, वडील कोर्टात ड्राइवर, पण मुलगा बनला जज

आजोबा कोर्टाचे चौकीदार, वडील कोर्टात ड्राइवर, पण मुलगा बनला जज

असे म्हणतात की आयुष्यात मोठी स्वप्न पाहावीत. जेव्हा तुम्ही स्वप्न साकार करण्यासाठी कंबर कसतात, तेव्हा तुम्हाला ते स्वप्न साकार करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे कोणतेही स्वप्न साकार करण्यामागील रहस्य आहे. तुमची परिस्थिती कशीही असू देत, तुम्ही हार न मानता सतत मेहनत करत राहिलात तर परिस्थितीलाही हरवण्याची हिम्मत तुमच्यात आहे. याच गोष्टीला मध्यप्रदेशतील इंदौर मध्ये राहणाऱ्या ‘चेतन बजाड़’ या तरुणाने साध्य करून दाखविले आहे. चेतन कित्येक लोकांसाठी प्रेरणादायी स्रोत बनला आहे. 26 वर्षीय चेतन हे ‘सिविल जज क्‍लास-II रिक्रूटमेंट टेस्ट’ उतीर्ण झाला आहे. खरंतर चेतनसाठी हा प्रवास खूपच खडतर असा होता. हा त्याच्यासाठी चौथा प्रयत्न होता. वडिलांच्या पाठिंब्याने चेतनला मोठा आधार मिळाला. पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरल्याने चेतन खूपच खचून गेला होता. परंतु वडिलांनी त्याला धीर दिला आणि अजून प्रयत्न करत राहण्यास सांगितले.

मजेशीर गोष्ट म्हणजे, चेतनचे वडील आणि आजोबा यांचे फार पूर्वीपासूनच कोर्टाशी नाते आहे. वडील गोवर्धनलाल इंदौर जिल्ह्यातील कोर्टात ड्राइव्हर म्हणून कार्यरत आहेत, तसेच आजोबा हरिराम बजाड या कोर्टात चौकीदाराचे काम करायचे, आता ते निवृत्त झाले आहेत. गोवर्धनलाल बजाड़ यांना तीन मुलं आहेत. त्यांचा मुलाने न्यायाधीश बनावे हे त्यांचे फार पूर्वीपासूनच स्वप्न होते. अश्यामध्ये वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी चेतन याने घेण्याचे ठरविले. चेतनने सर्वात आधी कायदा क्षेत्रात आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मध्‍य प्रदेश हाय कोर्टातील ‘जबलपुर एग्‍जामिनेशन सेंटर’ द्वारे तो न्यायाधीश पदासाठी पुढील तयारी करू लागला. प्रोवीजनल सेलेक्‍शन लिस्ट मध्ये चेतन ला 450 पैकी 257.5 एवढे गुण मिळाले. ओबीसी श्रेणीत त्याने तेरावा क्रमांक पटकावला आहे. चेतने लहानपणापासूनच आपल्या वडिलांना आपले आदर्श मानतात. त्याने आपल्या वडिलांपासून प्रेरित होऊनच कायदा क्षेत्रात आपले पदवी शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले होते.

आज आपल्या मुलाचे यश पाहून बापाची छाती गर्वाने फुलून गेली आहे. संपूर्ण कुटुंबात चेतनच्या या यशानंतर सर्वच खूप खुश आहेत. दुसरीकडे सोशियल मीडियावरही चेतनच्या यशाची बातमी वाऱ्याप्रमाणे पसरत आहे. कित्येक लोक चेतनचा आदर्श लक्षात घेऊन आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढील वाटचाल करू लागले आहेत. चेतन याचे असे म्हणणे आहे की, जेव्हा तो न्यायाधीश बनेल तेव्हा लोकांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठीच तो प्राधान्य देईल. अनेकदा लोक कित्येक महिने किंवा वर्षानुवर्षे कोर्टाचे चक्कर मारत राहतात तरीही हाती काहीच लागत नाही. म्हणून चेतनला न्यायाधीश झाल्यानंतर हे चित्र बदलायचे आहे. चेतन ने या गोष्टीला सिद्ध करून दाखविले आहे की, जर तुम्हाला यशाची उंची गाठायची असेल तर सर्व गोष्टी बाजूला ठेवून कठोर परिश्रम हा एकच मार्ग आहे. तुमच्या जवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करूनच तुम्हाला यशाचे शिखर गाठायचे आहे. एक दिवस नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आमच्या कडून चेतनची न्यायाधीश पदासाठी निवड झाल्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *